ही लग्नाची बेडी
भाग ४
-©®शुभांगी मस्के...
अपूर्वा....
"आजपासून, आपण आपल्या आयुष्याची नवी सुरुवात करतोय"
"आपल्या नात्यात, कुठलीच उघडझाप नको, लपवाछपवी नको असं मला वाटतं."
"ही नवी सर्वात कशी, स्वच्छ असायला हवी. माझ्याबद्दल तुला आणि तुझ्याबद्दल मला सगळ माहिती असायला हव"
"शिक्षण, घरदार, घराणं बऱ्यापैकी... सगळं माहिती आहेच पण".... आणि बोलता बोलता सारंग गप्प झाला.
"आता, या वेळी नवरा काय सांगेल, खाली मान टाकून, पुर्वा लक्ष देऊन ऐकट होती"...
'पूर्वीच्या अफेअर बद्दल वगैरे किंवा लग्नात काही चुकलं काही कमीजास्त तर झालं नसेल ना.. काही खटकल असेल का?'
'मी नक्की आवडते ना त्यांना, की अजून काही". पूर्वीच्या मनात विचारांच जाळ तयार होऊ लागलं. तोच तो बोलू लागला.
"हे बघ, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये मी जॉब करतो"...
"चकाचोंद दुनियेशी आमचा संपर्क अगदी स्वाभाविक"
"लेट नाईट पार्ट्या वगैरे त्यातलाच हिस्सा, परिणामी smoking, drinks आमच्या आयुष्याचा हिस्साच बनतो."
"आम्ही कधी त्याच्या आहारी जातो, व्यसनाच्या आधीन होतो, कधी हे व्यसन आमच्यावर ताबा घेत, आम्हालाच कळत नाही."
"कोणताच माणूस कधीच वाईट नसतो, वाईट असतात ती त्याला जडलेली व्यसन....!"
"'वरा, हे असं काय बोलतोय',
'व्यसन वगैरे'...
'पण मध्यस्थ्यांनी तर... खात्री दिली होती, मुलगा चांगला आहे म्हणून'.
'थोडी माहिती पण काढलीच होती आईबाबांनी.' बुचकळ्यात पडलेल्या पूर्वाचा त्याने हात हातात घेतला..
"या सगळ्यातून मला बाहेर पडायचंय"
"करशिल मला मदत?"
"देशील एक संधी?"
"सांभाळशिल मला, देशील मला साथ?" त्याने पटापटा प्रश्न केले.
सप्तवपदीची पावलं सोबत चालताना, निरंतर साथ देण्याच एका दिवसापूर्वी दिलेलं वचन....पूर्वाची परीक्षाच घेत होत.
"हळूहळू होईल माझं व्यसन कमी, मी प्रयत्न नक्की करेन, करतोय" सारंग केविलवाण्या सूरात बोलत होता.
बोलता बोलता, काहीशा बेचैन त्याने, दुसऱ्याच क्षणी खिशातली सिगरेट काढली, त्यावर लायटर लावलं.
उठून खिडकीजवळ गेला आणि खिडकीच्या बाहेर, सिगरेटचे लांब लांब झुरके हवेत उडवू लागला.
पुर्वाला विश्वासच बसत नव्हता. एकटक एका जागी नजर खिळवून, स्तब्ध तशीच ती बसल्या जागी बसून राहिली.
रस्त्यावरच्या सिगरेट, खऱ्यार्याच्या वासाने डोकं, दुखणारी ती.. रुममधल्या त्या घाणेरड्या वासाने चिडचिड होणाऱ्या तीच्या अक्षरशः पायाखालची जमीन सरकली होती.
तिला त्या वासाचा काही त्रास होत असेल त्याच्या गावात ही नव्हतं.
तिला जोरात ठसका लागला.... त्याने लगेच सिगारेटच उरलेलं थोटुक खिडकीतून बाहेर फेकलं. पसरलेल्या धुव्याला त्याने हातानेच उडवलं.....
सॉरी.. मला माहिती नव्हतं, तुला त्रास होतो या धुव्याचा... त्याने पाण्याचा ग्लास तिच्यासमोर धरला...
आजपासून लक्षात ठेवीन, म्हणत.. रूममधल्या बाकीच्या खिडक्या उघडल्या.
पुर्वाच्या डोळ्यात पाणी तरळल होतं.
"हे सगळं लग्नापूर्वी, पहिलेच नाही सांगावं वाटलं का तुम्हाला?"
तिने विचारलेल्या प्रश्नावर त्याने... "फक्तच देशील मला साथ?" "बदलायचय मला म्हणत,"... तिच्यासमोर, तिच्या उत्तराची वाट बघत जवळ बसला.
"लपवायच असतं तर आज ही लपवू शकत होतोच. पण मी सांगितलं तुला.. "देशील मला एक संधी"..
त्याने तिचा हात हाती घेतला. "प्रेम करतो मी तुझ्यावर खूप, देशील मला साथ". तो बोलत होता.
काय करावं तिला काहीच कळत नव्हतं. द्विधा मनस्थितीत अडकलेल्या तिला त्याने जवळ घेतलं. नवरा म्हणून लग्नानंतरच्या पहिल्या रात्री, आपला पुरुषार्थ गाजवत तिच्यावर हक्क गाजवायला तो विसरला नव्हता.
"पिणारा प्रत्येकच माणूस वाईट कुठे असतो"
"बाबा पण पितातच ना, अनेक जण पितात... व्यसन सगळेच करतात, म्हणून काय व्यसनी असतात का?" अशी एक ना अनेक उदाहरणं, तीच्या डोळ्यासमोर तरळत होती. डोळ्यात झरणाऱ्या आसवांना, डोक्याखालची उशी आपल्यात सामावून घेत होती. तीच्या बाजूला तो मात्र गाढ झोपी गेला होता.
-©®शुभांगी मस्के...
फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या
Subscription Plan
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा