Login

ही लग्नाची बेडी.. भाग १

शालूच्या पदराची उपरण्याला गाठ बांधताना,पंडितजी म्हणाले लगांच्या गाठी स्वर्गातून बनून येतात
ही लग्नाची बेडी

भाग १

-©®शुभांगी मस्के...

अपूर्वा, पलंगावर खूप मोठा पसारा काढून बसली होती. लग्नाचा शालू, अल्बम, दाग दागिन्यांचा डबा, अजून कितीतरी सामान... अल्बम मधला एक एक फोटो ती, निरखून निरखून बघत होती.

सुमनताई, आत अपूर्वाच्या बेडरूममध्ये आल्या. "काय ग कसली एवढी आवराआवर काढलीस आणि ती ही लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी."

"लग्नाचा वाढदिवसाच्या शुभेच्छा".... म्हणत पाठमोऱ्या बसलेल्या, अपुर्वाच्या खांद्यावर हात ठेवत सुमनताईंनी अपुर्वाला दोन्ही हातांनी, मागून येऊन पकडुन घेतलं.

"अरे वाह! फोटो बघतेस होय", "काय सुंदर दिसत होतीस तू? शांत, सोज्वळ, आणि निरागस"...

"आज ही तशीच दिसतेस... तेवढीच शांत, सालस, शरिरकाठी पण अगदी तशीच, फार काही बदल झाला नाही तुझ्यात"..

"वयानुरूप थोडा बदल आणि तो होण अगदीच स्वाभाविक आहे" म्हणत... सुमनताई बेडवर बसल्या. अल्बमच एक एक पान पलटवून एक एक फोटो निरखून निरखून बघत बसल्या.

गतकाळाच्या आठवणी अत्तराच्या बंद कुपीसारख्या दरवळत होत्या.

"चौदा वर्ष.... चौदा वर्ष, आई!"

"चौदा वर्षात तर सीतेचा ही वनवास संपला होता." बोलता बोलता अपूर्वा गप्प झाली.

अग्निला साक्षी मानुन, हातात हात घेत, फेरे घेताना च्या अल्बम मधल्या फोटोवरून हळुवार हात फिरवताना..
अपूर्वाच्या डोळ्यात टचकन पाणी तरळलं...

"ही लग्नाची बेडी च ना हो आई!"

"शालूच्या पदराची यांच्या उपरण्याला गाठ बांधत असताना..... पंडितजी म्हणाले होते.. "लग्नाच्या गाठी स्वर्गातून बांधून येतात. आता इथपासून जोडीदाराच्या सुखात सुखी, दुःखात दुःखी.. एकमेकांची सुख दुःख वाटून घायची"...

दोघींची नजर एकाच फोटोवर खिळली. दोघी, एकमेकींकडे निःशब्द होऊन बघत होत्या...

------

अपूर्वाच सायन्स ग्रॅज्युएशन झालं होतं. लगांचे निरोप यायला लागले होते आणि पहिलच स्थळ सारंग च समोरूनच चालून आलं..

धाड धिप्पाड, सहा फुटांवर उंची असलेला, सारंग उच्च शिक्षित, शिवाय चांगली नोकरी सुद्धा होती. रहायला चांगल मोठं स्वतःच घर होतं, घरातले सगळेच उच्च शिक्षित, आणि सुस्वभावी होते. नाही म्हणायला तशी काही जागाच नव्हती.


"घराणं चांगल आहे", मध्यस्थ्यांनी खात्रीशीर शब्द टाकला. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेऊन, थोडी जुजबी माहिती काढून दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने अपूर्वा आणि सारंगच लग्न ठरलं...

आता आता तर नावं काढलं आणि एवढ्यात लग्न ठरलं सुद्धा अपूर्वाला विश्वासच बसत नव्हता. एक महिन्यानंतरचा मुहूर्त निघाला होतं..

मुलगा बघायला आला म्हणून लगेच का लग्न ठरतं का? नाव काढल्यावर, हा हा म्हणता म्हणता वर्ष उलटून जाईल. घरचे सगळे सगळे म्हणायचे.

पण झालं उलटच, पहिलंच स्थळ बघून गेलं आणि लगेच होकार आला आणि लग्न ठरलं सुद्धा.

लग्न ठरल्या लगेच, एवढ्या हार्ड अँड फास्ट, महिन्याभरात लग्न... थोडी घाई होणार होती. अपूर्वा गोंधळून गेली होती.

"लग्न आणि एवढ्या कमी वेळात!"

"लग्नाची एवढी तयारी, एवढ्या कमी वेळात, कशी काय होणार? अपूर्वाच्या घरच्यांना या गोष्टीचं टेन्शन आलं होत.

"कमी वेळ असल्याने मुलाकडच्या पाहुण्यांचा मानपान, आदर सत्कार घेण्या देण्यात काही कमी राहिलं तर काय?" अपूर्वाच्या घरी दडपण आलं होतं.

"लग्न म्हणजे दोन कुटुंबाचा आनंद सोहळा".

"आनंदाने मिळून करू?

"आमची तशीही काही मागणी नाही."

"महिना आहे अजून, होईल सगळं" सारंगच्या वडिलांनी शब्द देऊन अपूर्वाच्या घरी सर्वांना आश्वस्त केलं होतं.....

महिन्याभऱ्यात दोघांना तशी एकत्र भेटण्याची संधी मिळाली नव्हती. एक दोनदा खरेदीच्या निमित्ताने तेवढी दोघांची सर्वासमक्ष भेट झाली होती फक्त.

अग्नी आणि देवा ब्राम्हणांच्या आप्तेष्टांच्या साक्षीने आणि आशीर्वादाने दोघे विवाहाच्या पवित्र बंधनात बांधल्या गेले.

अपूर्वाच्या आईवडिलांनी सुद्धा लग्न सोहळ्यात, मानपानात काहीच कमी ठेवली नव्हती. आनंद सोहळा अगदी तोडीस तोड पार पडला होता.

निरोपाच्या प्रसंगी, हळवी झालेली, सासरी उंबरठयावरच माप ओलांडताना.. गोंधलेली, अवघडलेली अपूर्वा .. तिचा हातात घेत तिला आधार देत सारंगने तिला सावरलं..

आणि अपूर्वा.. चा गृह प्रवेश झाला. लक्ष्मीच्या पावलांनी माप उलथून ती घरात आली होती.

वाचत राहा पुढच्या भागात.
-©®शुभांगी मस्के...


फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या

Subscription Plan

0

🎭 Series Post

View all