Login

अगं बाई मॅटरनिटीशुट...?

माहितीपुर्ण..
अगं बाई मॅटरनिटी फोटोशुट ..!

पहिलं मॅटरनिटी फोटो शूट म्हटलं की एखादी गरोदर स्त्री छान साडी न्हेसुन, केसात, हातात, कंबरेत मोगऱ्याचे सुवासिक गजरे लावुन आणि हातात धनुष्यबाण घेऊन छान असे सुंदर सुंदर फोटो काढायची..

घरातल्या साऱ्या स्त्रिया तिला छान नटवायचे, सजवायचे तिच्या डोहाळे जेवणात तिचे आणि बाळाचे छान छान वस्तु दाखवुन, खाऊ घालुन लाड पुरवायचे..

पण आता मॅटरनिटी शुट चा ह्या आत्ताच्या काळात अर्थच बदलवुन टाकला आहे..

तोही चक्क आत्ताच्या ह्या स्त्रियांनी, आणि त्याला कोणताच समाज जबाबदार नाही.
स्त्रियांनी म्हटलं तर ह्यात, साध्या घरातल्या बायका किंवा साधी राहणीमान असलेले घर मोजले जात नाही.

मोठी राहणीमान असलेल्या बायका ह्यात फोटोशुट करताना आपल्याला हमखास दिसतात.

कॅमेरासामोर नग्न होऊन, पोट दाखवुन अनेक फोटो काढुन मग सोशल मीडिया जसे की इंस्टाग्राम, फेसबुक ह्यावर अपलोड करतात.
मग त्यावर येतात अनेक प्रतिक्रिया, मग त्या चांगल्या असो किंवा मग वाईट.

आपल्या मातृत्वाचा पुर्ण जगासमोर थोडक्यात बाजार मांडतात..

मला कळत नाही आई होण्याआधीच मातृत्वाचा असा बाजार का मांडला जातो.
कोणाची नजर लागु नये म्हणुन घरातली वयाने मोठी माणसे तिची सतत काळजी घेतात, बायका नजरा काढतात..

मग ह्या कलाकारांना आपलं फोटोशुट नेहमी असं का करायच असतं, मला तोच नेमका प्रश्न पडतो..
कदाचित आपल्या सगळ्यांनाच असा प्रश्न पडला असेल बरोबर ना..

कतरीना आणि करीना ह्यांनी देखील असा फोटोशुट केला आणि तसाच फोटोशुट आपली मराठी अभिनेत्री राधिका आपटेने केला आहे..

अंग भर साडी नाही तर चिंध्या घालुन अंग दाखवलं आहे, मला कळत नाही ह्या अशा का वागतात..? का तुम्ही साडी घालुन ह्या हुन सुंदर गरोदरपणातले फोटो का नाही काढत..?

मला वाटत राधिका आपटेने जरा अंग भर साडी घालुन जर हा फोटोशुट केला असता तर सोन्याहुन पिवळ आणि ति खुप चांगली ट्रोल झाली असती. जेवढी आताच्या फोटोशुट ने होते त्याहुन जास्त.
आणि मराठी चित्रपट सृष्टीत नाव तर जास्त झालं असतं शिवाय हिंदी सिने सृष्टीत सुद्धा जास्त झालं असतं.
शिवाय फॅन ची संख्या लाखोंनी वाढली असती.

मॅटरनिटी फोटोशुट म्हटलं की आयुष्यातील एक गोड आठवणं असते, जी कायम स्वरूपी लक्षात राहते.

मि इतकंच म्हणेन की मॅटरनिटी शुट असो किंवा प्रीवेडिंग शुट बाई ने तिचं अंग झाकुन राहील पाहिजे. आपली संस्कृती हिच आहे, महाराष्ट्रातील बाई, मराठी स्त्री ही साडी चोळीतच छान वाटते.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा हिरकणीला साडीचोळी ही भेट म्हणुन दिली, त्याच हिरकणीचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवुन आपण ही आपली मराठी संस्कृती कायम जपली पाहिजे.

टीप - ह्या लेखात कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतु नाही..