Login

किती सांग आवरायचे

व्यक्त प्रेमाला अव्यक्त प्रतिसाद
बोलून सारे झाले उरले भाव मनाचे
सांग सख्या काय बोलू उरले काय बोलायचे

तू अबोल तू अव्यक्त तू वेध वेड्या मनाचा
खूपदा केला अट्टाहास नाही आता गुंतायचे

शांत या जीवनात उगी वादळ उठले नकळत
भावनेच्या पासाऱ्याला मी एकटीने किती आवरायचे

गुंतले मी निभावेन अगदी मनातून नाते तुझे माझे
पडझड सांग कुठे नाही मग काय जगणे सोडायचे

उनाड मनाच्या लहरी त्या बेभान होवून उधाण होणार
सांग तूच सख्या आयुष्याला किती असे जखडून ठेवायचे

संयमाचा बांध सख्या सोडशिल कदाचित कधीतरी
पण कळत मलाही तुला कसे नी कधी रोखायचे

रंग पाहिले जीवनाचे मनात भरला एक ही नाही
पण रंगात प्रेमाच्या तुझ्या मला आहे रंगायचे
0

🎭 Series Post

View all