Login

हौलें हौलें हो जायेगा प्यार.. भाग 1

Hole Hole Ho Jayega Pyar
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद कथामालिका
हौलें हौलें हो जायेगा प्यार.... भाग 1


आज वाढदिवस एन्जॉय करावा मैत्रिणीं सोबत असे मनात ठेवून गौरी निघणार होती. इतक्यात,
गौरीची आई (मालती) - " काय गं कुठे निघाली?"

गौरी - "अगं सान्वीकडे नोट्स द्यायच्या, घ्यायच्या आहेत मला."

मालती - " लवकर ये बघ "

गौरी- "हो आई."

आज गौरीने डोळ्यात काजळ घातले, छान काठाचा ड्रेस घातला खास वाढदिवसाच्यासाठी घेतलेला, केसात मोगऱ्याचा गजरा माळला, झुमक्याचे मोत्यांचे कानातले घातले, गोरी गोमटी,नाक सरळ, डोळे पाणीदार मोठे, चंद्रकोर टिकली लावून मैत्रीणीना भेटून क्लासच्या नोट्स देणे घेणे करण्यासाठी सान्वीकडे निघाली. ऊन पडलं होत अचानक पावसाळी वातावरण झाले, ढग दाटून आले, विजाचा लखलखाट,कडकडाट झाला.

गौरी तिच्या गाडीवर बरीच लांब आली होती. आता सान्वीचे घर अजून लांब होते. घाई घाईत गाडी चालवताना अचानक जोरात पाऊस सुरू झाला. अडोशाला उभं रहायचं तर एक टपरी तिथे थांबावं म्हणून तिने गाडी लावली आणि उभी राहिली. पाऊस जोरात सूरू झाला. टपरी गळू लागली. थेट तिच्या डोक्यावर धार पडू लागली. थोडं बाजूला झाली. आता या पावसाचा राग येऊ लागला. एकतर अचानक आला सोबत रेनकोट वगैरे काहीच नाही. नवा ड्रेस खराब होईल. आई म्हणाली लवकर ये. आता काय करावं समोर रस्त्यावर बघता बघता पाणी साठलं अर्धा तास उभे राहून कंटाळली होती. काय करावं काही कळेना. इतक्यात त्या पाण्यातून एक भरधाव वेगात कार गेली. सगळे पाणी गौरीच्या नवीन ड्रेस वर तोंडावर उडताच ती जोरात ओरडली.
"ए.. दिसत नाही का आंधळ्या...." गाडी न थांबता निघून गेली.आता पावसाचा खूप राग येत होता.
त्याच टपरीत एक तरूण महेश पावसाचा आनंद घेत होता. त्याला मातीचा सुगंध मोहरून टाकत होता. त्याच टपरीत तो मस्त वाफाळलेली कॉफी सूररर आवाज काढून पीत होता तेवढ्यात गौरी आणि महेशची नजरानजर झाली. गौरीने ओले लांब केस जोरात झटकले पाणी महेशच्या तोंडावर आले. महेशला आतून आनंद झाला पण वर वर चूक आवाज केला.


महेशने आता टपरीच्या मालकाला विचारले " गरम कांदा भजी मिळतील का?"

मालक "हो" म्हणाला. महेश खूश झाला पाऊस, गरम भजी.. व्वा! "

टपरीचा मालक गौरीला "ताई बसा " म्हणाला तेव्हा गौरीने "नको" म्हणत नकारार्थी मान डोलावली.


क्रमशः


सौ. भाग्यश्री योगेश सांबरे
(सौ. भाग्यश्री चाटी सांबरे)
©®
0

🎭 Series Post

View all