Login

ही लग्नाची बेडी.. भाग ३

पूर्वाच्या रुपात त्यांना एक लेक आणि एक हक्काची मैत्रीण मिळाली काय असा वाटत होतं
ही लग्नाची बेडी

भाग ३

-©®शुभांगी मस्के...


" एवढी रात्र झाली"

"झोपायच नाही का तुम्हाला?"

"काय करताय एवढ्या वेळच्या?"

"जा झोपा, रात्र झाली खूप" बाहेरून आलेला सारंग एवढं बोलून बाजूच्या रूममध्ये, आला तसा निघून गेला.

पुर्वा तिथेच पायऱ्यांवर बसली आहे. त्याच्या गावात ही नव्हतं...

सारंगच्या मागोमाग समीर, सुमित ही बाहेरून आत आले होते. हॉलमध्ये अंथरलेल्या गाद्यांवर जागा पकडून दोघेही तिथेच झोपले.

"ही बघ,अशी असतात मुलं"..

"स्वतःतच हरवलेली असतात"...

"कधी येतात, कधी जातात.. काही मोजमाप नसतं त्यांच्या वागण्या बोलण्याला"

"तीन मुलं पदरात पण सुख दुःख वाटून घ्यायला, मनातलं बोलायला कुणीच नाही" बोलताना सुमनताईंना गहिवरून आलं.

पुर्वाने सासूबाईंचा हात हाती घेवला. त्यांनी ही पुर्वाचा हात घट्ट पकडुन ठेवला.

"आता तू आली आहेस ना"

" माझी लेक"

"माझं ऐकुन घेणारी, जिच्याजवळ मी मनातलं, निर्धास्त होऊन बोलू शकेन"

"तू काहीच टेन्शन घेऊ नको"

"पुढे शिकायची ईच्छा असेल तर बिनधास्त शिक, नोकरी करायची असेल तर नोकरी कर"

"घर सांभाळायला मी आहे!".

"मी सांभाळून घेईल सगळं"..

"आजच्या जगात, प्रत्येक मुलीने आपल्या पायावर उभ राहायला हवं." सुमनताई, भरभरून बोलत होत्या, बोलून मन रीतं करत होत्या.

पुर्वाच्या रुपात त्यांना आज लेक आणि हक्काची मैत्रीणच मिळाली की काय असं वाटतं होतं.

'एवढ्या रात्री, सारंग बाहेरून आले... जरा म्हणून, नजर वर करून बघितलं सुद्धा नाही त्यांनी माझ्याकडे.'

'दुर्लक्ष करून आत निघून गेले'

" मी बसली आहे, त्यांचं लक्ष नसेल" पुर्वा ने स्वत:ची समजूत काढली.

एक लांब जांभई आली तशी, पूर्वा झोपायला रूममध्ये गेली, काहीच क्षणात निद्रादेवीने अपूर्वाला ताब्यात घेतलं.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी, सत्यनारायण पूजा आटोपली. खऱ्या अर्थाने सारंग आणि पूर्वाच्या नवीन आयुष्याची आजपासून सुरुवात होणार होती.

लग्नानंतरची आजची पहिली रात्र, दोघे एकत्र असणार होते. सुमनताईंनी, सुंदर हिरवी साडी पुर्वाला नेसायला दिली. छान तयार व्हायला सांगितलं. फळा फुलांनी, गर्भधान संस्काराची ओटी भरली... समीर आणि सुमित ने रूम ही छान फुलमाळांनी सजवली होती.

सगळे, झोपायला चालले गेले, पूर्वा एकटीच रूममध्ये सारंगच्या येण्याची वाट बघत बसली. बराच वेळ निघून गेला तरी सारंग आला नव्हता. सासूबाई चार दा डोकावून गेल्या होत्या.

आज मित्रांसाठी त्याने बाहेर हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती. सासू सासऱ्यांनी फोन ही फिरवले होते. दोन दा तर सुमनताई रूममध्ये डोकावून ही गेल्या होत्या.

अखेर बराच उशिरा, तोंडात काही तरी चघळतच सारंग रूममध्ये आला....

आल्या आल्या.. खाडकन, रूमचा दरवाजा बंद केला.

बेडवर बसलेल्या पुर्वाच्या अगदी जवळ येऊन बसला... कसलासा परफ्यूम वजा, वेगळाच दर्प त्याच्या अंगातून, कपड्यातून येत होता.

काही वेळ रूममध्ये शांतता.. ती ही शांत बसलेली आणि ती ही....

काय होईल पुढच्या भागात, धन्यवाद