Login

रात्र आणि ती

रात्रीचे अस्तित्व
विघ्नेश आणि अक्षय दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते........ लहानपणापासून एकाच शाळेमध्ये , एकाच कॉलेजमध्ये शिकलेले होते........ विघ्नेश च्या आईला पहिल्यापासूनच देवपूजा मध्ये खूप रुची होती त्यामुळे तिने अभिमंत्रित केलेली रुद्राक्ष माळा लहानपणापासूनच बिझनेसच्या गळ्यात घातलेली होती......... विघ्नेश ला तर ते आवडायचे नाही परंतु आईला नाराज करणे त्याच्या मनाला आवडत नव्हते म्हणून त्यानें पण ती माळ गळ्यात ठेवली होती परंतु तो नेहमी ती माळा कपड्याच्या आत लपवून ठेवायचा.........

कॉलेज नंतर त्या दोघांनी मिळून एक बिझनेस करण्याचा निर्णय घेतला....... त्यांच्या घरच्यांचीही त्यांना साथ मिळाली...... बघता बघता त्यांचा बिझनेस सुरूही झाला.......

हळूहळू प्रगती करणाऱ्या त्यांच्या बिझनेस ची सुरुवात एका दहा बाई दहाच्या खोलीमधून झाली होती, पण आज त्यांनी आपल्या बिजनेस मधून बराच पैसा कमावला होता म्हणून त्या दोघांनी विचार करून एका चांगल्या बिल्डिंगमध्ये आपलं ऑफिस रेंटवर घेण्याचे ठरवले....... तसे ते सगळीकडे चौकशी करू लागले.......... त्या दोघांनी मिळून एका इस्टेट एजंट सोबत याबद्दल चौकशी केली.......

" सर तुम्हाला पाहिजे असलेली एक जागा माझ्या माहितीमध्ये आहे आणि त्याचे रेंट ही खूप कमी आहे........ तुम्ही एकदा ती जागा बघून घेता का म्हणजे आपण त्या जागेच्या मालकासोबत पुढची बोलणी करूया........ " एक दिवस इस्टेट एजंट त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांना बोलू लागतो. .......

" ठीक आहे , तुम्ही बोलत असाल तर आम्ही उद्या सुट्टी जागा बघायला येऊ शकतो........ " अक्षय त्यांच्याकडे बघून होकार कळवतो......

दुसऱ्या दिवशी ते दोन्ही मित्र ती जागा बघायला जातात......... त्यांच्या ऑफिस पासून जवळजवळ तासभराच्या अंतरावर एका मोकळ्या जागेमध्येच एक दहा मजली बिल्डिंग उभी असलेली त्यांना दिसते........ आजूबाजूला कन्स्ट्रक्शन साईट ही दिसून येते.........

" ही जागा एका बिल्डरने विकत घेतलेली आहे....... त्यांनी आजूबाजूला काही बिल्डिंग उभा करण्याचे प्लॅन बनवलेले आहेत.......... पुढच्या काही वर्षांमध्ये या जागेला खूप किंमत येईल परंतु सध्या तरी इकडे कोणीही नसल्यामुळे तो त्याची जागा अगदी कमी किमतीमध्ये रेंट वर द्यायला तयार झालेला आहे......... याच बिल्डिंगमध्ये सातव्या मजल्यावर तुम्हाला पाहिजे तस मोठ ऑफिस आहे........ आपण एकदा वर जाऊन बघूया....... " तो एजंट त्यांना इशारा करून दाखवतो.........

ते मिळून वर सातव्या मजल्यावर जातात....... तिकडचे ते ऑफिस त्या दोघांना खूपच आवडते........ त्यांचा सध्याचा स्टाफ तिकडे बसूनही अजून बरीच जागा शिल्लक राहू शकते त्यामुळे फ्युचर मध्ये त्यांनी जर स्टाफ वाढवण्याचा विचार जरी केला तरी त्यांना काही प्रॉब्लेम होणार नव्हते........... त्याचबरोबर दोघांसाठी दोन वेगळ्या केबिन बनवण्याचेही ते विचार करू लागतात........ एकंदर त्यांना ती जागा खूपच आवडते आणि बिल्डरने सांगितलेल्या रेंट च्या हिशोबाने ती जागा तर खूपच छान असते म्हणून मग ते ती जागा रेंटवर घेण्यासाठी तयार होतात..............


