Login

तुझी ती भेट भाग -13

Alina feeling very depressed, when she saw Sneha and Kartik together.

स्नेहा -" अरे कार्तिक उठ .. अलिना कुठेही दिसत नाहीये ."

कार्तिक झोपेत म्हणाला .

कार्तिक -" झोपू दे कि ."

स्नेहा अजून जोरात कार्तिकला हलवत म्हणाली.

स्नेहा -" अरे अलिना कुठे दिसत नाहीये ."

कार्तिक -" काय ?"

असं म्हणत तोही जागला .

स्नेहा -" अरे अलिना कुठेही दिसत नाहीये ."

कार्तिक -" मग गेली कुठे ?"

स्नेहा -" मला काय माहिती . चल आपण शोधूयात ."

       नुकतेच जागे झालेले हे दोघे अलिनाच्या शोधात रूमच्या बाहेर पडले . हॉटेलमध्ये सगळीकडे शोधल तरी कुठे सापडत नव्हती . 

स्नेहा -" अरे कुठ गेली असेल हि ?"

        कार्तिक विचारात पडला . अचानक त्याची ट्यूब पेटल्यासारखं म्हणाला 

कार्तिक -" मला माहिती आहे ती कुठे असेल ?"

स्नेहा -" कुठे ?"

कार्तिक -" चल ."

       कार्तिक पुढे झाला आणि स्नेहा तिच्या मागे झाली . हॉटेलच्या बाहेर येऊन ते तळेच्या दिशेनी जाऊ लागले . जशे ते तळेकडे जाऊ लागले , तशे त्यांना कोणीतरी तळ्यात पोहत असल्याचा जाणीव झाला . जवळ जाताच अलिना केसरी रंगाचं स्विमिन्ग सूट घालून तळ्यात पोहत होती . अगदी वेगात ती पोहत होती . तिच्या चेहर्यावर अगदी शुन्य अशी भावना होती . तळ्याच्या किनाऱ्यावर येऊन ती तळ्याच्या दिशेनी तोंड करून उभी झाली .

स्नेहा -" अलिना ..."

      स्नेहा मागून हाक मारली . ऐकायला आल तरी ती तशीच उभी होती . पुढच्या क्षणी ती पळू लागली आणि तळ्यात उडी मारली . दोघांना अजबच वाटलं . तळ्याच्या किनारी आले आणि परत हाक मारले . 

कार्तिक -" अलिना .."

      ती तशीच पोहत होती . स्नेहा हि हाक मारली , तरी तिचा काहीच रिस्पॉन्स नव्हता .

       ते दोघे तशेच उभे होते . अलिना पोहत किनाऱ्यावर येऊ लागली .  ती बाहेर आली आणि त्यांच्याजवळ येऊ लागली .

कार्तिक -" Alina .... What happened ?"

      अलिना एक क्षण त्यांच्याजवळ आली आणि एक स्माईल दिली आणि म्हणाली .

अलिना -" Nothing .. I just want to take a shower ." 

      एवढं बोलून ती हॉटेलच्या दिशेनी निघाली . दोघांना अजबच वाटलं . ते दोघेही तिच्या मागोमाग गेले . रूममध्ये पोहचताच त्यांना कळाल कि अलिना बाथरूममध्ये अगोदरच गेली होती . 

कार्तिक -" हिला काय झालं ?"

स्नेहा -" काय माहिती ?"

      तीच शॉवर बंद झाल्याचा आवाज आला . थोड्यावेळाने ती टॉवेल केसांभोवती गुंडाळून बाहेर आली . ती बाहेर येताच स्नेहा म्हणाली .

स्नेहा -" Alina .."

   अलिना तिच्याकडे न बघताच फक्त " हम्म " म्हणाली .

स्नेहा -" are you alright ?"

ती कपडे शोधतच म्हणाली 

अलिना -" Yeah .."

कार्तिक -" Are you sure ?"

तरीही ती आरश्यात बघत म्हणाली .

अलिना -" What do you mean ?"

कार्तिक -" I mean .. Are you sure that nothing is happen ?"

अलिना -" yeah ."

कपाटातून ती कपडे काढली .

अलिना -" Actually I want to change my clothes ..."

       असं म्हणत त्यांचं उत्तर न ऐकता ती थेट बाथरूम मध्ये गेली .इकडे दोघे परत एकमेकांना अजब नजरेने बघू लागले . काहीवेळाने ती बाहेर आली . ती लाल ड्रेस घातली होती . गुढग्याच्या थोडं खाली ती ड्रेस कम स्कर्ट होती . त्यावर ती गोल्डन बाली घातलेली होती . त्यात ती अजून सुंदर दिसत होती .

अलिना -" I’m hungry now. I’m gonna take my breakfast in hotel. Come soon , when you are ready .”

ती अढकळत म्हणाली आणि बोलताच बाहेर गेली . यांना काहीतरी गडबड असल्याचं शंका येऊ लागली . 

कार्तिक -" हिला नेमकं काय झालय ?"

स्नेहा -" तेचतर कळत नाहीये ."

काहीतरी तोडगा काढण्यासाठी कार्तिक विचारात पडला . 

-------------------------------------------------------------

     हॉटेलच्या एका टेबलावर अलिना बसली होती . इतक्यात एक वेटर त्या टेबलाजवळ आला .

वेटर -" Mam .. Your order please ?"

अलिना -" I'll order in few minutes ."

वेटर -" Ok mam ."

      तो वेटर स्माईल केला आणि निघून गेला . अलिना शून्यात बघत बसली होती . गालावरून अश्रू वाहत होते . एकदमच तिला रडू कोसळलं आणि टेबलावर मान घालून रडू लागली .

-------------------------------------------------------------

रूममध्ये स्नेहा नुकताच बाथरूममधून बाहेर आली होती . 

स्नेहा -" कार्तिक ... तू अजून बॅग पॅक नाही केलास ?"

    कार्तिक विचारात हरवून गेला होता . स्नेहा त्याला असं बघून जोरात म्हणाली .

स्नेहा -" कार्तिक ..."

कार्तिक -" अहं "

स्नेहा -" तू अजून बॅग पॅक नाही केलंस . आज आपल्याला परत निघायचं आहे . "

कार्तिक -" आपण परत नाही निघणार आहोत ."

स्नेहा -" का ?"

कार्तिक -" कळेलच लवकर ."

     एवढं बोलून तो बाथरूममध्ये गेला . तो शॉवर घेऊन बाहेर आला आणि बॅग पॅक करू लागला . 

स्नेहा - " आपण जाणार नव्हतो ना परत ?"

कार्तिक -" आपण हॉटेल सोडत आहोत आणि परत कॅलिफोर्निया कडे नाही जाणार आहोत ."

स्नेहा -" मग कुठे जाणार आहोत ?"

कार्तिक -" कळेल लवकर .. आणि हा अलिनाच बॅग घे ."

      दोघेही बॅग पॅक केले आणि रूमची चावी घेऊन खाली आले . बॅग कारमध्ये ठेवून ते हॉटेलकडे आले . अलिना अजून डोकं खाली ठेवून बसली होती .

स्नेहा -" Alina ... Are you ok ?"

     स्नेहा तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली . ती लगेच खाली अश्रू पुसून वर बघितली .

अलिना -" Im fine ."

कार्तिक -" are you sure ?"

अलिना -" yeah ... Lets order something ."

स्नेहा -" you didn't order anything ?"

अलिना -" yeah ... Actually I am tired a little bit and we have to go . I have a add shoot at day after tomorrow ."

कार्तिक -" We have time to go ."

अलिना -" what do you mean ?"

एवढ्यात वेटर त्यांच्याजवळ आला . सगळे आपापले ऑर्डर दिले .

कार्तिक -" I mean our trip is not over yet ."

स्नेहा -" where will we go then ?"

कार्तिक -" You will get it ."

अलिना -" But I have my ad shoot ."

कार्तिक -" but it is at day after tomorrow ."

हे ऐकून ती काही म्हणली नाही . 

      त्यांनी ऑर्डर केलेल ब्रेकफास्ट आल आणि सगळे ब्रेकफास्ट केले . रूम चेक आऊट करून ते बाहेर निघाले . बॅग्स अगोदरच कारमध्ये ठेवण्यात आलेले होते .

कार्तिक -" Alina... Come here. Seat near me.”

      हे ऐकून स्नेहा मधेच  थांबली . कारण कार्तिकजवळ तिला बसायचं होत . अलीनाही स्तब्द झाली होती . मग नंतर ती पुढच्या सेटवर येऊन बसली . बसत असतानाच कार्तिक म्हणाला .

कार्तिक -" And by the way .. You are looking beautiful ."

हे ऐकून अलिना तिचे कानामागे घेत म्हणाली .

अलिना -" Thank you ."

हे बघून स्नेहाला वेगळंच वाटलं . आता पुढची ट्रिपला हे निघाले . कार्तिक कुठे घेऊन जाणार होता . हा प्रश्न स्नेहा आणि अलिनाला दोघांनाच पडला होता . 

**********************************

क्रमशः 

ऋषिकेश मठपती 

पुढील भाग लवकरच . हा भाग कसा वाटलं नक्की कळवा . धन्यवाद ????????????