चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद कथामालिका
हौलें हौलें हो जायेगा प्यार भाग 5 अंतिम
जलद कथामालिका
हौलें हौलें हो जायेगा प्यार भाग 5 अंतिम
गौरी पत्ता सांगते महेश म्हणतो , "इथेच जवळ राहतो मी आणि माझी फॅमिली."
"फॅमिली म्हणजे तुमचं लग्न झाले आहे का? " गौरी विचारते
"नाही . फॅमिली म्हणजे मी आणि मी माझे आई, बाबा." महेश हसून म्हणाला.
गाडी चालवताना एका मोठया वळणावर गाडी वळल्यामुळे अचानक गौरी महेशच्या जवळ आली. गौरीच्या हृदयाचे ठोकेच वाढले. तिचे तोंड त्याच्या दंडावर गेले. तिची चंद्रकोरची टिकली त्याच्या टिशर्टला चिटकली. दोघांना काहीच कळले नाही.
महेशला तिचा सुगंध, स्पर्श सुखवणारा होता. अचानक कळेचना सावरा - सावरी करत तो गौरीला म्हणाला - "प्लीज सीट बेल्ट लावा.लागेल तुम्हाला काही."
गौरीने सीट बेल्ट लावला.
गौरीने सीट बेल्ट लावला.
" उशीर होत आहे. पावसाचा जोर वाढला आहे. जवळचा रस्ता बंद असल्यामुळे फारच लांबून वळसा घ्यायला लागतोय." महेश गौरीला म्हणाला तशी ती म्हणाली "सॉरी सर माझ्यामुळे फारच त्रास झाला तुम्हाला."
"नाही.. मी हि इकडेच राहतो.बऱ्याच वर्षांनी लॉंग ड्राईव्ह झाली. भर पावसात. तुमच्या सोबत." महेश पट्कन बोलून गेला तसा गौरीच्या गालांवर लाजून गुलाब फुलला. ती गालात हसली, अबोल राहिली.
महेश मनातच विचार करू लागला 'कळलेच नाही चुकून मनातलं जास्तच तर नाही बोलून गेलो. हा हिच्या सोबत घालवलेला वेळ कायं भारी आहे. कसा योग जुळून आला आहे. हे पावसा सलाम तुला'
" पावसा तुझं येणं आणि न जाण
मोठा बहाणा मला मिळणं
मला प्रेमात पाडून असं वेड बनवण.
काय सांगू मनाचं कसं हे फसणं"
मोठा बहाणा मला मिळणं
मला प्रेमात पाडून असं वेड बनवण.
काय सांगू मनाचं कसं हे फसणं"
महेश मनातल्या मनांत बोलला इतक्यात गौरी शिंकली तसा महेश हसला.शेवटी घर आले.
आई घरात काळजी करत सोफ्यावर बसली. बाबा आत्ताच बाहेर शोधून घरी येऊन फेऱ्या मारत होते.
इतक्यात" आई -बाबा मी आले. " असे बोलतच गौरी आनंदाने घरात आली.
हुश्श! गौरीच्या आई, बाबांचा जीव भांड्यात पडतो. "
इतक्यात" आई -बाबा मी आले. " असे बोलतच गौरी आनंदाने घरात आली.
हुश्श! गौरीच्या आई, बाबांचा जीव भांड्यात पडतो. "
" आई ते सर कुठे गेले? " गौरी महेशला शोधत बाहेर येते तर तो कारमध्ये महेश असतो. गौरीला पाहताच महेश "येतो आता" म्हणतो.
गौरी म्हणते" नाही आत घरात या ना प्लीज "
महेश गाडी साईडला घेतो, घरात येतो.
महेश गाडी साईडला घेतो, घरात येतो.
तो येताच गौरी म्हणते" आई यांच्यामुळे माझा जीव वाचला, यांनीच मला सुखरूप घरी आणलं."
महेश लगेच म्हणतो ":व्वा.. कुलकर्णी मॅडम कशा आहात?" गौरीच्या आईच्या पायाच पडतो.
गौरीची आई मालती " सुखी रहा" आशीर्वाद देत म्हणते" "अरे तू महेश जोशी का? "
" हो मॅडम."महेश मान बोलावतो.
"हा महेश जोशी विद्यार्थी आहे माझा. माझ्या सगळ्यात आवडीचा, हुशार, ऑल राऊंडर." गौरीची आई बोलते.
"मॅडम लक्षात आहे? मी 2010 पास आऊट बॅच विद्यार्थी." महेश बोलतो.
"आई माझ्या अंगावर मोठ्ठे झाड पडणार होते यांनी मला वाचवलं, गाडी बंद पडली यांनी यांच्या कार मधून घरी आणून सोडले. रस्ते बंद लांबून आलो आम्ही. थंडी मुळे माझे दात वाजत होते यांचे जॅकेट आहे हे." गौरी अधीरतेने सांगते.
गौरीचे बाबा हे ऐकून महेशचे आभार मानतात.
"खूप आभारी आहे तुमचा. ऋणी राहील कायम तुमचा. माझ्या जीव की प्राण कन्येला तुम्ही सुखरूप आणले तुम्ही."
गौरीची आई विचारते - "महेश कायं करतोस?"
"आई ते एअर फोर्स मध्ये विंग कमांडर आहे हे." महेश ऐवजी गौरीची उत्तर देते.
गौरीची आई मनांत म्हणते 'एवढे भरभरून बोलते महेश बद्दल महेशच्या प्रेमात पडली गौरी'
"महेश लग्न करशील का माझ्या गौरीशी." गौरीची आई थेट विचारते तसे महेश, गौरी दोघे लाजतात. गालात हसतात.
गौरीचे बाबा गौरीला "कायं गौरी? " विचारतात तेव्हा गौरी लाजून" हो" म्हणते आणि आत पळून जाते.
सगळेच हसतात.
सगळेच हसतात.
समाप्त
(सौ. भाग्यश्री चाटी सांबरे)
©®
©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा