Login

होकार की नकार? भाग-१

होकार असेल की नकार?
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: होकार की नकार? भाग-१.

" हे बघ मला सर्व नीट लागतं. मी कोणतेही काम करणार नाही. तडजोड ही तुलाच करावी लागे. मी काही करणार नाही."  त्याने ठामपणे सांगितले.

मुलांची पत्रिका जुळलेली तसेच स्वतःहूनच चालून आलेले स्थळ यामुळे कावेरीच्या घरच्यांनी मुलाला आणि त्याच्या घरच्यांना कांदेपोहे कार्यक्रमासाठी घरी बोलावले होते.

प्रत्येक आई-वडिलांना मुलांचे लग्न व्हावे. आपल्या मुला- मुलींचे आयुष्य मार्गी लागावे असे वाटत असते, परंतु घरी आल्यापासून प्रत्येक विषयावर मोठेपणा सांगण्याच्या त्या मुलाच्या घरच्यांकडून वाटत होते. फक्त पत्रिकेचे गुण जुळले म्हणजे सर्व काही बरोबर आहे, असे होत नाही; त्यावर प्रॅक्टिकल विचार करणाऱ्या तिच्या वडिलांनी केला होता.

" लग्नानंतर दोघांनी मिळून सर्व गोष्टी करायच्या असतात ना ! थोडेफार मी जर तडतोड केली तर तुम्हाला सुद्धा करावी लागेल."  दोघांना बोलण्यासाठी एकांत दिलेला होता त्यामध्ये कावेरी बोलली.

" पहिले तर तू लग्नानंतर नोकरी करणार नाहीस, कारण माझा पगार त्यासाठी पुरेसा आहे आणि मी तुला पगाराचे चांगले पॅकेज देतोय ना?  तुला अजून काय हवं आहे?  तुझ्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या जातील. फक्त तुला घरातले काम करायचं आहे, ते पण नीट. बाकी मी कोणतीच अपेक्षा करत नाही आणि हो माहेरी जाणार वगैरे हेही मला ते सारखं बोललेले आवडणार नाही. भांडण सुद्धा मला माझ्या घरात केलेले आवडणार नाही. मला शांतता लागते."  गिरीश म्हणजे कावेरीला बघायला आलेला मुलगा म्हणाला.

कावेरीने त्याला जे काही प्रश्न विचारले होते, त्या प्रश्नांमधून त्याला त्यांनी स्पष्टपणे तो कोणती तडजोड करणार नाही, असे सांगितले होते. तसेच  तिच्या घरच्यांशी बोलताना सुद्धा त्याने विशेष रस दाखवला नव्हता.

ते लोक घरी यायच्या आधी कावेरीच्या घरच्यांना हेच मुलाचे स्थळ पसंत पडले तर बरे होईल, अजून मुलांची स्थळ पहावे लागणार नाहीत असा विचार केला होता. प्रत्येक वेळी आपल्याला हवे तसे घडतेच असे नाही आणि त्यामुळे जेव्हा पदरी निराशा येते तेव्हा खूप वाईट वाटते. तसेच काहीसे झाले होते.

भ्रमनिरास झाल्यावर पुन्हा त्या गोष्टींचा विचार सतत डोक्यामध्ये चालू होतो असेच काहीसे कावेरीच्या घरच्यांबाबत होत होते.

" तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता." दोघांचे बोलणे झाल्यानंतर कावेरीच्या आईने गिरीशच्या आईला विचारले होते.

" मला असे काही प्रश्न विचारायचे नाहीत. त्या दोघांना  पसंत असेल तर आम्हाला काहीच समस्या नाही. संसार दोघांना करायचा आहे."  त्याची आई हसतच म्हणाली.

" हो ना आणि माझ्या मुलाला पॅकेज सुद्धा जास्त आहे, त्यामुळे तुम्ही नीट विचार करा आणि हो, हे नातेसंबंध जोपासणे वगैरे हे फक्त बोलायच्या गोष्टी असतात." त्याचे वडील उपहासाने म्हणाले.

तिच्या नातेवाईकांपैकी काही लोक मुलाला प्रश्न विचारत होते, परंतु तो काही इतका उत्साही नव्हता आणि तो सोडून त्याचे वडीलच उत्तर देत होते. तसेच काही सांगायचे नसेल तर मस्करीच्या नावाखाली अपमान करत होते.

" ठीक आहे, तुमचा जो काही निर्णय असेल तो लवकर सांगा. पुन्हा माझ्या मुलाला त्याच्या कामाच्या ठिकाणी म्हणजेच बाहेरगावी जायचे आहे, त्यामुळे शक्यतो लवकर सांगितलं तर बरं होईल आणि मला माझ्या मुलाचे लवकरात लवकर लग्न करायचे आहे." असे त्याच्या वडिलांनी सांगितले.

" आमचा जो काही निर्णय असेल तो तुम्हाला सांगू." असे म्हणत कावेरीच्या वडिलांनी सुद्धा त्यांना निरोप दिला.

तो मुलगा आणि त्याचे घरचे गेल्यानंतर सगळेजण थोडेसे शांत होऊन बसले. मुलग्याचे पगाराचे वार्षिक पॅकेज चांगलं होतं. त्याची आई सुद्धा बोलायला ठीक वाटली, परंतु आतमध्ये या दोघांचे काय बोलणे झाले होते, याबाबत कावेरीच्या घरच्यांना माहीत नव्हते.

कावेरीच्या वडिलांनी शांतता भंग करत तिला विचारले,
" कावेरी, तुला मुलगा पसंत आहे का?"

क्रमशः

कावेरी या प्रश्नावर काय उत्तर दे काय उत्तर देईल?

©विद्या कुंभार.

कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
0

🎭 Series Post

View all