हिशोब 3

कोण खरं कोण खोटं
सासूबाईंनी तिला थांबवायचा, मुलाचा संसार वाचवायचा प्रयत्न तर केला नाहीच, वर परेशलाच समजावलं, की अवदसा निघून गेली तुझ्या आयुष्यातून.. आता तुझं आयुष्य सुखी होईल...

परेशने आईवरच विश्वास ठेवला, त्याने कधी तिला संपर्क केला नाही..

हळूहळू मात्र त्याला कळू लागलं, की तो एकटा पडलाय..त्याला साथीदाराची गरज आहे..त्याला बायकोची आठवण यायची, पण आईचे शब्द आठवायचे आणि त्याचं मन पुन्हा कलुषित व्हायचं..

पाच वर्षांनी त्याच्या धाकट्या भावाचं, मकरंद चं लग्न झालं तेव्हा मात्र त्याला जाणीव झाली, मकरंदच्या बायकोपेक्षा त्याची बायको कितीतरी पटीने सरस होती..घरकामात तर चांगली होतीच पण सहनशील होती, पैसेही कमवायची..याउलट मकरंद ची बायको एक शब्द कुणाचा ऐकून घ्यायची नाही, घरकाम तर सासुलाच सगळं करावं लागे...

त्याने त्याच्या डोळ्यादेखत पाहिलं, आई मकरंदला सुद्धा त्याची बायको किती नीच आहे हे दाखवून द्यायचा प्रयत्न करत होती..पण मकरंद ठाम होता, आपल्या बायकोवर प्रेम करणारा, तिची ढाल बनून राहणारा आणि तिची किंमत करणारा होता..कोणी काहीही बोलू देत, दोघेही तिसऱ्या व्यक्तीचं ऐकून एकमेकांचं नातं कधीच खराब करत नव्हते...

परेशला हळुहळु जाणीव झाली,

कोण खरं होतं आणि कोण खोटं.. आपण काय गमावलं याची त्याला आता खरोखर जाणीव होऊ लागली,त्याक्षणी आपण बायकोची ढाल बनलो असतो तर? तिच्यावर विश्वास ठेवला असता तर? तिची साथ दिली असती तर??

त्याचा आईवरचा राग वाढत चालला होता, आईलाही लक्षात आलं..हा आता आपलं ऐकणार नाही म्हणून,

म्हणून आई त्यालाही बोलू लागली,

"पोराने स्वतःचा संसार काही टिकवला नाही, त्याच्या बरोबरच्या मुलांना दोन मुलं होऊन गेली..हा बसलाय असाच.."

हे ऐकून परेशच्या तळपायाची आग मस्तकात गेली, त्याचा संसार मोडायला कारणीभूत कोण ??

त्याने ठरवलं, आता बास...बायकोवर फार अन्याय केला मी..आता नाही...कावेरीला आता पुन्हा आयुष्यात आणेन.. तिला भरभरून प्रेम देईन..

त्याने तिचा नंबर लावला, फोन बंद..मेसेज जाईना..

सोशल मीडियावर शोधलं.. तिची प्रोफाइल दिसली...

एका देखण्या, हुशार मुलाने तिला जवळ केलं होतं आणि त्यांच्या एंगेजमेंटचे फोटो तिने टाकले होते...दुसऱ्या देशात दोघेही स्थायिक झालेले...

त्याच्या हातातून फोन गळून पडला..

त्याचा भाऊ आणि त्याची बायको रात्री उशिरा घरी आले, परेश गच्चीत उभा होता.. त्याने त्यांचं बोलणं ऐकलं..

"हे बघ रेशू, आई बडबड करेल..पण तू मनाला लावू नकोस, मी आहे तुझ्यासोबत..."

परेश मटकन खाली बसला...

हेच जर आपण पाच वर्षांपूर्वी आपल्या बायकोसाठी केलं असतं तर??

त्याने आज सगळंच गमावलं होतं..

लग्न झाल्यावर कोण खोटं आणि कोण खरं याची पारख करण्याची बुद्धी ज्या माणसाला नसते, त्याचा परेश होतो...

समाप्त

🎭 Series Post

View all