चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद कथामलिका
हौलें हौलें हो जायेगा प्यार भाग 3
जलद कथामलिका
हौलें हौलें हो जायेगा प्यार भाग 3
गौरी खूप वेळ ओले कपडे अंगावर घालून उभी होती. पाऊस, थंड हवा सुटल्याने. खूपच थंडी वाजू लागली. तिचे दात वाजयला लागले शेवटी महेशने त्याचे जॅकेट काढून तिला घालायला दिले" हे घालून थंडी वाजणार नाही हे घ्या."
गौरीला खूप शिंका यायला लागल्या जोरात. गौरी शेवटी हो नाही करत जॅकेट घालून घेते आणि महेशला" थँक्यू" म्हणते.
महेश तिला म्हणतो " गरम गरम कॉफी घ्या. जरा थंडी जाईल."गौरी होकारार्थी मान डोलावते.
महेश "दादा दोन कॉफी आणा"
टपरीवाला दोन कॉफी घेऊन येतो आणि अंधार पडल्याने टेबलावर एक मेणबत्ती लावतो.गौरी फोन पे आहे का विचारते मोबाईल पाहते तो स्विच ऑफ झालेला.
" आता पैसे नाही" गौरी म्हणते तेव्हा महेश म्हणतो "ठीक आहे इट्स ओके. मी देतो."
" आता पैसे नाही" गौरी म्हणते तेव्हा महेश म्हणतो "ठीक आहे इट्स ओके. मी देतो."
गौरीला थोडं लाजल्या सारखं होतं. गौरी म्हणते, "माझा फोन स्विच ऑफ झाला, कॉलिंग बंद, फोन पे बंद, घरी कसं कळवू?" गौरीच्या चेहऱ्यावर आठ्या पाहून तिची चिंता पाहून महेश नजरेतूनच आश्वस्थ करतो.
महेश त्याचा मोबाईल काढतो तर नेट कव्हरेज काहीच नसतं तो मोबाईल गौरी समोर टेबलावर ठेवतो.
गौरीच्या डोक्यात येतं ती विचारते," तुम्ही तुमच्या कार मध्ये निघाले होते अचानक कोठून आले मला वाचवले?"
महेश म्हणाला "गाडी इकडे पार्क केली होती तिथेच पाणी साठले म्हणून त्या साईडला तिकडे गाडी पार्क केली येत होतो अचानक झाड दिसले मग तुम्हाला पटकन ओढले."
गौरी म्हणते" माझी गाडी वरचे झाड काढते "ती झाड काढता काढता सीट फाटले जाते गाडीचे गौरी हळहळते.
ती गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करते. गाडी पावसात काही केल्या सुरूच होत नाही. त्यात महेशही येतो
तिला" बाजूला व्हा. मी बघतो " म्हणतो गाडी सुरू करायचा प्रयत्न करतो पण गाडी काही सूरू होत नाही. महेश ओला होतो.
ती गाडी सुरू करण्याचा प्रयत्न करते. गाडी पावसात काही केल्या सुरूच होत नाही. त्यात महेशही येतो
तिला" बाजूला व्हा. मी बघतो " म्हणतो गाडी सुरू करायचा प्रयत्न करतो पण गाडी काही सूरू होत नाही. महेश ओला होतो.
महेशच्या जॅकेटमुळे गौरी काही ओली होत नाही. गौरीला ते जॅकेट मोठ्ठे झाले होते ती पण ओली होत नाही, ऊबदार वाटते. महेशच्या परफ्युमचा मंद सुगंध त्यात येत असतो.
परत दोघे त्याच टपरीत जातात. पाऊस बेधुंद होऊन कोसळत असतो. कायं करावे कळतं नाही. गौरीच्या तोंडावरून ओठावरून पाणी पावसाचे ओघळते. तिच्या चेहऱ्यावर मेणबत्तीचा मंद प्रकाश असतो महेशचे लक्ष जाते. महेशला तिच्या सोंदऱ्याची वेगळीच भुरळ पडते. तो स्वतःला सावरतो. गौरी चेहरा ओढणीने टिपते.गौरीच्या मोठया पापण्यावर पावसाचे थेंब चांदी सारखे चमकत असतात. तिच्या पाणीदार मोठया डोळ्यात वेगळीच नशा महेशला जाणवते. महेशवर गौरीच्या रूपाची मोहिनीच पडते. गौरी ओले केस झटकते. महेश तिला न्याहाळतो आहे हे तिला समजते ती सावरते. तोही स्वतःला सावरतो.
क्रमशः
(सौ. भाग्यश्री चाटी सांबरे)
©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा