Login

हौलें हौलें हो जायेगा प्यार.. भाग 4

Hole Hole Ho Jayega Pyar
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद कथामालिका
हौलें हौलें हो जायेगा प्यार भाग 4


" खूपच वेळ गेला, अंधार खूप झाला, आई -बाबा काळजी करत असतील, पाऊस थांबत नाहीये, लाईट गेली, विजांचा कडकडाट, लखलखाट सुरूच आहे, गाडी सूरू होत नाहीये , मोबाईल स्विच ऑफ झालेला कायं करावे? " गौरी काळजीनेच रडायला लागली.


महेशला कायं म्हणावं काहीच कळतं नाही. महेश त्याचा रुमाल देतो तेव्हा तिच्या मऊ स्पर्शाने त्याला शहारे येतात.

"प्लीज रडू नका. मॅडम मी माझ्या कारमध्ये तुम्हाला सोडू का? माझ्यावर विश्वास ठेवा. मी सुखरूप सोडतो तुम्हाला." महेश तिची समजूत काढत बोलतो.
रडल्यामुळे गौरीचे डोळे, नाकाचा शेंडा लाल बुंद झालेला पाहून महेश पाहतच राहतो.गौरी काय म्हणते त्याला काहीच कळतं नाही. तो फक्त ब्लँक होऊन गौरी कडेच पाहत राहतो.

" खरंच तुम्ही सोडाल मला घरी." गौरी मोठयाने,आशेने विचारते. महेश तिच्याकडे पाहत होकारार्थी मान डोलावतो.

"थँक्यू! आपण निघूयात का प्लीज?" गौरी विचारते महेश स्वतःला सावरत उठतो. गौरी त्याच्या मागे निघते.

महेश कारकडे जातो आधी तिच्या साईडने दार उघडतो. गौरी आत कारमध्ये पुढेच बसते. गौरी त्याच्या वागण्याने, आतापर्यंत केलेल्या मदतीने इंप्रेस होते. तिने माळलेल्या मोगऱ्याचा सुगंध महेशला मोहरून टाकतो. महेश आधी तिला बसवून मग महेश कारमध्ये बसतो. गौरी त्याला न्याहळते तेव्हा टी शर्टच्या छोटयाशा स्लीव मधून त्याचे बलशाली दंड, क्लीन शेविंग गौरीला आवडतात.

"थँक्यू! तुम्ही नसता तर मी कायं केले असते? तुमचं नावं काय? तुम्ही कायं करता?" गौरी त्याचे आभार मानून जुजबी प्रश्न विचारते.


" माझे नावं महेश जोशी. मी एअर फोर्स मध्ये विंग कमांडर आहे. सुट्टीवर आलो आहे. तुमचं काय नावं? तुम्ही काय करता?" महेश विचारतो.


" माझं नावं गौरी कुलकर्णी. मी एम ए इंग्लिश करते. तुम्ही एअर फोर्स मध्ये.. वॉव!! देशाच्या जवानांबद्दल आदर आहेच आणि असायलाच हवा." गौरी अजूनच इम्प्रेस होते.


गौरी आणि महेश दोघे एकमेकाकडे आकर्षित होतात.


तू मी आणि हा प्रवास

संपूच नये असं वाटत......

पावसात मंद धुंद
तुझा सहवास
जणू प्राजक्त गंध

तुझ्या स्पर्शाचा
हा वेडा भास
तू आहेस नक्की
की तुझा फक्त हा आभास....


क्षण क्षण मंतरलेला
तुझ्या अस्तित्वाने भरलेला
माझ्यात मी नुरतो जरासा
तुझ्या गंधात दरवळलेला....

तू मी नी हा पाऊस
सरींच्या साक्षीने जुळती हे बंध
खरेच कोणत्या जन्मीचे हे ऋणानुबंध???

( हि सुंदर कविता
रूह. ....❣️
रुपाली देव हंबर्डे )



गौरी रस्ता सांगते तिच्या घराकडे जायचा पत्ता सांगते. नेमकं त्याच रस्त्याने खूपच पाणी साठलेले असतं. तो रोड बंद झालेला असतो. आता लांबच्या रस्त्याने जायला महेश गाडी वळवतो.


क्रमशः
©®सौ भाग्यश्री चाटी सांबरे
0

🎭 Series Post

View all