(नवीन शिकणाऱ्यांसाठी) सोप्या पद्धतीने यशस्वीरीत्या मेडिटेशन कसे करावे?

It is quite difficult sometimes for beginners to neditate, because they dont know what is the proper process for that. In this blog I have explained how to meditate and what are the benefits of meditation.

आपल्या सगळ्यांना मेडिटेशन ( ध्यान साधना) या विषयाबद्दल उत्सुकता असते. त्यासाठी प्रत्येक जण गूगल वर सर्च करत असतात नाही तर विडिओ बघत असतात. मेडिटेशनचे ( ध्यान साधनेचे) फायदे आपल्या सगळ्यांना माहीतच आहेत. तरीही बऱ्याचदा असं होत असतं कि त्यामध्ये सातत्य राहत नाही. जेव्हा कधी आपल्याला उदास किंवा सुस्त वाटत असते तेव्हा आपल्याला वाटते कि अरे मेडिटेशन करायला हवं आणि मग आपण मेडिटेशन साठी बसतो. २ दिवसानंतर त्यामध्ये चालढकल व्हायला सुरुवात होते. ज्यांना मेडिटेशन कसं करायचं ते माहित असतं त्यांना मी नवीन काय सांगणार? पण हा ब्लॉग त्या लोकांसाठी आहे ज्यांना मेडिटेशन (ध्यानसाधना ) करायचं आहे पण कसं करावं ते माहित नाही त्यांच्यासाठी आहे.

सुरुवातीला मी इथे एक गोष्ट स्पष्ट करते कि आपल्या मनात सतत येणारे विचार किंवा आपल्याला विचलित करणारे विचार जादूने पुसले जातील असा कुठलाच प्रकार नाही. सध्या आपण फक्त आपले लक्ष आपल्या श्वासाकडे आणण्याचा सराव करणार आहोत. जेव्हा असं वाटेल कि लक्ष विचलित झाले कि लगेच आपण ते पुन्हा आपल्या श्वासावर आणणार आहोत.

श्वास घेताना आपल्या पोटातून श्वास घ्यायचा आहे , श्वास घेताना पोट फुगले पाहिजे आणि श्वास सोडताना पोट आत गेले पाहिजे. श्वास घेताना नेहमी पोटाचे आकुंचन आणि प्रसरण व्हायला हवं तरच समजा कि तुम्ही योग्य पद्धतीने श्वास घेत आहेत.

लहान बाळ असतात त्यांना श्वास घेताना पहा, लहान मूल श्वास घेताना त्याच्या पोटातून श्वास घेतो त्यामुळे त्याचे पोट फुगते, आणि श्वास सोडताना पोट आत जाते. हीच खरी श्वासोच्छवास करण्याची पद्धत आहे.

मेडिटेशन कसे करायचे?

१) आरामदायक जागा निवडा, मेडिटेशनला सुरुवात करण्याआधी किती वेळ करणार आहेत ते ठरवा. नवीन असाल तर ५ ते १० मिनिटाचा वेळ ठरवू शकता. तुम्ही ठरवलेला वेळ त्यासाठी तुम्ही मोबाईल वर किंवा घड्याळात अलार्म लावू शकता.

२) आरामदायक स्थितीमध्ये म्हणजेच पद्मासन किंवा सुखासनात बसा. हळुवारपणे आपले डोळे मिटून घ्या. आता लक्ष फक्त आपल्या श्वासाकडे केंद्रित करा. एक दीर्घ श्वास घ्या आणि येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या.

३) आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. आपल्याला आपला श्वास सर्वात जास्त कोठे वाटतो? तुमच्या पोटात? आपल्या नाकात? आपले लक्ष आपल्या श्वासोच्छवासावर ठेवण्याचा प्रयत्न करा.

४) जेव्हा तुम्ही श्वासाकडे लक्ष देणार तेव्हा तुमचा मन थोड्या वेळाने इतरत्र भरकटायला लागेल. जेव्हा तुम्हाला जाणवेल कि मन भरकटले आहे, लगेच पुन्हा आपले लक्ष आपल्या श्वासाकडे घेऊन यायचा आहे.

५) मन भरकटले म्हणून कुठल्याही प्रकारे स्वतःला दोष देऊ नका, जेव्हा जाणवेल तेव्हा पुन्हा श्वासावर या.

६) जेव्हा तुमची ध्यानाची ठरवलेली वेळ संपेल, तेव्हा हळुवारपणे डोळे उघडा. शांत बसून आजूबाजूच्या वातावरणातल्या आवाज लक्षात घ्या, तुमच्या शरीरावर काय संवेदना जाणवत आहेत त्याच निरीक्षण करा. त्याक्षणी तुमच्या भावना , विचार काय आहेत ते बघा.

https://www.youtube.com/watch?v=CKpYCae4DF0&t=4s10 Benefits of meditation that will CHANGE YOUR LIFE.

डोळे उघडल्यानंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. काय झाले? आपले मन आपल्या श्वासाकडे कितीवेळ केंद्रित होते? ध्यान करताना आपण कुठलेही निर्देश दिले नव्हते तरी आपले मन कुठे कुठे भटकून आले लक्षात आले का? ध्यानातून बाहेर आपल्यावर पुन्हा वाचन सुरु कारण्याआधी सुद्धा आपले मन स्वतःच्या विचारांमध्ये अडकले ते लक्षात आलं का. आपल्या मनात नेहमी काही गोष्टी सुरु असतात, विचारांचे चढउतार सुरु असतात.

आपण मेडिटेशनचा सराव करायचा आहे , कारण आपल्याला आपल्या गरजेच्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता असते. आणि आपण विचारांच्या आंदोलनामध्ये इतके अडकून जातो कि नक्की कशावर फोकस करावा ते समजतच नाही. आपलं मन जे सतत माकडासारखं इथून तिथे उड्या मारत असतं, त्याला आपल्याला नियंत्रणात ठेवायचा आहे. त्याच्या या माकडचाळ्याकडे आपलं लक्ष ठेवता येतं आणि त्याला कुठे थांबवायचा ते हे कळायला लागतं. ज्यामुळे आपल्याला हव्या त्या गोष्टींकडे आपण लक्ष केंद्रित करू शकतो. त्यासाठी हा ध्यानाचा सराव आपल्याला मदत करतो.

जरी आपण वर्तमानकाळात वावरत असतो, पण फक्त शरीराने राहत असतो, आपण एकतर भूतकाळात असतो नाहीतर भविष्यकाळात. आपल्याला प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायचा असेल तर वर्तमानात जगायला हवं ना.

आम्ही ध्यानाचा सराव करतो जेणेकरुन जेव्हा आपलं मन सामान्य दैनंदिन कसरत करीत असतो तेव्हा ते कसे ओळखावे हे आपण शिकू शकतो आणि कदाचित त्यापासून थोडावेळ थांबावे जेणेकरून आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करू इच्छित आहोत ते निवडू शकू. थोडक्यात, ध्यान आम्हाला स्वतःशी (आणि तसेच इतरांसोबतही ) अधिक चांगले संबंध ठेवण्यास मदत करते.

बस इतकेच करायचे आहे, आपल्या ध्यानाच्या सरावामध्ये आपल्याला सातत्य ठेवायचे आहे. आणि शक्यतो त्यासाठीची वेळ ठरवायची आहे.

तुम्हा सर्वाना माझ्याकडून या नवीन सरावासाठी खूप खूप शुभेच्छा. तसेच जर माझे ब्लॉग्स आवडत असतील तर मला कंमेंट बॉक्स मध्ये कळवा.

धन्यवाद.

NLP Practitioner & Counselor Smita Ajay Chavan