भाग दोन (ती राजहंस एक)
एकदा सासूबाईंचा नि माझा काही कारणाने वाद झाला, आणि तो वाढत गेला. त्यांचे म्हणणे मी आताशा कामात लक्ष नाही देत आळशी झाले आहे.मग मी ही आपला जुना राग काढला’’ मला नको असताना तुम्ही भरीस पाडले मुलगा हवा म्हणून .

“पण झाली मुलगीच ना?त्यांनी टोमणा मारला!”
“हो पण ते काही माझ्या हातात होतं का? नशिबात मुलगीच होती ,आणि तीही अशी!”
आम्ही दोघी जोरात वाद घालत होतो आमचं लक्ष नव्हतं दारात नंदा ऐकत उभी होती.

त्या दिवशी हे मला खूप बोलले “आशा तिला आपण जन्म दिला तिचा काय दोष? कां तू अशी वागतेस आई आहेस ना तू ?”
मलाही आपल्या वागण्याची लाज वाटत होती पण वेळ निघून गेली होती .त्यानंतर नंदा माझ्यापासून आणखीनच दूर होत गेली…
नंदा ची अभ्यासात ली हुशारी पाहून ह्यांनी तिला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घातले. मलाही ते बरेच वाटले कारण रीना,मीना तिला आपल्या बरोबर शाळेत नेत नसत. म्हणत “अग माझ्या सर्व मैत्रिणी मला विचारतात कि ही खरंच तुझी बहिण आहे? तुम्ही येवढ्या सुंदर आणि ही वेगळी दिसते.”
आमचं बोलणं बहुतेक ह्यांच्या कानांवर पडले असावे.
हे संध्याकाळी रीना ला बोलले.हे बघा मुलींनो रंग रुपा च कौतुक थोडे दिवस त्या पेक्षा अभ्यासात ली हुशारी आणि त्याच बरोबर प्रेम आणि चांगला व्यवहार तितकाच महत्त्वाचा आहे.
बाबांचं बोलणं मोठ्या दोघींना कितपत रूचले ते कळले नाही पण नंदा अभ्यासाकडे जास्त लक्ष देवू लागली. व तिच्या हुशारी च कौतुक ही व्हायला लागले ते पाहून मोठ्या दोघी हिरमुसल्या.

अभ्यासात फार लक्ष नाही असे पाहून मीना, आणि रीना दोघी वयात येताच एकापाठोपाठ त्यांची लग्न झाली,दोघी सुंदर त्यामुळे त्यांना शोभेशी स्थळंही मिळाली. आम्हीही लग्नात भरपूर दिलं, कुठ्ठे कमी नाही केली. सर्व सणवार, बाळंतपण व्यवस्थित झाले.
नंदा अभ्यासात हुशार असल्याने पुढे पुढे शिकत गेली आणि मोठ्या कंपनीत नोकरीलाही लागली. आता हिच्या ही लग्नाचं पाहायला हवं. आता सासूबाई नव्हत्या. पण नंदाने इतक्यात मला लग्न करायचं नाही असे स्पष्ट सांगितले.
“अग पण ठरायला काही वेळ लागेल न, मीना रीना ची गोष्ट वेगळी होती !”
मी ह्यांना म्हंटले अहो हिच्या लग्नाच पहाव, पट्कन स्थळ मिळेलच असं नाही.”

“तू माझ्या लग्नाची चिंता नको करू, मी पाहीन माझ, नंदा म्हणाली.”
हे म्हणाले “अग इतकी हुशार आहे नंदा, नक्कीच तिला तिच्या मनासारखा नवरा मिळेल .”
बघता बघता असेच एक वर्ष गेले. दोघी मोठ्या आपापल्या संसारात खुश होत्या. आताशा ह्यांची तब्येत बरी राहत नव्हती आणि एक दिवस अचानक यांना काय झाले कळलेच नाही ते झोपेतच गेले .. .

हे गेल्या चा धसका माझ्या पेक्षा ही नंदा ने जास्त घेतला. ती एकदमच मिटल्या सारखी झाली . जितक्या वेळ घरी असायची आपल्या खोलीत असायची. एकदा मी तिला जेवायला बोलावयाला तिच्या खोलीत गेले तेव्हा ह्यांच्या फोटो समोर बसून रडत होती.
माझी चाहूल लागली तशी डोळे पुसत उठून मोरीत गेली, मला तिला जवळ घेवून तिचे सांत्वन करायला हवं होतं अस वाटल पण तिने ती वेळ येऊच दिली नाही. मोरीतूनच मला म्हणाली आई तू जेवून घे मी आंघोळी नंतर जेवेन.
मी जेवून झोपले त्या नंतर ती बहूतेक जेवली आणि बाहेर निघून गेली ती संध्याकाळी च परत आली.
हे गेल्या चा माझ्याकरता फार मोठा धक्का होता ,माझे मन कशातच लागत नसे. ह्यांना जाऊन सहा महिने झाले, ह्या दुःखा तून मी सावरते तोच एक दिवस नंदा एका तमिळ मुलासोबत घरी आली “आई हा शेखरन, माझा मित्र आहे. आम्ही एकाच ऑफिसमध्ये आहोत लवकरच आम्ही लग्न करणार आहोत.”
मी त्या शेखरं कडे पाहिलं अगदी काळा कुळकुळीत रंग पण हसरा चेहरा .”अग पण ह्याची जात? ‘मी नंदाला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तिचं ठरलं होतं. मला ते काही पटत नव्हतं.आमचा दोघींचा वाद झाला .शेवटी नंदा निघून गेली.
पुढे तिने शेखरन शी लग्न केले.दोघ नमस्कार करायला आली मी कोरडेपणांने तिला फक्त आशीर्वाद दिला . नंदा गेली ती परत कधीच घरी आली नाही.
दोघी मोठ्या नियमितपणे येत असत त्यामुळे मला नंदाची कमतरता कधीच भासली नाही. तरीही कधीतरी वाटायचं तिला प्रेम माया देण्यात आपण कमी पडलो तिचा काय दोष पण आता काही उपयोग नव्हता ती गेली ती परत आलीच नाही.. .

एक दिवस मोरीत पडण्याचं निमित्त झाले आणि मी बेडरिडन झाले .
—----------------------क्रमश:
आशाताईंना आता कोण आहे?
—----------------------क्रमश:
आशाताईंना आता कोण आहे?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा