भाग तीन
मीबेडरिडन झाले .
त्यावेळी मीना, रीना धावून आल्या. चार सहा दिवस मी दवाखान्यात होते. मग मलाघरी आणले. एक बाई दिवसा एक रात्रीची, अशी व्यवस्था केली व दोघी परत गेल्या. त्यांनाही त्यांचे संसार होते,किती दिवस त्या रहाणार ?
नंदा ला काहिच कळवल नाही.

असेच एक वर्ष गेले किती तरी केयरटेकर बदलल्या, आताशा मला एकटेपणा चा कंटाळा आला होता. घरात बोलायला कोणी असावं. सकाळची केयरटेकर पोरसवदा होती. ती फक्त कामापुरते बोलायची. वाटायचं चार माणसांत रहावं. नाती नातू दिसावे. इतकी संपत्ती घरदार मुली असताना एकटं कां रहावं?
मी विचार केला आता ही संपत्ती, घरदार दोन्ही वाटून द्यावे आणि मुलींकडे रहावे. मी दोघींना बोलावून घेतले आणि माझा विचार सांगितला,त्यांनी वकिला कडून कागदपत्रे करून आणली व माझ्या कडून सही करवून घेतली….
येवढ्या विचारानेही मला थकवा आला नी माझा डोळा लागला .
चार दिवसांनी दोघी मुली आल्या. रीना म्हणाली “आई नंदा ला काही च दिलं नाही, ती नंतर भांडण तर करणार नाही.?”
“तिला आपली आठवण तरी आहे कां ?मी आजारी झाले पण ती इकडे फिरकली ही नाही. आई कशी आहे हे पहायला ही नाही आली. मी चिडून बोलले.”
मीना म्हणाली हो पण तरीही मी नंदा ला सर्व कळवले आहे,आई ती जरी तुला भेटायला घरी येत नसली तरीही ती तुझी विचारपूस नियमित करते,ह्या दोन केयरटेकर ही तिनेच पाठवल्या.
तिला संपत्तीतल काहिच नको आहे. तिने तसे लिहुन दिले आहे.
“चला म्हणजे आता सर्व आपल्या दोघींचे आहे”. रीना खुशीत म्हणाली.

मी मनात विचार करत होते कि रीना कडे रहावे कि मीना कडे?
दोघी मुली आतल्या खोलीत कशावरून तरी वाद घालत होत्या. त्यांना दोघींना मी जवळ हवी असणार.

“आई दोन दिवसांनी आपण इथलं सर्व सामान काढू. एकाने हा बंगला विकत घेतला आहे. त्यांचे पैसे…” मीना म्हणाली.
“ ….तुम्ही वाटून घ्या मला काय करायचे ?” मी आश्वस्त होत बोलले.

रात्री मी जागीच होते उद्या हे घर सोडून जायचे ह्या विचाराने माझा ऊर भरून आला डोळे पाझरू लागले.
रात्री दोघी सोबतीला होत्या. सकाळी मी विचारलं “तुमचं काय ठरलं आहे मीना कडे कि रीना कडे माझी व्यवस्था करणार?” मीना ने रीना कडे पाहिले, पण त्या दोघी काहीच बोलल्या नाही.
मग मीच म्हटले “रीना तू मला घेऊन चल, काही दिवस तुझ्या कडे राहिन मग काही दिवस मीना कडे.”
“आई – अगं आम्हाला आमचेच खूप व्याप आहेत , हे सारखे बाहेर देशात जाऊन येऊन असतात. मलाही तिकडे जायचे आहे! पुढे, आम्ही तिकडे च रहायला जाऊ,” रीना बोलली.

लगेच मीना म्हणाली” माझ्या घरची कहाणी तुला ठाऊकच आहे सासुबाई आहेत त्यांना ही बरे नसते.मुलेंही कधी घरी नसतात तुला काही झालं तर कोण धावपळ करणार? म्हणून आम्ही तुझी वृद्धाश्रमात रहायची व्यवस्था केली आहे…..तिथे तुला काही त्रास होणार नाही. आम्ही मधून मधून भेटायला येत जाऊ.”
वृद्धाश्रमात रहायच ह्या कल्पनेने मी आणखीनच खचले,एक मुलगा असता तर? त्यांनी संभाळ केला असता ?असं परावलंबी जीवन जगण्याची वेळ नसती आली, मुली शेवटी परक्याचे धन च. अश्या विचारांनी मनात गर्दी केली. पण आता माझ्या हातात काही उरले नव्हते.
रीना मीना ने माझ्या आवश्यक वस्तू गोळा केल्या,”आई निघायचं ना ?” असं विचारल्यावर माझ्या डोळ्यांना धार लागली हातापायाची सर्व शक्ती गेल्या सारखे वाटत होते, तेवढ्यात बाहेर एक कार थांबल्याचा आवाज आला . आणी नंदा ने घरात प्रवेश केला सोबत शेखरन ही होते. त्यांच्या बरोबर एक लहान मुलगी ही होती.

“बरं झालं तू आली आता हे घर विकलं आहे व आई ला आम्ही…..” मीना पुढचं बोलण्या आधी च नंदा छोट्या मुलीला म्हणाली, “ही बघ तुझी आजी, तू हट्ट करत होती न आज आपण आजी ला आपल्या सोबत घेऊन जाऊ.”
“अग पण्– मी चाचरत बोलण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या तोंडावर बोट ठेवून ती म्हणाली “मला तू हवी आहेस ,मी बाबांना वचन दिले होते, शेवटी ते बोलले होते माझ्याशी. त्यांना काळजी वाटत होती तुझी.”
पण मी तुला …..” मला शरमेनं काही बोलता येत नव्हतं.
माझ्या हातावर हात ठेवून ती म्हणाली “आई तू मला जन्म दिला आहेस, येवढ पुरेस नाही कां ? इतक्या वर्षांनी मला ,फक्त मलाच तू मिळणार आहे हे सुख तरी मला मिळू दे. माझ्या मुलीला आजी चा सहवास लाभू दे. ताई, तुम्हाला आई ला भेटावसं वाटलं तर या माझ्या घरी.”
आम्ही वाटणी केली आहे,तुला काही —
तेवढ्यात नंदा तिच्या खोलीत गेली , येताना तिच्या हातात ह्यांचा फोटो होता,मी हा बाबांचाफोटो घेते आहे, तेवढंच मला हवंय.

मी दोन्ही मुलींकडे पाहिले मीना आणि रीना चा चेहरा आपल्या कोतेपणाच्या जाणीवेन काळवंडला होता. आणि त्या क्षणी मला नंदाच्या चेहेर्यावर प्रेम आणि कर्तव्यपूर्तीची तेजस्वी झळाळी दिसत होती.
हसर्या चेहऱ्याच्या शेखरन ने मला व्हीलचेअर वर बसण्यात मदत केली आणि त्यांच्या अलिशान कार मधे बसवले.

जवळच माझी नात आजी…आजी म्हणत बसली होती. नंदा समोर शेखर जवळ बसली आणि गाडी सुरू झाली. रियर व्ह्यू मिरर मधे पहात तिने चलायचं विचारले आणि कार फाटकातून निघाली…
ज्या नंदा चा तिसरी मुलगी च आणि रंग रुपाने माझ्या सारखी नसल्याने मी नेहमी तिरस्कार केला ,तेच माझं पिल्लू आज माझी जवाबदारी घेत होत,बदकांच्या कळपातील ती एक राजहंस होती …….
—-----------------------------
—---------------------
लेखन…सौ. प्रतिभा परांजपे.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा