हिशोब 1

कोण खरं कोण खोटं
"दादा आम्ही सिनेमाला जातोय, यायला उशीर होईल..चावी सोबत नेतो.."

लहान भाऊ मकरंद आपला मोठा भाऊ परेशला सांगत होता..

मकरंद शून्यात नजर लावून सगळं ऐकत होता, बघत होता..कारण त्याच्या आयुष्यात आता काही उरलंच नव्हतं..घडून गेलेल्या गोष्टींचे तो हिशोब लावत बसला..

हे ऐकताच त्यांची आई किचनमधून तावतावात बाहेर आली,

"सिनेमाला जाताय? मग संध्याकाळचा स्वयंपाक कोण करणार?"

"आम्ही बाहेरून जेवून येणार आहोत, संध्याकाळी तुमच्यापुरतं करून घे.."

"वा..छान.. म्हणजे आहेच मी राबायला.."

"आई एक दिवस करावं लागतंय तर काय एवढा इश्यू करतेय?"

"हो हो, एका दिवसाचं आहे का हे? मागच्या आठवड्यात हिच्या बहिणीच्या लग्नाला गेलेले ..तेव्हाही तेच.."

"आई तुझी बडबड बंद कर, वाजलेत किती? संध्याकाळचे पाच वाजलेत, यावेळी स्वयंपाक केला तर आणखी तूच ओरडणार की आम्हाला गार स्वयंपाक आवडत नाही, गरमागरमच लागतं. उगाच जायच्या वेळी कटकट घालत जाऊ नकोस, पुन्हा सांगणार नाही..चल गं रेश्मा.."
******

🎭 Series Post

View all