भाग 2
निलला निशाणेबाजीत प्रचंड रस होता. बंदूक म्हणजे त्याची जीव की प्राण. शाळा सुटली की निल त्याच्या क्लबमध्ये जायचा. अगदी दुसरीत असल्यापासूनच तो बंदूक चालवायला शिकत होता. क्लबच्या काही छोट्यामोठ्या स्पर्धामध्ये त्याने बक्षिसेही पटकावली होती. आणि लवकरच तो राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेमध्ये उतरणार होता.
निलला निशाणेबाजीत प्रचंड रस होता. बंदूक म्हणजे त्याची जीव की प्राण. शाळा सुटली की निल त्याच्या क्लबमध्ये जायचा. अगदी दुसरीत असल्यापासूनच तो बंदूक चालवायला शिकत होता. क्लबच्या काही छोट्यामोठ्या स्पर्धामध्ये त्याने बक्षिसेही पटकावली होती. आणि लवकरच तो राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या स्पर्धेमध्ये उतरणार होता.
शाळा संपल्यावर खरंतर त्याने कॉलेजमध्ये जाऊन पदवीपर्यंतच शिक्षण तरी पूर्ण करावं अशी राणीची इच्छा होती. पण नीलच आधीच ठरलेलं होतं. त्याला आता अजून अभ्यास जमणार नव्हता. त्याला आता पूर्ण वेळ त्याच्या बंदुकीच्या सरावाला द्यायचा होता.
त्याचे शिक्षकही त्याच्याकडून भरपूर सराव करून घेत होते. लवकरच स्पर्धेचा दिवस उजाडला. निलला घेऊन राणी स्पर्धेच्या ठिकाणी पोहोचली. त्याचे शिक्षक आधीच तिथे पोहोचले होते. नीलने राणीला आणि त्याच्या शिक्षकांना नमस्कार केला. आपली बंदूक घेऊन तो स्पर्धेसाठी इतर स्पर्धकांसोबत उभा राहिला. त्याने आपलं सगळं लक्ष त्या बिंदूवर केंद्रित केलं. बंदुकीच्या छोट्याशा नळीमधून तो बिंदू त्याला अचूक दिसत होता. बाकी सगळं काही धूसर झालं होतं. कुठलाच आवाज ऐकू येत नव्हता.
खुणेची बंदूक उडाली. स्पर्धा सुरू झाली होती. नीलने श्वासावर पूर्ण ताबा मिळवला होता. इतक्या वर्षांच्या सरावाने हात अतिशय स्थिर झाले होते. निशाणा अचूक साधला गेलाय हे नक्की झाल्यावर त्याने श्वास रोखला. धाडकन आवाज करत बंदुकीतून गोळी सुटली होती. पण तरीही नीलचे हात कणभरही हलले नव्हते.
तीन वेळा गोळ्या बंदुकीतून सुटल्या. पुन्हा एकदा खुणेची बंदूक उडाली. नीलच्या तिन्ही गोळ्या बरोबर केंद्रबिंदू छेदून गेल्या होत्या. राष्ट्रीय स्तरावर त्याने सुवर्णपदक जिंकलं होतं.
ही स्पर्धा फक्त त्याच्या स्वप्नाची एक पायरी होती. त्याला अजून बरीच पायवाट करायची होती. ह्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेने त्याच्यासाठी संधीचं एक सुवर्णदालन उघडलं होतं. तो भारताचा प्रतिनिधी म्हणून निवडला गेला होता. जागतिक स्तरावरच्या अत्यंत मानद अशा ऑलिम्पिक स्पधेसाठी त्याची निवड झाली होती.
आज राणीची सकाळपासूनच लगबग सुरू होती. तिचा लाडका लेक आज परत येणार होता. तिचं ऊर अभिमानाने भरून आलं होतं. ती दिवसभर त्याची वाट बघत होती. पण अजूनही तो आला नव्हता. राणीच्या उत्साहाचं आता हळूहळू काळजीत रूपांतर व्हायला लागलं होतं. इतक्यात दारावरची बेल वाजली. निल आला ह्या कल्पनेने राणी धावतच दरवाजा उघडायला गेली. पण निल नव्हता. त्याच्याऐवजी फक्त एक पत्र होतं.
कोणाचं होतं ते पत्र? नील का आला नव्हता?
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा