हृदयी वसंत फुलताना- भाग 4(अंतिम)

फायनली आपला हा ग्रुप मनालीला पोहोचला...
भाग 4

      फायनली हा आपला हा ग्रुप मनालीला पोहोचला होता. मनालीच सौंदर्य जणू हृदयाचा ठाव घेत होतं. सगळेच जणू स्वर्गाच दर्शन करण्याचा फिल घेतं होते.

           "शुक शुक... सायली... इतक्या सुंदर वातावरणात तरी यांच प्रेम बहरेल... निदान जाणिव तरी होईल म्हणून आपणं हा प्लॅन केला गुपचूप... पण व्यर्थ... कशाच काय अन् फाटक्यात पाय... कसले बोअर आहेत यार हे दोघे..." सोहम हळूच सायलीला म्हणाला

          "हम्म एक नंबर बोअर आहेत... अन् तुझा तो मित्र नुसताच दिसायला हँडसम... वाटलं नव्हत इतका अनरोमँटिक असेल..." सायली तोंड वाकडं करत म्हणाली...

         "देवा... उगच आले मी... नुसती कबाब में हड्डी" आरती पुरती वैतागली होती..

         "तू मनालीच सौंदर्य बघुन घे... कशाला आमच्याकडे लक्ष देते" सोहम


         "किती सुंदर आहे ना मनाली?" दुर्वा पुरती भारावून गेली होती... आज ती खूपचं आनंदी दिसतं होती पण कार्तिक तिलाच पाहण्यात दंग होता. खरचं तीही आज मनाली इतकीच सुंदर दिसतं होती. किती निरागस होत ते सौंदर्य... तो तिच्याकडे पाहत असतानाचा तिने पाहिलं... क्षणभर दोघांची नजरानजर झाली पण मागच्या ग्रुप ने दोंघांची तंद्री मोडली.... असेच दोन दिवस गेले एकमेकांच्या सहवासात... तो क्षण तिथेच थांबवा... संपूच नये असं वाटतं होत...
***

            पंधरा ते वीस दिवसांनी लगेच कॉलेज सुरू झालं... सगळ्यांचं डेली रूटीन चालु झालं. दुर्वाचा देखील कॉलेज, अभ्यास, प्रॅक्टिकल , घरकाम करता करता दिवस कसा जायचा हे देखिल कळायचं नाही. पण राहून राहून प्रकर्षाने तिला कार्तिकची आठवण यायची. जेव्हां एकांत तिला खायला उठायचा ... त्या एकटे पणात ही तिला त्या आठवणी कायम दिलासाच द्यायच्या... कार्तिक ची ही काही वेगळी अवस्था नव्हती... तोही कधीतरी कॉलेज सुटलं की तिला भेटायला यायचा... असेच दिवस जात होते... खूप दिवस झाले तरी कार्तिक दुर्वा ला भेटायला आला नव्हता. फोन करावा तर दुर्वा चा फोन खराब झालेला... कोणाकडून घ्यावा तर ते काय समजतील... अशी अवस्था दुर्वाची झालेली.

                 एक दिवस तीच सायली सोबत त्याच्या घरी गेली. अन् त्याच्या मॉम कडून समजल की कार्तिक अमेरिकेला गेला आहे दोन वर्षासाठी.... हा एक धक्काच होता दुर्वासाठी... निदान त्यानें सांगायला हवं होत... दुर्वा पुरती कोलमडून गेली होती... जणू तिच्या आयुष्यातलं सुख कोणी अचानक हिरावून घ्यावं...

सुन्या सुन्या मैफिलीत शब्द झंकारले आज
मनातल्या भावनांना अलवार चढे साज

आठवांत लीन होता ओघळती अश्रू धारा
आला दाटून कंठ हा चालला शब्दांचा मारा

धुंद मी मैफिलीत या गीत तुझेच रे गाते
असे कसे दुरावले? तुझे अन् माझे नाते

रंग लागला आठवांना गंधाळली प्रीत पुन्हा
सखी तुझी मी जाहले घाव हा, ना कळे कुणा
***

दोन वर्षानंतर.....

       
           "झालं का ग आवरून?... केव्हाची नटतेय... पाहुणे येतच असतील... निघ आता पडद्यातून बाहेर... बघायला येताहेत... लग्न करायला नव्हे..." सुमित्रा बडबड करत होती तोच बाहेर गाडी थांबल्याचा आवाज झाला...

        "अग बाई... आले वाटतं पाहुणे... एकदा हीच लग्न लावून दिलं की मी मोकळी" सावित्री बाहेर जात म्हणाली.

            एक थोडीशी वयस्कर स्त्री... तिच्यासोबत एक मुलगी.... जवळजवळ त्या स्त्री च्या वयाचाच एक माणूस.... अन् फॉर्मल सूट बुट घातलेला तरुण.... असे सगळेजण गाडीतून खाली उतरले.

           "या या"... सुमित्रा त्यांना हाताने आत यायचा इशारा करत होती.

         "हॅलो मिस्टर देशपांडे".... दुर्वाच्या वडिलांनी शेकहॅन्ड केला. हेचं आतल्या दुर्वा ने ऐकलं...

        "देशपांडे?".... तिला आपसूकच कार्तिक ची आठवण झाली अन् डोळयात पाणी आले... शिताफीने तिने ते लपवले. असेल कोणीतरी म्हणून ती गप्पच बसली.

            "दुर्वा.... पोरी... ये बर अशी चहा घेऊन..." सुमित्रा बाहेरूनच ओरडली.
     तशी हातात ट्रे घेवून दुर्वा खाली मान घालून आली. मोरपंखी रंगाची पैठणी... केसांची वेणी... हलका मेकअप... हातातल्या बांगड्या हळुवार किणकिण करत होत्या... अन् इकडे... इकडे मात्र त्याचा जीव खालीवर होत होता.... तिने एकदाही मान वर केली नाही...

             "मुलगी आम्हाला पसंत आहे. अगदी लक्ष्मी आहे.आता आम्हाला तुमच्याकडून होकार कळाला की उडवून देऊ बार पुढच्या महिन्यात."

          "अहो आमच्याकडुन नकार कसा असेल बरं? तुम्हीं फिक्सच समजा."

        "मुलांचं पण मत विचारात घेतलं पाहिजे नाही का?"

         "हो हो ते तर आहेच की... जा बाळांनो तुम्ही वरती गच्चीवर जाऊन बोलून या "

          तशी दुर्वा खाली मान घालूनच निघून गेली मागोमाग तो तरुण देखिल गेला.
***

           "दुर्वा..."

        झटकन मान वर करुन दुर्वा ने समोरच्या तरुणाकडे पाहिलं अन् तिचे डोळे भरून आले... ओठ थरथरू लागले...

        "कार्तिक".... त्वेषाने तिने त्याला घट्ट मीठी मारली अन् हुंदके देऊन रडू लागली. त्याच्या छातीवर बुक्क्या मारून ती रडत होता अन् तोही आज आसव रीती करत होता.

       "सॉरी आय एम वेरी सॉरी दुर्वा...."

   "आता सॉरी म्हणून काय फायदा रे... माहितीय मी किती मिस केलं तुला... किती रात्री जागले... किती दिवस मेले... हा... इतकं दुःख झालेलं मला ते भरून काढेल तुझं हे सॉरी... बोल ना..." दुर्वा अजुनच धाय मोकलून रडू लागली.

          "माझं ही हेचं हाल होत दुर्वा.... तुझ्याशिवाय जगणं अधुर होत माझं... बोल आता कायम माझी होशील?"

        तिने आनंदाने त्याला मिठी मारली. इतक्या दिवसांचा दुरावा प्रेमाची जाणीव करुन गेला होता...दोघांच्याही हृद्यातला वसंत पुन्हा एकदा नव्याने बहरणार होता....

समाप्त!!


        

   

          
         

         

        


🎭 Series Post

View all