भाग 1
हृदयी वसंत फुलताना प्रेमात रंग यावे..
प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे...
प्रेमात रंग भरताना दुनियेस का डरावे...
समोर स्टेजवर गाणं वाजत होत... एक मुलगी अन् मुलगा या गाण्यावर थिरकत होती. समोरचे सगळे स्टुडंट्स चिअर अप करत होते... गाणं संपल अन् 'वन्स मोअर... वन्स मोअरचा' एकच कल्ला झाला....
के. बी. पी. कॉलेजच आज वार्षिक स्नेहसंमेलन होत. कॉलेज शहरातील नावेजलेल. बाहेरच्या सिटी मधून बरेच विद्यार्थी तिथे शिकायला यायचे. आज कॉलेज मद्ये भलताच उत्साह पसरला होता. नाटिका, गायन तर तऱ्हेतऱ्हेच्या गाण्यांवर डान्स सादर केले जात होते. त्यातलच हे शेवटचं लास्ट अँड बेस्ट गाणं.... फर्स्ट इयरची दुर्वा.... आणि सेकंड इयरचा कार्तिक... असे काही जोशात थिरकत होते की... अगदी सगळेच थक्क होऊन बघत होते... कोणी चिअर अप तर कोणी वन्स मोअर...

अगदी शेवटच्या क्षणालाच दुर्वाचा तोल गेला पण कार्तिकने तिला सावरलं... एक रागीट लूक देऊन दुर्वा निघून गेली.
"कमाल आहे बुवा... थॅन्क्स बोलायचं सोडुन ही अशी मारक्या म्हशी सारखी बघतेय... हुह..." कार्तिक मनातल्या मनातच बडबडला.
"कमाल आहे बुवा... थॅन्क्स बोलायचं सोडुन ही अशी मारक्या म्हशी सारखी बघतेय... हुह..." कार्तिक मनातल्या मनातच बडबडला.
तर असा हा कथेचा नायक... कार्तिक देशपांडे. सेकंड इअरचा टॅलेन्टेड विद्यार्थी. सगळेच त्याच्या मागे पूढे करणारे. कॉलेजमद्ये प्रवेश घेतल्यापासून आजपर्यंत कधीचं त्यानें फर्स्ट रॅंक सोडली नाही. हुशार तितकाच हँडसम... पोरी मागेपुढे करणाऱ्या पण हा मात्र एकीला ही भाव न देणारा....
दुर्वा घोलप... फर्स्ट इयरची विद्यार्थिनी आणि कथेची नायिका... मध्यम हुशार... रागीट पण तितक्याच मृदू स्वभावाची... मुलांपासून हातभर दूरच राहणारी.... कोणी नडलाच तर पाच बोटे गालावर उमटलीच म्हणून समजा... साधं राहणीमान.... पण त्या साधेपणातही तीचं रूपडं कमालीचं खुलून दिसायचं....
दोघेही सामान्य कुटुंबातून... दुर्वा त्याच सिटी मधून होती पण कार्तिक बाहेरून शिकण्यासाठी आलेला. खरंतर दोघांचीही ईच्छा नव्हतीच डान्सिंगची पण कधी काळी कार्तिक ला बेस्ट डान्सर अवार्ड मिळालेला त्यामुळे सगळ्यांनी त्याला फोर्स केलेला अन् दुर्वाला आधीपासूनच डान्सची आवड होती पण एका मुलासोबत डान्स करायची तिची मुळीच ईच्छा नव्हती तरीही मैत्रिणींच्या हट्टापायी तिने डान्स केला.

"काय मग कार्तिक... कस वाटलं ओल्ड अँड न्यू कॉम्बिनेशन?" सोहम त्याचा मित्र हसतच आला सोबत तीन चार जण होतेच.
"म्हणजे?.." कार्तिक न समजून बोलला.
"अरे यार... जुनं गाणं आणि ती नविन ब्युटी गर्ल कशी वाटली असं म्हणायचं आहे मला..." ग्रूप मद्ये एकच हशा पिकला.
"शट अप... काहीतरीच काय ह?... तुम्हाला काय तेवढंच काम आहे का? चला निघा प्रोफेसर काय ऑर्डर देतात का बघा..." कार्तिक वैतागुन ड्रेस चेंज करायला गेला....
***
***
"कसला भारी दिसत होता ना तो कार्तिक... यार मी तर त्यालाच बघत बसले होते... अख्ख गाणं संपे पर्यंत... काय ग दुर्वे... शेवटी चुकून तुझा तोल गेला की मुद्दामहून पडलीस ह?...." सायलीने गुपचूप आरतीला डोळा मारला तश्या दोघीही हळुच हसल्या.
"सायली तू तर गप्पच बस ग... तुला मी चांगली ओळखते. नुसता सिसीटिव्ही आहेस माझ्या मागे लागलेला. आणि हो.. तो कार्तिक काय हिरो नाही लागून गेला मी मुद्दामहून त्याचं अटेंशन घ्यायला..." दुर्वा मेकअप उतरवत होती. आताच बोललेल् तिच विधान तिलाच पटेना झालं... नाही म्हणायला तिला ही आज प्रकर्षाने जाणवलं होत की खरचं कार्तिक इतरांहून बराच वेगळा आहे. तोल जाताना त्यानं सावरलं खर पण त्याच्या डोळ्यांत निव्वळ काळजी दिसत होती अन् ती दुर्वाच्या नजरेतून सुटली नव्हती.
"हृदयी वसंत फुलताना..." सायली अन् आरती दोघी तिला चिडवू लागल्या.
"स्टॉप इट... गाइज् माझी चैन हरवली आहे. कूठे पडली माहित नाही? आताच लक्षांत आलं माझ्या... प्लिज शोधू लागा रे... नाहीतर आई मला सोलून काढेल..." दुर्वा काळजीने शोधाशोध करत होती. तिघींनी ही सगळीकडे शोधून पाहिलं पण कुठेच सापडली नाही.

"अग दुर्वा एकतर ती चैन गोल्ड आहे म्हणाल्यावर तू अश्या फंक्शनला नव्हती घालायची." आरती
"ह्ममम... आता ती स्टेजवर पडली असेल तर?" सायली
"पाहू उद्या प्रोफेसरना सांगू... आई तर कच्च खाईल मला... तिला वाटेल मीच लपवली वगेरे... सायू तुला माहितीय न ती बाई कशी आहे?" दुर्वा काळजीत पडली होती.
"नको काळजी करू... आपणं काहीतरी करु... ओके. आता चल लेट होतोय आपल्याला आधीच प्रोफेसर सरांकडे जाऊन येऊ..." सायली म्हणाली अन् त्या तिघीही थेट केबिन कडे निघून गेल्या...
***
***
कार्तिक चेंज करत होता. सदऱ्याच बटन काढतानाच त्याच्या बोटांना काहीतरी टोचले... त्याने आरशात पाहिले तर बटणाला एक चैन अडकली होती. कदाचित गोल्ड असावी. त्याने पटकन सदरा काढून ती चैन सोडवून घेतली. चैनच्या मधोमध एक नेम होत....'शारदा'....
"कोणाची असेल? .... माझ्या शर्ट मद्ये कशी अडकली? " पण लगेच दुर्वा ला सावरल्याचा तो प्रसंग त्याला क्लिक झाला... "पण तिच तर नावं दुर्वा आहे... मग?... असो.. विचारायला काय हरकत?" त्याने ती चैन जशीच्या तशी जीन्सच्या खिशात ठेवून दिली...
***
***
क्रमशः....