" तुमचा ऑफिसचा टाइमिंग काय आहे म्हणजे तुमच्या ऑफिसमध्ये फक्त दिवसाची ड्युटी चालत असेल ना की, रात्री पण तुमचे ऑफिस चालू असते? " बिल्डरने त्यांना जागा देण्याच्या आधीच पहिला हाच प्रश्न विचारला.......

" तुम्ही असे का विचारात आहात म्हणजे..... " अक्षय पण बिल्डरच्या अशा प्रश्नाने गोंधळून गेला.........

" नाही म्हणजे अजून ही जागा देवलप नाही........ तुम्ही बघितलेच असेल आजूबाजूला कन्स्ट्रक्शन साईट आहे म्हणून मग रात्रीचं लोकांना ट्रॅव्हलिंगला प्रॉब्लेम होईल त्यामुळे मी आधीच विचारले....... " बोलताना बिल्डर थोडा अस्वस्थ झाल्यासारखा वाटत होता.......

" नाही..... नाही..... तुम्ही त्याची काळजी करू नका....... आमची पण ऑफिस सध्या दिवसाचा चालू असते........ इन फ्युचर जेव्हा ही जागा डेव्हलप होईल तेव्हा आम्ही पण पुढे आपल्या बिजनेसचा ग्रोथ बद्दल विचार करू......... " विघ्नेश त्या बिल्डर करे बघून उत्तर देतो......... त्यांचा व्यवहार पूर्ण होतो आणि ती जागा विघ्नेश आणि अक्षय त्यांच्या बिझनेस साठी रेंटवर घेतात..........

विघ्नेश आणि अक्षय आपल्या स्टाफ मेंबर्सना आणि आपल्या घरच्यांना बोलून तिकडे छोटीशी पूजाही करतात......... त्या बिल्डिंगमध्ये पहिले यांचे ऑफिस आलेले असते त्यामुळे त्या पूर्ण एरिया मध्ये ते बिनधास्तपणे वावरत असतात........

त्यांच्या ऑफिसची वेळ सकाळी दहा ते संध्याकाळी सहा अशी होती त्यामुळे ऑफिसमधला सगळा स्टाफ जास्तीत जास्त साडेसहा वाजेपर्यंत घरी निघून जायचा....... त्यांच्या पाठोपाठ अक्षय आणि विघ्नेश दोघेही सात साडेसात पर्यंत तिकडून घरी निघून जायचे............ त्या बिल्डिंगमध्ये आल्यापासून त्यांना अजून प्रोजेक्टही मिळाले होते त्यामुळे ते लोक खूपच आनंदात होते......... असेच पुढचे काही दिवस निघून गेले..........

" विघ्नेश अजूनही तू कामच करत आहेस....... अरे, घड्याळ तर बघ........ " सगळा स्टाफ निघून गेल्यानंतर काही वेळाने अक्षय विघ्नेश ला बोलवण्यासाठी त्याच्या केबिनमध्ये येऊन बघतो, तर विघ्नेश अजूनही त्याच्या कामातच व्यस्त असतो.........

" अक्षय मला तरी असे वाटते की, आजची रात्र मी इकडेच बसून माझे हे काम पूर्ण करावे........ बघ ना, उद्या सकाळी दहा वाजता मिटींग आहे आणि अजून या फाईल मधले खूप काम बाकी आहे........ " विघ्नेश वैतागलेल्या स्वरात अक्षय कडे बघून बोलतो.......

" तुला अजून किती वेळ लागेल हे फाईल पूर्ण करण्यासाठी ? " अक्षय त्याच्या केबिनमध्ये येऊन प्रश्नार्थक नजरेने विचारतो.......

" कमीत कमी पाच-सहा तास तरी लागतील हे फाईल पूर्ण व्हायला......... " विघ्नेश त्याचा लॅपटॉप अक्षय ला दाखवत बोलतो........

" मी एक काम करतो , आज आपल्या दोघांसाठी इकडे जेवण ऑर्डर करतो........ आपण आधी मस्तपैकी जेवून घेऊया आणि मग ही फाईल पूर्ण करूया....... जर लवकर काम झालंच तर आपण गाडीने घरी जाऊन एक झोप काढून तिकडून फ्रेश होऊन तसच मिटींगला जाऊ शकतो......... " अक्षय आपल्या डोक्यात आलेली कल्पना त्याला सुचवतो.........

" अरे माझ्यासाठी तू कशाला थांबत आहे, तू घरी जाऊन आराम कर........ " विघ्नेश त्याचं बोलणं ऐकून पटकन बोलून जातो...........

" कम ऑन यार, आज पर्यंत तुला कधी एकट्याला सोडला आहे जे आज सोडेल.......... " अक्षय बोलतच आपल्या मोबाईल वरून त्या दोघांसाठी जेवण ऑर्डर करू लागतो...... काही वेळातच त्यांचं जेवण करून ते दोघेही मिळून कामाला लागतात..........

" यार अक्षय , कामांमध्ये वेळ कसा गेला समजलेच नाही....... आपण जेवणं करुन नऊ वाजता काम करायला बसलो होतो आणि आता बघ ना रात्रीचे साडेबारा वाजलेले आहेत....... " विघ्नेश आश्चर्याने एक नजर घड्याळाकडे बघत अक्षयला बोलतो.......

" हो रे आणि आपली फाईल पण ऑलमोस्ट पूर्ण झाली आहे............ आता फक्त तासाभराचे काम बाकी राहिले आहे........ " अक्षय पण घड्याळाकडे एक नजर पाहून बोलू लागतो.......

" बसून बसून मान आणि पाठ अवघडल्यासारखे वाटत आहे रे........ " विघ्नेश वैतागलेल्या नजरेने अक्षय कडे बघून बोलतो......

" तू थोडा वेळ आराम कर तोपर्यंत मी आपल्या दोघांसाठी मस्तपैकी कॉफी बनवून घेऊन येतो....... " असे बोलत अक्षय कॉफी बनवण्यासाठी केबिनच्या बाहेर निघून जातो........ विघ्नेश पण जागेवरून उठून त्याच्या केबिनमध्ये असलेल्या खिडकीजवळ येऊन उभा राहतो........... त्यांच्या ऑफिसची बिल्डिंग ही ' U' आकारामध्ये असते........ रात्रीचे शांत वातावरण बघत असतानाच त्याची नजर त्यांच्या बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर जाते........ रात्रीच्या अंधारातच त्याला त्या मजल्यावर एक पुसटशी आकृती दिसून येते म्हणून तो अजूनच निरखून बघण्याचा प्रयत्न करू लागतो.........

विघ्नेश निरखून बघत असताना त्याला त्या मजल्यावर कोणतीतरी मुलगी पाठमोरी उभा असल्यासारखी वाटते....... तिने ड्रेस घातलेला असतो आणि तिचे केस मोकळे सोडल्यामुळे ते हवेवर उडत असतात......... त्या मजल्यावर आजूबाजूला सगळीकडे अंधार असतो..........

' एवढ्या उशिरा , एवढ्या अंधारात ही मुलगी तिकडे एकटी अशी का उभी आहे ? तिला कोणती मदत हवी आहे का ? ' विघ्नेश स्वतःच्याच मनात विचार करत असताना त्याला मागून अक्षय चा आवाज येतो......... अक्षय त्या दोघांसाठी कॉफी घेऊन केबिनमध्ये आलेला असतो............. विघ्नेश कॉफीचा मग हातात घेऊन कॉफी पिऊ लागतो........ तो परत थोड्यावेळाने त्या खिडकीजवळ येऊन पाहतो तरीही ती मुलगी तशीच उभी असते..........

" अक्षय तू बाकीचे काम एकदा कंटिन्यू कर , मी असाच एक राउंड मारून येतो........ " असे बोलत विघ्नेश त्याच्या केबिन मधून बाहेर पडू लागतो........

" अरे पण, तू इतक्या रात्रीचा कुठे जात आहेस ? " अक्षय प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहून त्याला विचारतो.........

" अरे बसून बसून कंटाळा आला आहे म्हणून बिल्डिंगमध्येच एक राउंड मारून येतो...... मी लगेच येतो ....... " असे बोलून विघ्नेश पुढे त्याचे काहीही न ऐकून घेता आपल्या ऑफिसमधून बाहेर पडतो आणि समोरच्या लिफ्टमध्ये जातो....... लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर येऊन थांबते आणि विघ्नेश लिफ्ट मधून बाहेर येऊन सगळीकडे पाहू लागतो.......... त्यामध्ये यावर सगळीकडे अंधार पसरलेला असतो.......... विघ्नेश त्याने आपल्या ऑफिसच्या खिडकी मधून बघितलेल्या जागेचा अंदाजा घेऊ लागतो......... तो हळूहळू पुढे चालून येतो तर त्याला एका कोपऱ्यामध्ये एका घराचा दरवाजा अर्धा उघडा दिसतो...........

विघ्नेश चालत चालत त्या दरवाजाच्या दिशेने येऊन उभा राहतो........ आजूबाजूला कोणीही नसते.........

" कोणी आहे का इकडे ? " विघ्नेश दरवाजातून थोडा आत वाकत मोठ्याने विचारतो......... तरीही त्याला कोणाचा आवाज येत नाही.......... तो दरवाजा थोडा पुढे ढकलून आत पाहू लागतो, तर आत मोकळी जागाच असते......... कुठेही काही सामान नसते परंतु त्याला थोड्या वेळापूर्वी जी मुलगी दिसली होती, तीच आता त्या घरामध्ये असलेल्या खिडकीच्या जवळ पाठमोरी उभी राहिलेली दिसते.........


" हॅलो....... तुम्ही कोण आहात आणि एवढ्या रात्री इकडे काय करत आहात ? " विघ्नेश तिला विचारतच त्या दरवाजातून थोडा पुढे येऊ लागतो........ तो जसा त्या घराच्या आत येतो , पाठीमागून दरवाजा अचानक बंद होतो......... दरवाजाच्या आवाजानेच विघ्नेश घाबरून पाठीमागे वळून बघू लागतो.........

विघ्नेश परत एकदा त्या मुलीच्या दिशेने वळून बघणार तेवढ्यात ती मुलगी अगदी त्याच्या जवळ येऊन उभी राहिलेली दिसते........ तिला पाहून तो घाबरुन चार पावले मागे जाऊन दरवाज्याला धडकतो........... त्या मुलीचा रक्ताने भरलेले विद्रूप चेहरा पाहून त्याची बोबडीच वळते......... तिच्या शरीरावर ठिकठिकाणी लागलेल्या खुणा असतात , कपडे फाटलेले असतात , तिची ती अवस्था बघून विघ्नेश नखशिकांत हादरतो....... तिचे डोळ्यात बुबळ्या नसून पूर्ण पांढरे डोळे असतात........ तिला आपल्या जवळ पाहून विघ्नेश खूप घाबरतो...........

" क..... कोण आहात? म.... मला जाऊ द्या..... " विघ्नेश दयावया करू लागतो........

" नाही सोडणार....... कोणाला नाही सोडणार........ " ती मुलगी बोलूनच त्याच्या अंगावर झडप घेते आणि अचानक झटका लागल्यासारखे त्याच्यापासून दूर जाऊन पडते......... तिची नजर त्याच्या गळ्याकडे जाते....... त्याच्या गळ्यात रुद्राक्ष ची माळा चमकत असते....... त्या माळामुळेच आज ती त्याला स्पर्श करू शकत नसते......... ती मुलगी त्याला त्रास देण्यासाठी खूप प्रयत्न करू लागते परंतु काहीही केल्या ती त्याला स्पर्श करू शकत नसते त्यामुळे ती अजूनच चवताळून जाते..........

विघ्नेश तिचा तो भयानक अवतार पाहून खूपच घाबरून गेलेला असतो......... तो दरवाजा वाजून जोरजोरात ओरडू लागतो परंतु त्या जागेवर मनुष्य वस्ती नसल्यामुळे त्याचा आवाज कोणीही ऐकत नाही त्यांचं ऑफिसही दहाव्या मजल्यावर असल्यामुळे त्याचा आवाज तिथपर्यंत जाणे शक्य नाही......... विघ्नेश खूपच घाबरून जातो अशातच त्याला घेरी येते आणि तो तिकडेच जमिनीवर खाली पडतो..........

" विघ्नेश....... विघ्नेश........ " त्याच्या गालावर कोणाचातरी हात फिरत असताना विघ्नेश ला जाणवतो...... हळूहळू त्याला कोणीतरी आवाज देते अशी जाणीव होते...... सोबतच त्याला ती भयानक अवतार असलेली मुलगी आठवते आणि तो घाबरून जागेवर उठून बसतो...........

" अरे काय झालं तुला? तू ठीक आहेस ना...... " अक्षय त्याच्या चेहऱ्यावरची भीती पाहून त्याला विचारतो......

" अक्षय , अरे तिकडे ती..... ती..... मुलगी.... " विघ्नेश बोलण्याचा प्रयत्न करत असतो परंतु त्याला काहीही समजत नाही........

" अरे कोण मुलगी , कुठे? इफेक्ट या रूममध्ये कोणीही नाही......... काल रात्री लगेचच येतो म्हणून तू गेलास आणि आला नाही........ मी पण फाईल पूर्ण करण्याच्या नादात विसरून गेलो....... नंतर बघितलं तर इतका वेळ होऊन गेला आणि तुझा पत्ता नाही....... तुझा फोन लावायचा प्रयत्न करत होतो पण तू फोन उचलत नव्हता........ शेवटी मला वाटलं तू कुठे घरी गेला असशील म्हणून मी आपल्या ऑफिसमध्ये झोपून गेलो...... सकाळी जाग आल्यावर खाली येऊन पाहिले तर तुझी गाडी ही इकडेच होती....... मग इकडच्या आजूबाजूला आसलेल्या माणसांना गोळा करून तुला शोधत होतो........ तर तू इकडे अशा अवस्थेत झोपलेला दिसला........ " अक्षय त्याला स्वतःची बाजू सांगू लागतो........

" अक्षय तू आधी इकडून चल, इकडे थांबू नकोस..... " असे बोलत विघ्नेश जागेवरून उठत अक्षयचा हात धरून त्याला तिकडून बाहेर घेऊन येतो.........

" विघ्नेश काय झालं तुला? तू ठीक आहेस ना आणि तू या मजल्यावर का आला होता ? " अक्षय प्रश्नाचाक नजरेने त्याच्याकडे बघून त्याला विचारू लागतो........

" मी ठिक आहे...... " विघ्नेश फक्त एवढाच उत्तर देतो......

" ठीक आहे........ एवढी मेहनत करून ती फाईल पूर्ण केली आहे......... मी एक काम करतो तुला घरी सोडून मी तसाच मिटींगला जाऊन येतो....... आपण आल्यावर बोलू या........ " अक्षय वेळेचे भान समजून विघ्नेश कडे बघून बोलतो..... विघ्नेश पण त्याची संमती दर्शवतो.........

अक्षय विघ्नेश ला घरी सोडून तसाच मीटिंगसाठी निघून जातो......... विघ्नेश मात्र आपल्या घरी येऊनही अस्वस्थ झालेला असतो....... त्याच्या डोक्यात रात्रीचे तेच विचार फिरत असतात......... अक्षयला मीटिंग वरून परत यायला संध्याकाळ होते.......

" विघ्नेश आता मला सांगशील काय झाले होते..... " अक्षय विघ्नेशच्या घरी येऊन त्याला विचारतो....... विघ्नेश त्याच्यासोबत घडलेली सगळी घटना अक्षयला सांगू लागतो ते अक्षय नाही मोठा शॉक लागतो........ दुसऱ्या दिवशी ते दोघे पण त्या बिल्डरला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये जातात.........

" तुमच्या त्या बिल्डिंगमध्ये अजून एकही ऑफिस का नाही आहे ? तुम्ही नक्कीच आमच्यापासून काहीतरी लपवत आहात......... आम्हाला आत्ताच्या आत्ता सांगा नाहीतर आम्ही पोलिसांना घेऊन येऊ........ " अक्षय डायरेक्ट त्याच्या केबिनमध्ये घुसून त्याला धमकी देऊ लागतो.........

" सांगतो....... सांगतो....... पण तुम्ही प्लीज पोलिसांना बोलू नका........ " तो बिल्डर घाबरूनच आपले हात जोडून त्या दोघांकडे बघून बोलतो........

" सांगा लवकर..... " विघ्नेश पण आता त्याचं बोलणं ऐकण्यासाठी आतुर झालेला असतो.........

" मला खूप कमी भावात ती जागा मिळाली होती म्हणून मी तिथे काही बिल्डिंगी बांधून ते रेंटवर देण्याचा विचार केला होता....... बघता बघता माझी एक बिल्डिंग पूर्ण ही झाली...... त्याचे फक्त थोडेसे कामच बाकी होते........

एक दिवस माझ्या ऑफिस मध्ये काम करणारी एक मुलगी जी तिच्या आत्याच्या घरी राहत होती अचानक तिच्या आत्याने तिला घरातून बाहेर काढले........ तिला एका जागेची गरज होती....... मग मीच तिला त्या बिल्डिंगमध्ये तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका रूममध्ये राहायला सांगितले ...... तिलाही गरज असल्यामुळे तिने पण लगेच होकार दिला......... तिकडे आजूबाजूला कन्स्ट्रक्शन चालू असल्यामुळे अजून कोणीही तिकडे राहत नव्हते, फक्त दिवसाच्या वेळी तिकडे काही कामगार काम करत होते परंतु तिला पण दिवसभर ऑफिसमध्ये वेळ घालून रात्री झोपण्यापूर्वी त्या जागेची गरज होती..........

त्या मुलीने त्या ठिकाणी राहायला सुरुवातही केली...... असेच काही दिवस गेले...... गेल्या दोन दिवसापासून ती ऑफिसमध्ये आली नाही म्हणून मग मीच एक दिवस वेळ काढून त्या बिल्डिंगमध्ये जाऊन तिला बघायचे ठरवले आणि मी गेलो ही पण तिकडे गेल्यावर काहीतरी विचित्र दृश्य माझ्या नजरेस पडले...........

तिच्या रूमचा दरवाजा अर्धा उघडा होता म्हणून मी हळूच त्याला धक्का देऊन पाहिले तर तिकडे ती विचित्र अवस्थेत पडलेली होती.......... तिच्या शरीरावरच्या खुणा आणि फाटलेले कपडे पाहून मला समजले की, कोणीतरी तिचा बलात्कार केला आहे...... तिला मरूनही दोन दिवस झाले होते........ मी तिकडे काम करणाऱ्या माझ्या कामगारांकडे इन्क्वायरी केल्यावर मला समजले की, त्यांच्यातीलच दोन कामगारांनी संधी साधून रात्रीच्या वेळी तीच्या रूम मध्ये जाऊन तिच्या सोबत असे काम केले आणि ते दोन्ही जन तिकडून पळूनही गेले होते.........

जर मी हा विषय वाढवला असतं तर मीच गोत्यात आलो असतो........ पोलिसांनी मलाच अटक केली असते त्यामुळे मग मी तिकडच्या दोन माणसांची मदत घेऊन तिचे शव त्याच रूम मध्ये एका भिंतीमध्ये गाढून टाकले....... त्या दिवसापासून मात्र मला एक क्षण शांत झोप लागली नाही आणि ज्या दोन कामगारांनी माझी मदत केली होती, पुढच्या काही दिवसातच ते त्या कन्स्ट्रक्शन साइटवरच मृत अवस्थेत सापडले.........

माझ्या त्या प्रॉपर्टीलाही त्या मुलीचा अशा श्राप लागला की, कोणीही ती जागा विकत घ्यायला तयार नाही......... " तो बिल्डर घाबरून त्यांना सांगू लागला.........


" क्या बिल्डिंगमध्ये एवढं सगळं घडलं होतं आणि तुला आम्हाला ते सांगणं गरजेचं वाटलं नाही........ अक्षय आणि विघ्नेश दोघेपण पोलिसांना तिकडे घडलेली सगळी हकीकत सांगतात......... सकाळच्या वेळी पोलिसांची एक गाडी तिकडे येते आणि ते लोक बिल्डरने दाखवलेल्या भिंतीला खोदून त्यातून त्या मुलीची शव बाहेर काढतात आणि तिचे अंत्यसंस्कार करतात......... बिल्डरने ते शव लपवल्यामुळे त्यालाही थोडी शिक्षा होते......... अक्षय आणि विघ्नेश पण ती जागा सोडून आपल्या ऑफिस साठी दुसरी जागा शोधतात..........

देवाचे आभार मानण्यासाठी ते दोघेही महादेवाच्या मंदिरात जातात..........

" अक्षय आज मी इकडे जिवंत आहे, ते फक्त या रुद्राक्षमाळा मुळे......... आज देवाने योग्य वेळी माझी मदत करून मला त्याचे अस्तित्व दाखवले आहे....... " विघ्नेश शंकराच्या पिंडीकडे बघून भावुक होऊन बोलू लागतो.........

" चांगल्या लोकांच्या पाठीशी देव नेहमीच असतो....... योग्य वेळ आली की तो ते सिद्ध करूनही दाखवतो....... " अक्षय पण मनापासून देवाच्या समोर आपले हात जोडत बोलतो.........


.


समाप्त


******************************************
( कथा आवडत असल्यास कॉमेंट्स आणि लाइक्स नक्की द्या...... )