Login

हृदयी प्रीत जागते भाग३

Story Of Two Friends And Their Love

ह्रदयी प्रीत जागते भाग ३

क्रमश: भाग २
शंतनू इकडे मोठया राजेशाहीत मामी कडून सेवा करून घेत होता .. मामीने त्याला हळदीचा लेप लावला होता, हळदीचे गरम गरम दूध प्यायला देत होती . मिरच्यांनी त्याची दृष्ट काढून टाकली आणि हे सगळे तो मस्त एन्जॉय करत होता ..
डोळे मिटले कि समोर ति पाठमोरी मुलगी आणि तिचा आवाज " थँक यु " असे यायचा आणि चक्क लाजायचा .. मामा हे सगळे दुरून बघत होता .. पोरगं भर दिवसा स्वप्नं पाहतंय म्हणजे नक्कीच प्रेमात पडलंय याचा अंदाज आला त्यांना.
मामा "काय रे शंतनू ... हातालाच लागलंय का डोक्याला पण लागलंय? "
शंतनू " मामा .. डोक्याला नाही लागलाय रे "
मामी " बघू .. बघू ..” आणि मामीने लगेच त्याच्या केसातून हात फिरवला .
मामी " नाहीये काही .. डोक्याला .. तरी पण आता तू चांगला महिनाभर आराम कर"
शंतनू" अग, मामी इतकं काही नाही झालंय .. तू नको काळजी करुस "
मामी " बरं चल, मी जेवणाचे बघते .. "आणि मामी आत निघून गेली.
मामा " काय रे .. एकटाच हसतोय काय ? लाजतोय काय ? काय होतंय काय तुला ?" जरा खडसावूनच विचारलं मामाने
शंतनू " मामा, बहुतेक मी प्रेमात पडलोय"
मामा " नक्की गाडीवरनं पडलास कि प्रेमात पडलास ?"
शंतनू " दोन्ही रे मामा .. आता मामा तुला सून आणायला हवी "
मामा " तरीच असा भयसाटल्या वाणी वागतोय तू ."
शंतनू " परी म्हणू कि अप्सरा ..
पाहता तुला झालो दिवाणा
हृदयात दे आसरा
बनव मला तुझा साजणा "
मामा " जोड्याने हाणींन आता तुला ?"
शंतनू " मामा,अरे खरंच सांगतोय मी .. मला ती मुलगी खूप आवडलीय ?"
मामा " अरे कोण आहे ती ? आपल्या गावात अशी कोण अप्सरा नाहीये?"
शंतनू " आहे ना मामा, मी माझ्या या नयनांनी तिला पाहून आलोय ."
मामा " पायताण हाणींन हा आता नीट बोल .. तुझ्या बापाला कळलं ना तर मला धारेवर धरेल तो "
शंतनू " मामा,म्हणून तर तुला बोलतोय .. मामा मला वाचवं.. मला खूप आवडलीय ती मुलगी .. एवढ्या पोरी कॉलेजमध्ये बघतो पण हिला बघून माझ्या हृदयात वाजे समथिंग असे झालंय. "
मामा " घंटी वाजली ?"
शंतनु " हा ना .. तुने मारी एंट्री .. और दिल में बजी घंटीया .. टन टन टन " तो ऍक्शन करून दाखवू लागला
मामा त्याचे ध्यान बघून हसत होता
मामा " चल मग शोधू तिला ?"
शंतनू " नको .. नको आता नको .. आता मला लागलंय .. आता मी हँडसम नाही दिसणार .. आता तू म्हणतोस तशी जरा मिशी वाढवतो .. कदाचित ती गावातली आहे ना तिला मिशीवाला मुलगा आवडत असेल, पैलवान. "
मामाने त्याच्या पाठीवर थाप मारली तर शंतनू दोन पाऊले पुढे ढकलला गेला .
मामा " ओ पैलवान,ताकद अंगात पण लागतेय "
शंतनू " मामा .. आता मी रोज जिम ला जाईन .. आता महिना भरात बघच तू .. एकदम अर्नोल्ड बनतो कि नाही ते "
मामा " आता हा आणिक कोण ?"
शंतनू " हॉलिवूड स्टार आहे तो .. एकदम पैलवान "
मामा " मेलास नाही कधीचा .. हिकडचे सगळे मेले का ?"
शंतनू " मामा, तू पोरगीचा शोध लाव .. बाकीचं मी बघतो "
मामा " मी कशी ओळखणार तिला ?"
शंतनू "आपल्या गावात नव्या का दिव्या आहे का कोण बघ ना .. एवढीच माहिती आहे तिच्याबद्दल."
मामा " ठीक आहे .. मी माहिती काढतो."
शंतनू " मामा .. थँक यु .. थँक यु ."
थँक्यू बोलल्यावर शंतनू पुन्हा तिच्या आठवणीत गेला.
----------------------------------------------------------------------
आज कॉलेजच्या स्पोर्ट्स टीम्सला कॉलेज कडून पार्टी होती आणि त्यांचा सत्कार कारणार होते ..मंथन मस्त ब्लेझर घालून तयार .. एकदम हँडसम दिसत होता .. जेलने केस सेट केले परफ्युम मारला आणि पार्टीला जायला निघाला .. आज बाबांची कार घेऊनच तो पार्टी हॉल ला निघाला .. मस्त मोठ्या हॉल समोर कार मोठ्या शान मध्ये पार्क केली .. बाहेर आल्यावर त्याच्या मित्रांनी त्याला घेरले .. आज सगळेच विनिंग टीमचे म्हणून छान ब्लेझर मध्ये आले होते .. त्याच्या कार समोर सगळे फोटो काढत होते .. मधेच मज्जाव मस्ती ,दंगा चालूच होता .. जोर जोरात हसत होते ..
तेवढयात मुलींची फुटबॉलची टीम दोन ऑटो मधून उतरली ..
मुली पण ब्लेझर मधेच आल्या होत्या .. सगळ्या खूप खुश दिसत होत्या .. आणि त्यात ती सर्वांच्या दिल कि धडकन तर नजरेचे बाण मारून बेजार करत होती ..
थोड्याच वेळात प्रोग्रॅम सुरु झाला .. मंथन आणि तिला कॅप्टन म्हणून स्टेज वर एकत्र बसवले होते .. ती त्याच्याकडे बघत पण नव्हती आणि हा त्यामुळे अस्वथ होत होता .. आता पर्यंत कोणत्याच मुलीने त्याला इग्नोर केलेलं त्याला माहित नव्हतं .. हि कोण आहे एवढी जी मला इग्नोर करते .. साधे हाय पण बोलत नाहीये .. म्हणून मनातल्या मनात फुगला होता तो ... तिच्यावर .
मुलींच्या टिम ला स्टेज वर बोलवून सगळ्यांना गोल्ड मेडल दिले ..तेव्हा मंथनला कळले कि हिचे नाव नव्या सरपोतदार आहे ..
मंथन मनात " सो इट्स नव्या .. मंथन आणि नव्या जोडी छान आहे " आणि गालात हसला
मग बॉईजच्या टीम मधल्या सगळ्या मेंबर्सला बोलावून त्यांना पण गोल्ड मेडल दिले
मग कॅप्टन म्हणून दोघांनी छोटेसे भाषण केले .. आणि मग पार्टी सुरु झाली
मंथन मुलांच्यात गेला .. नव्या मुलींच्यात गेली
मंथनचे आज काही पार्टीत लक्ष लागे ना .. तेवढ्यात एक मुलींच्या टीम मधली मुलगी शुभ्रा आली
शुभ्रा " मंथन , एक सेल्फी घ्यायचा का ?"
मंथन " हो चालेल कि ?"
मग टीम मधल्या प्रत्येक मुलगीने मंथन बरोबर सेल्फी घेतला .. मंथनच्या हृदयात धडधड वाढली कदाचित आता ती पण येईल माझ्या बरोबर सेल्फी मागायला.या विचाराने हलचाल सुरु झाली . पण प्रत्यक्षात ती आलीच नाही उलट बाकीचे बॉईज जाऊन तिच्या बरोअबर सेल्फी घेत होते .. आणि ती मस्त हसत त्यांना पोज देत होती .. त्यात आपल्या अविनाशला सेल्फी मिळाला होता .. आणि तो काय च्या काय खुश होता ..
मंथनला त्याने सेल्फी दाखवला तर तो मनातून भयानक चिडला होता .. पोरगी भीक घालत नाही त्याला आता करायचं काय ? हा प्रश्न अनुत्तरित राहिला . तिला आजू बाजूला असलेल्या सगळ्या लोकांशी बोलताना त्याला पाहवत नव्हतं .. फक्त ती मला एकट्यालाच का वाळीत टाकतेय हेच त्याला कळत नव्हतं ..
डिनर झाल्यावर सगळ्या मुली कोणा कोणा बरोबर निघून गेल्या .. नव्या मात्र एकटीच राहिली मागे .. घड्याळात बघितले तर १२ वाजायला आले होते .. नव्या बाहेर आली ऑटोला बुक करू लागली .. तेवढयात मंथन कार घेऊन समोर उभा राहिला
मंथन " गेट इन आय विल ड्रॉप यु "
नव्या " नाही .. नको .. म्हणजे मी करेन मॅनेज .. थँक यु "
मंथन " आय सेड गेट इन .. इट्स अल्मोस्ट ट्वेल्व्ह इन द नाईट "
नव्या " हो .. ते सगळ्या मैत्रिणी अचानक गेल्या .. कोणी मला आधी आयडिया दिली नाही .. नाहीतर मी जरा लवकर निघाले असते "

मंथन " इट्स ओके . कम आय विल ड्रॉप यु "
नव्या पुढे पर्यायच नव्हता .. पटकन बसली ..
मंथन " ऍड्रेस दे .. कुणीकडे घर आहे ?"
नव्या " अ .. ते कॉलेज गर्ल्स हॉस्टेलला जायचंय "
मंथनने त्याचा ब्लेझर काढला होता .. टाईट फिटिंगचे शर्ट .. त्याच्या बॉडीला चिकटून बसले होते .. असला हॉट दिसत होता .. ती एक क्षण त्याच्या ऍब्स कडे बघतच बसली .. ह्याच्या हृदयातली हलचल पण जोर जोरात चालू होती .. इतके फास्ट हार्टबीट्स ..
दिल कि धडकन बढती जाये
सामने जब वो आये
प्यार इसिको कहते है क्या
कोई ये समझाये
मंथन फार काही न बोलता गाडी ड्राईव्ह करत होता
नव्या " फ्रेंड्स .. " असे म्हणत तिने तिचा हात पुढे केला
मंथनने एकदम चमकून तिच्याकडे बघितले
मंथन " आय थिंक .. तुला मी इतका फार आवडलेला दिसत नाहीये .. तू सकाळ पासून मला खूप अव्हॉइड केलंय .. इट्स ओके .. इफ यु आर नॉट इंटरेस्टेड .. "
नव्या एकदम गोड हसली " ते मी मुद्दामून नाही केलं .. कदाचित आपोआप होऊन गेलं .. ऍच्युअली मला वाटले कि तू .. आय मिन तू खूप ऍटिट्यूड वाला आहेस .. तुला तुझ्या लुक्सवर , फिजिक्स वर , तुझ्या कॅप्टन शिप वर गर्व आहे .. म्हणून मी तुझ्याकडे दुर्लक्ष केले "
मंथन " बहुदा ते खरं आहे .. मी आहे ऍटिट्यूड वाला .. आणि का नसावा ? एकही मॅच हरलो नाहीये .. दिसायला हँडसम आहे ,डोक्याने हुशार आहे आणि बाप पैसेवाला आहे "
नव्या " म्हणूनच मी दुर्लक्ष केले .. मी या सगळ्याला शून्य मानते .. मला जर कोणी ऍटिट्यूड दाखवला तर मी त्याला खूप ऍटिट्यूड दाखवते मग " आय मिन हम भी कुछ कम नहीं " आणि गोड हसली .. आणि इकडे ह्याच्या काळजाचा तुकडा पडला होता .. शुभ्रकांती दात इतके सुंदर दिसले.
मंथन " यु आर ब्युटीफुल , यु आर स्पोर्ट्स पर्सन , युअर जर्सी नंबर इज अल्सो २.. यु आर लाईक मी .. आय मिन व्युई ह्याव कॉमन थिंग्स "
नव्या " फक्त एक नाहीये "

मंथन " काय ?"
नव्या " हा ऍटिट्यूड " तसे दोघे खळखळून हसले.
मंथन " विथ फ्रेंड्स आय एम एकदम फ्री .. "
नव्या " गुड "
मंथन " चलो मॅडम .. युअर हॉस्टेल इज इज हिअर. "
नव्या " हे थँक यु .. सी यु टुमॉरो "
मंथन " लेट्स बी फ्रेंड्स " म्हणतच त्याने हात पुढे केला . आणि तिने हि त्याच्या हातात हात दिला आणि शेक हॅन्ड्स केले "
नव्या " सकाळी गोल मारला कि माझ्याकडे का बघत होतास ? मी काय तुला हरवायला नव्हते गोल्स केले .. मी आमची मॅच जिंकायला गोल्स मारले होते "
मंथन " ओह !! दयाट इज व्हाय यु आर अँग्री "
नव्या " मग काय ? प्रत्येक गोल मारला कि माझ्याकडे बघत होतास तू ? जसे कि मी तुझ्या पेक्षा जास्त गोल कसे मारतो ते बघ म्हणून "
मंथन हसला " ते मी तुझ्याकडे का बघत होते ते मी सांगेन तुला कधीतरी .. पण तुझ्या पेक्षा गोल्स जास्त मारायचे वगैरे असे काही नव्हते माझ्या मनात "
नव्या " मग दिसत तर तसेच होते "
मंथन " काही वेळा गोष्टी जशा असतात तशा दिसत नाहीत "
नव्या " ओह ! कॉम्प्लिकेटेड .. एनी वेज .. थँक यु वन्स अगेन .. अँड नाईस टू मीट यु " म्हणतच ती निघून गेली .. ती गेटच्या आत जाई पर्यंत तो तिथेच थांबला आणि मग गेला हे तिनेही नोटीस केलं होतं.
0

🎭 Series Post

View all