ही लग्नाची बेडी
भाग २
-©®शुभांगी मस्के...
लग्न म्हटल तर घाई, गडबड, पाहुण्यांची वर्दळ नुसती. आणि एकामागून एक होणारे विधी... दिवसभर्याचा थकवा होताच.
अपूर्वा फ्रेश झाली, सर्वांची जेवण खावण आटोपली. झोपायची वेळ झाली होती. पाठराखीन म्हणून सोबत आलेल्या अपूर्वाच्या बहिणीचा, अंथरुणावर पडल्या पडल्या लगेच डोळा लागला. अपूर्वाला मात्र काही केल्या झोप येत नव्हती.
इकडला कड तिकडे पलटताना. हातातल्या बांगड्यांची किणकिण तर मधूनच पायातल्या पैंजनांची रूनझून.. अधूनमधून हळुवार बाहेर ऐकू येत होती.
सुमनताईंनी सहज, रूममध्ये डोकावलं
"का ग पूर्वा... झोप येत नाही आहे का?" सासूबाईंच्या आवाजाने, अपूर्वा उठून बसली.
"नाही ना आई?"
"झोपच येतच नाही आहे, डोळे जड झालेत पण डोळ्याला डोळा लागला नाही....!!" अपूर्वाने सांगितलं.
"अगं, नवीन आहे घर, नवीन माणसं, वातावरण ही बदललंय, त्यामुळे नसेल लागत झोप"
"थोडा रुळायला वेळच लागेलंच गं"... सुमनताई रूममध्ये पूर्वाच्या जवळ येऊन बसल्या.
"मुळीच आयुष्यच गं, जन्म एका घरी, एक दिवस लग्न होऊन सासरी जायचं आणि तिथेच राहून जायचं". त्याच घराला आपलं मानायचं.
"ज्या घरात लहानच मोठ होतो, जे घर आपल्याला ओळख देत, ज्या घराच्या भिंतींनी आपल्याला हसताना, बागडताना, खेळताना, धडपडताना ही बघितलय."
"बहीण भावंडंसोबत मज्जा मस्तीत भांडताना, पकडपकडी करताना, घराच्या कोपऱ्या कोपऱ्याने साथ दिली."
"आईवडील, बहीण भावंडं, अगणित आठवणी सोडून मुलीला आपल्या नवऱ्याचा हात पकडुन सासरी जावं लागत. तेच घा जे आपलं हकाकच होत, एक दिवस चार अक्षता डोक्यावर पडल्या की लगेच परक होऊन जात"....
"नवीन जागी रुळायला, आठवणी गोळा होण्यासाठी, वेळ तर द्यायलाच हवा ना बाळा!"........ बोलताना सुमनताई हळव्या झाल्या..
हक्काच्या घराला क्षणात असं परक संबोधून "माहेर" म्हणवल्या गेलेल तिचं तेच हसरं घर डोळ्यासमोर उभ राहीलं आणि अपूर्वाच्या डोळ्यात पाणी तरळलं.
सुमनने, अपूर्वाच्या डोळ्यातलं पाणी हलकेच पदराने टिपून घेतलं. मायेने तिला जवळ घेतलं. अपूर्वाने सासूबाईंच्या खांद्यावर हलकेच डोकं टेकवलं. आईच्या मायेने त्या अपूर्वाला हळूहळू थोपटत राहिल्या.
सुमनताई बोलायला लागल्या,
"सारंगच्या पाठी, मुलगी हवी होती मला, तशी आसंच लागली होती मला"
"सारंगच्या पाठी, मुलगी हवी होती मला, तशी आसंच लागली होती मला"
"पण देवाची मर्जी काही वेगळीच होती."
"दुसऱ्या वेळी समीर आणि पाठोपाठ सुमित ही."
"मुलगी हवी, जी माझं सुख दुःख वाटून घेईल, मी न सांगता माझ्या मनातलं ओळखून घेईल." असं अनेकदा वाटायचं.
"एवढी वर्ष, माझ्या आयुष्यात एका अर्थी अधूरेपणच राहिलं होतं."
"तू आलीस आणि आता तूझ्या रुपात लेकीची कमतरता भरून निघणार" बोलताना सुमनताईंच्या डोळ्याच्या कडा पाणावल्या...
बोलतच होत्या तर त्यांना जोरात ठसका लागला. अपूर्वा लगेच पाणी आणायला किचनमध्ये गेली....
"अगं अगं...हळूहळू, अंधारात धडपडशिल उगाच," सुमनताई अपूर्वाच्या पाठोपाठ किचनमध्ये आल्या.
अपूर्वाने, सुमनताईंच्या हातात पाण्याने भरलेला ग्लास दिला. सुमनताई, घटाघटा.. वरून पाणी प्यायला लागल्या.
आई, हळू प्या... बसून घ्या म्हणत.. तिने डायनिंगची खुर्ची पुढे केली. ग्लासभार पाणी स्वतःसाठी पण काढलं.
"अगं, असं उभ्याने नको पिऊस पाणी", "बसून पी".. ये इथे बसू...
घरात किचनमधुनच, स्टेअरकेस वर गेल्या होत्या. दोघीही स्टेअरकेसवर बसल्या.
छान मोकळं मोकळं वाटत होतं तिथे बसून... पायऱ्यांत असलेल्या खिडकीतून छान झुळझुळ हवा येत होती.
'छान आहेत पायऱ्या, किती छान वाटतंय इथे बसल्यावर.. आवडल्या मला'
'स्वयंपाक करताना, काम उरकताना, थकल्या भागल्याला, जरावेळ टेकायला किंवा निवांत बसायला ही किती मस्त आहेत'...
'कदाचीत या घरात, माझी ही सर्वात लाडकी जागा असणार'. अपूर्वा विचारात रमली.
'घर मोठ, छान प्रशस्त होतं. सगळ्या वस्तू कशा जागच्या जागी ठेवल्या होत्या. पाहुणे होते घरात पण इकडची वस्तू तिकडे नव्हती. संपूर्ण घरावरून तिने, नजर फिरवली.
'आता हेच माझं घर, माझं सासर'.. त्याच क्षणी जणू ती सुखी संसाराच्या स्वप्नात रममाण झाली.
"काय झालं ग पूर्वा".... सुमनताईंनी विचारलं..
"काही नाही!" अपूर्वाने हलकेच मान डोलावली.
"मी तुला पूर्वाच म्हणणार"...
"मला पूर्वाच म्हणायला आवडतं, शॉर्ट अँड स्वीट आहे छान"
"चालेल ना तुला?" सुमनताईंनी विचारलं.
" हो चालेल ना" म्हणत... पुर्वाने मान हलवली.
"शाळा, कॉलेजमध्ये सगळे प्रेमाने "अपू" म्हणायचे."
"आज तुम्ही पूर्वा!"
"मला पूर्वाच नाव आवडतं."
"लग्नानंतरच्या सगळ्या डॉक्युमेंट्सवर मी स्वतःच नाव पुर्वा टाकणार आहे, बदलवून टाकणार आहे मी नाव.
'पुर्वा सारंग देवधर'.... अपूर्वा स्वतःशीचं पुटपुटली.
आजकाल बाई पोरींना.. नाव बदलवायला मुळीच आवडत नाही, काय ती त्यांचं नाव त्यांची आयडेंटिटी वगैरे.. सुमन ताई बोलल्या..
पण हे माझच नाव आहे... फक्त शॉर्ट अँड स्वीट आहे... अपूर्वा बोलली....
लग्न झाल्या झाल्या आयुष्य कसं बदलल्या सारखं वाटतंय. हातात हिरवा चुडा, गळ्यात भल्ल मोठ भरगच्च सोन्याचं मंगळसूत्र.. ही साडी, तिने खांद्यावरचा पदर सावरला.
"आता माहेरी गेलीस की.. ड्रेस घेऊन ये तुझे... साडी वगैरे, आल्यागेल्याला नेस" सुमन ताईंच्या बोलण्यावर पुर्वा ने हलकेच मन डोलावली.
-©®शुभांगी मस्के...
फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या
Subscription Plan
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा