ही लग्नाची बेडी
भाग ५ ( अंतिम)
-©®शुभांगी मस्के...
सून,बायको म्हणून, सासरी रुळायच्या आत महिन्याभऱ्यात येणाऱ्या पाहुण्याची चाहूल लागली.
नवीन पाहुणा येणार आता तेरी जबाबदारी कर्तव्याची जाण त्याला होणार असच सर्वांना वाटत होतं.
तोही तिची खूप काळजी घेत होता. तिला हवं नको ते बघत होता. तिला त्रास होणार नाही या गोष्टीकडे जातीने लक्ष देत होता.
वर्षभऱ्यात, दोनाचे तीन झाले. नवीन पाहुणा आयुष्यात आल्याने ती आता पूर्णपणे बाळात गुंतत चालली होती.
मध्यंतरी, बाळाला सांभाळून पूर्वाने तिचं पुढचं शिक्षण पूर्ण केलं होतं. सासू सासऱ्यांच्या मदतीशिवाय हे केवळ अशक्य होतं.. ती आता नोकरी सुद्धा करार होती.
तिच आयुष बदललं होतं, नवऱ्याच व्यसन मात्र कमी झालं नव्हतं. त्याच्या स्वभावातला चिडचिडेपणा वाढत चालला होता.
प्रेमाच्या बेड्यात अडकवण्याचा प्रयत्न ही ती करायची पण सगळचं निरर्थक होतं.
नवऱ्याला सुधारण्याच्या दृष्टीने, त्याला दिलेल्या संधीची वेळ येण्याची मात्र ती वाट ती प्रत्येक दिवशी बघतच राहिली.
तिच्या आयुष्यावर खूप मोठ प्रश्नचिन्ह उभ होतं. सारंगपासून दूर, त्याला सोडून माहेरी निघून जायचा विचार तिचं मन पोखरत होतं.
आणि एक दिवस तिने निर्णय घेतला. ती निघून गेली त्याच्या आयुष्यातून, कायमची परतून न येण्यासाठी....
अचानक एक दिवस सारंगची तब्बेत बिघडली. डॉक्टरांनी माईल्ड हार्ट अटॅक येऊन गेल्याच निदान केलं. टेन्शन येणार नाही त्या दृष्टीने काळजी घेण्याचा सल्ला आणि व्यसनापासून दूर राहाण्याची सक्त ताकीद सारंगला दिली.
"तू समजदार आहेस"
"तू समजदार आहेस"
"त्याला सांभाळून घे,"
"आम्ही आहोत तूझ्या पाठीशी, सगळं होईल छान,"
"हे दिवस निघुन जातील".. सासू सासऱ्यांनी पुर्वा ला समजावलं.
पुन्हा एक संधी देण्याच्या विचारात... अखेर, पुर्वा सारंगच्या आयुष्यात पुन्हा परतली.
------
संसाराला लागल्यावर सगळेच बदलतात, सारंग ही बदलेलं या हेतूने मुलाच लग्न लावून दिलं. चुकलो आपण..
"एका मुलीचं आयुष्य खराब केलं" या गोष्टीचा, पश्चाताप पुर्वाच्या सासुसासऱ्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसायचा. मुलाच्या व्यसनसमोर, वागणुकीमुळे दोघेही हतबल झाले होते.
व्यसन सोडायचं तर.. बाहेर जाणं टाळायचं... उगाच पार्ट्याची आमिष टाळायची, त्याने त्याची चांगली नोकरीच सोडून दिली. आता त्याच्या जवळ नोकरी पण नव्हती.
पोटच्या पोराच्या व्यवहाराने त्रस्त, समजावून समजावून थकलेले, अनकष्टी, ऐतखाऊ झालेल्या मुलाच्या व्यवहाराने संतप्त सासू सासऱ्यांची पुर्वाला आता काळजी वाटतं होती.
लहानसा जीव, जबाबदाऱ्यापासून पळवाटा काढणारा नालायक मुलगा, दुसऱ्याच्या मुलीला फसवल्याच गील्ट सासू सासऱ्यांच्या नजरेत दिसायचं.
एक दिवस अचानक पाठीशी खंबीरपने उभे असलेले पुर्वाचे सासरे, हे जग सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेले.
अशापयशाच खापर दुसऱ्यांच्या माथी मारून सारंग फक्त च कारण शोधत राहिला. नोकरीतली धरसोड वृत्ती, जॉब मिळायला अवघड होऊ लागलं.
------
नवऱ्याची ऐतखाऊ वृत्ती, अन्कष्टी, तिरकस स्वभाव पूर्वाला या गोष्टीचा तिरस्कार वाटायचा. मुलाला घेऊन नवऱ्याशी असले नसलेले सगळे संबंध तोडून टाकुन नव्याने एक एक नवी सुरुवात करावी. पुर्वाला अनेकदा वाटत होतं.
दुसऱ्याच क्षणी, केविलवाण्या नजरेने, तिच्याकडे खूप आशेने बघणारी, नवऱ्याच्या जाण्याने दुःखी असलेली खचलेली सासू डोळ्यापुढे यायची. वेळोवेळी मदतीला धावून येणारे दिर समीर आणि सुमित आठवायचे.
"या माझ्या घराला तूच एकटी सोबत बांधून ठेऊ शकतेस. ती ताकद तूझ्या एकटीतच आहे, सांभाळशील ना बेटा!" दीनपणे बोलणारे हतबल सासरे तिच्या डोळ्यासमोर दिसायचे.
मुलांसाठी आईवडील दोघेही महत्वाचे. वडील असताना मुलांना वडीलांपासून वंचित का ठेवावं? दोघांचं प्रेम त्या जीवाला मिळावं. म्हणून ती एक एक दिवस त्या घरात कंठत गेली.
कारण काही का असेना.. स्वतःच्या पायावर उभी असलेली, स्वतंत्र पूर्वा.. आजही सारंगचा संसार सांभाळत होती.
कारण काही का असेना.. स्वतःच्या पायावर उभी असलेली, स्वतंत्र पूर्वा.. आजही सारंगचा संसार सांभाळत होती.
"चुक की बरोबर"....
"काय करायला हवं होतं"... यावर फार विचार करायचा तिने आता सोडून दिला होता.
आज सुट्टीचा दिवस हेरून तिने, कपाटाची आवराआवर काढली होती.
लग्नाच्या शालुची घडी बदलवली... थोडा हवेशीर ठेऊन, तिने निगुतीने त्याची घडी घातली. लग्नाच्या फोटोवरून हात फिरवताना, तिने बघितलेल्या स्वप्नांचा चुराडाच झाल्याची फिलिंग, येत असली तरी, स्वतःच्या प्रारब्धाला दोष देत... ती सगळी आवराआवर करत होती.
सासूबाईंनी... पुर्वाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या पण कुठे तरी.... नजर चोरून, लेक म्हणून लग्न करून आणलेल्या सुनेला तिच्या हक्काचा आनंद तिच्यापासून हिरावून घेतल्याच गिल्ट.. तिच्या आजच्या परिस्थितीला जबाबदार आपणच असल्याचं गील्ट.. सुमन ताईंच्या डोळ्यातून अश्रू रुपात वाहत होतं.
"ही लग्नाची बेडीच तर होती..…....नाही का?"
"हा वनवास च तर होता.. न संपणारा"..... दोघी ही फक्त च अल्बम मधल्या आठवणींवरून हळुवार हात फिरवत होत्या.
------
कथेतल्या पुर्वाला अनेक जण दोषी ठरवतील? एवढं सोशिक राहून काय फायदा?..
मग तीच्या शिक्षणाचा तरी काय फायदा? असं ही अनेकांना वाटेल.....
पण प्रामाणिकपणे संसारात वाहून घेतलेल्या, नवऱ्याच्या लाख चुका पोटात घेऊन.... आपल्या मुलापासून निदान वडिलांचं प्रेम हिरावून घेण्याचा अधिकार आपल्याला नाही. या विचाराची पुर्वा..... अनेक मार्ग समोर उभे असताना, का तिने हे आयुष्य स्वतःसाठी निवडलं असेल.......
एका हाताने संसाराचा गाडा ओढण्यास, सर्वार्थाने सक्षम असलेली.... पूर्वा.....
"ही लग्नाची बेडी..... !!" जगण्याचा आनंद हिरावून घेत असेल तर.... नक्की काय करावं!" कथेच लेखन करताना मी अनुत्तरीत झाले .......
कथा काल्पनिक असली तरी, कमी अधिक प्रमाणात अशा अनेक सोशिक पुर्वा.. आपल्या आजूबाजूला नक्की असतील. काय सुचवाल तुम्ही या पुर्वाला... तिचा निर्णय योग्य की अयोग्य.... तुम्हाला काय वाटतं...
तुमच्या प्रतिक्रियांची प्रतीक्षा राहील. धन्यवाद....
समाप्त
-©®शुभांगी मस्के...
-©®शुभांगी मस्के...
फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या
Subscription Plan
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा