भाग 1
दुपारची वेळ होती. सूर्य तापला होता. फेब्रुवारी महिना असूनही तापमान वाढलं होतं. राणी नुकतीच एका शाळेतून बाहेर पडली होती. राणी हताश होऊन पारावर बसली. आज तिसऱ्या शाळेत तीच्या निल ला ऍडमिशन नाकारली होती. तसा निल सर्वसामान्य मुलांसारखाच. पण बुद्ध्यांक थोडा कमी. त्यामुळे सर्वसाधारण शाळा त्याला प्रवेश द्यायला तयार नव्हत्या. विशेष मुलांच्या शाळा त्याला बुद्ध्यांक जास्ती, म्हणून प्रवेश देत नव्हता.

राणी फारच निराश झाली होती. त्याच्या शिक्षणाच्या चिंतेने तिच्यातल्या आईला ग्रासले होते. ती त्याला शाळेत प्रवेश मिळावा म्हणून शक्य ते सर्व प्रयत्न करत होती. ती विविध शाळांमध्ये जाऊन त्याच्यासाठी प्रयत्न करत होती. पण तिला कुठेच यश येताना दिसत नव्हते. शेवटी त्याच्या डॉक्टर नी सर्टिफिकेट दिल्यावर एका शाळेने कसाबसा त्याला प्रवेश दिला. राणीच्या मनासारखी शाळा मिळाली नसली, तरी रडतखडत का होईना त्याच शालेय शिक्षण सुरू झालं. राणी रोज तो शाळेतून आला की स्वतः त्याचा अभ्यास घ्यायची. त्याच्या वेगाने त्याला कळेल असं शिकवायची. तो मागे पडू नये म्हणून ती सर्वतोपरी प्रयत्न करत होती.
निल खरतर एक निरोगी मुलगा होता. पण निलच्या जन्माच्या वेळेस प्रसूतीला वेळ लागल्यामुळे, निलला काही वेळ ऑक्सिजन मिळाला नव्हता. त्यामुळेच त्याला डेव्हलपमेंट डिसऑर्डर ची शिकार व्हायला लागलं होतं. ही अशी जबाबदारी आलेली बघून निरजने संसारातून काढता पाय घेतला. नीरज सोडून गेल्यापासून राणीने एकटीनेच निल ला वाढवलं होतं.
निलला शाळेतले बहुतेक विषय अवघड जायचे. लक्ष लागायचे नाही. उत्तरं देता येत नसत. त्यामुळे निल शाळेत जाऊन फारच एकटा पडला होता. बाकीची मुलं त्याला सहभागी करून घेत नसत. त्याला चिडवत असत. त्यामुळे तो शाळेत अबोल एकटाच बसलेला असायचा. पण तरीही कसंबसं त्याच शालेय शिक्षण पार पडलं.
पण अभ्यासात नसलं, तरी एका गोष्टीत त्याचा हात कोणी धरू शकत नव्हते. तासनतास तो एकाग्रतेने सराव करत असायचा. त्यात हरवून जायचा तो. भान हरपून सराव करत राहायचा. त्याचं एकच स्वप्न होतं. आयुष्यात काय करायचंय हे त्याचं निश्चित होत. आणि गेले दहा वर्षे निल त्याच एका गोष्टीची मन लावून तयारी करत होता. लवकरच ते स्वप्न पूर्ण होणार होतं.
आणि ती गोष्ट म्हणजे….
क्रमशः
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा