Login

हौलें हौलें हो जायेगा प्यार.. भाग 2

Hole Hole Ho Jayega Pyar
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद कथामलिका
हौलें हौलें हो जायेगा प्यार.. भाग 2

टपरी मालक गरम गरम कांदा भजी, मिरची घेऊन आला.महेश खूश होऊन खाऊ लागला.पाऊस जोरात कोसळत होता.

गौरीच्या पायला उभे राहून कळ लागली. टपरीवर बसण्याचा अकवर्डनेस बाजूला ठेवून ती बसली. गरम भजीच्या वासाने गौरीची भूक चाळवली. आता तिलाही भजी खायची इच्छा झाली इतक्यात ज़ोरात कडकडाट झाला. गौरी घाबरून भानावर वर आली आणि घरी कसं जाणार याच्या विचारात तिने फोन काढला तो आईला कळवण्यासाठी इथे पावसात अडकली. परत विचार केला ती काळजी करेल. बाबांना कळवावे. इतक्यात पावसाचा जोर वाढला आणि गौरीचे नेट कव्हरेजच गेले. फोनच लागेना. आता संध्याकाळ, पावसामुळे अंधारून यायला लागले तशी गौरी घाबरून गेली.

इकडे महेशने अजून एक प्लेट कांदा भजी मागवली.
गौरीला काहीच कळेना. ती विचार आणि चिंतेत हरवली. तिला वाढदिवस, भूक, सान्वी, नोट्स सगळ्याचा विसर पडला. आता तिला घरी जायचे वेध लागले पण घरी जायचे कसे? इतक्यात अचानक लाईट गेली. आणि आता ती फारच घाबरली. फोनचा लाईट लावला बघते तर तिच्या मोबाईलची बॅटरी दहाच टक्के शिल्लक आता.

महेशचे मनसोक्त खाणे झाले. त्याने खूश होऊन टपरी वाल्याला त्याचे पैसे वर टीपपण दिली. महेश आपल्या जवळच्या पार्क केलेल्या एका कार मध्ये बसला, निघाला.

गौरीच्या मनात आले जे होईल ते आपण ही निघावं हो, नाही मनाच्या स्थितीत गाडी पर्यंत गेली आता गाडी काढणार एवढ्यात जोरदार पाऊसामुळे एक मोठं झाड अचानक गौरीच्या अंगावर, गाडीवर पडणार इतक्यात महेश कुठून तरी आला आणि तिला पटकन बाजूला ओढले. दोघे पुढे जाऊन खाली पडले. महेश खाली त्याच्या अंगावर गौरी कसेबसे पटकन दोघे उठले. तिचे केस त्याच्या जॅकेट मध्ये अडकले. दोघांनी कसेबसे काढले.


गौरीला काहीच कळले नाही.गौरी रागत महेशला - "कायं??" असे ओरडली.


महेशने तिच्या गाडीकडे बोट दाखवले. बघते तो तिच्या गाडीवर एवढे मोठे झाड पडले होते. तिचा जीव महेशने वाचवला होता.

सेकंदात घडला प्रकार तिला कळला आणि महेशला गौरी म्हणाली - "थँक्यू तुम्ही देवा सारखे आलात. माझा जीव वाचवला."

महेश - "इट्स ओके" म्हणाला.

पावसात थोडी बघ्याची गर्दी जमली कोणी छत्री घेऊन पाहत उभे होते. दोघे परत अडोशाला टपरीत गेले.

"आता माझी गाडी. कसे ते झाड काढायचे?."गौरी हतबलतेने म्हणाली

गर्दीतून दोन तीन जणांनी झाडाला हात लावला. झाड कोपऱ्यात बाजूला करू म्हणाले. अजून दोन तीन गाड्यावर झाड पडले होते.


क्रमशः

(सौ. भाग्यश्री चाटी - सांबरे.)
©®
0

🎭 Series Post

View all