क्रमश : भाग ५
नव्या मंथनला कॉल करत होती आणि तो चक्क कॉल कट करत होता .. नव्हतं बोलायचं त्याला तिच्या जवळ .. तिच्या जवळ बोलायचं म्हणेज आपल्या सख्या मित्राला फसवतोय असे काहीसे त्याला वाटत होते .. खरं तर तोही एकदम मनातून खचला होता .. नव्याला पाहून त्याची जागच्या जागी विकेट पडली होती .. पाहताच क्षणी ती त्याला त्याची वाटली होती .. आणि आता हे काय होऊन बसले ..
एकाच दिवशी दोघे एकाच मुलीच्या प्रेमात पडले होते .. हा कसला अजब योगा योग आला होता जुळून ?
नव्याने जवळ जवळ २० वेळा कॉल केला आणि त्याने तो तितक्यांदा कट केला ..
शंतनू आणि मंथन का कोणास ठाऊक पण एकमेकांना नजर देत नव्हते उलट अव्हॉइड करायला बघत होते .. नको वाटत होते त्यांना समोर जायला ..
शंतनू दोन दिवस घरातच राहिला .. बेड वर नुसता झोपूनच , पडूनच होता .. शेवटी बाबांना राहवेना
बाबा " शंतनू ? काय झालेय ? का असा डिस्टर्ब वाटतोय ?\"
शंतनूने बाबांना एकदम मिठीच मारली " बाबा,मला काय करू सुचत नाहीये ? मला ती मुलगी खरंच आवडलीय ? माझे प्रेम आहे तिच्यावर .. पण ता मला कळतंय कि मंथनला पण तीच मुलगी आवडलीय .. मामा त्यांच्या घरी माझ्या लग्ना विषयी बोलायला पण गेला होता .. बाबा मी काय करू ?"
बाबा " अरे वेडा कि खुळा ? असा रडतोस काय ? मुली सारखा ?"
शंतनू " बाबा, नका ना असे बोलू ?"
बाबा " हे बघ , आता त्या मुलीच्या मनात नक्की कोण आहे हे काढ ? तिला काय हवंय हे हि महत्वाचे आहे कि नाही ? "
शंतनू " बाबा, मला भीती वाटतेय .. तिला जर मी आवडलो नाही तर ?"
बाबा " म्हणजे मग तुलाच माघार घ्यावी लागेल ? कसे आहे शंतनू लग्न हे दोघांचे असते ? दोघांचे एकमेकांवर प्रेम असले पाहिजे ? हो कि नाही ? मग ?"
शंतनू " पण मला ती आवडलीय म्हटल्यावर मंथन तिच्याशी लग्न करणार नाही ?"
बाबा " तो हि तोच विचार करत असेल ?"
शंतनू " हो ना ? म्हणूनच तर नक्की काय करू ? ते कळत नाहीये ?"
बाबा " तिला जाऊन विचार ? तिला कोण आवडतंय ? कदाचित तुम्ही दोघे नाही अजून कोणीतरी तिसरा तिच्या आयुष्यात असेल ... "
शंतनू "असे तर मी कधीच होऊ देणार नाही .. माझ्या मित्राचे प्रेम त्याला मिळालेच पाहिजे ?"
बाबांनी डोक्यावर हात मारून घेतला .. त्यांना कळेना नक्की ह्याला कशाचं आणि कोणाचं दुःख आहे "
-----------------------
मंथन फुटबॉलची प्रॅक्टिस करून ग्राऊंड बाहेर आला तर नव्या तिथे आली होती
नव्या " मंथन , मला बोलायचंय ? मी किती कॉल केले ? तू कॉल का घेत नाहीयेस माझा ?"
मंथन " मला नाही बोलायचं ? प्लिज "
नव्या " अरे माझे ऐकून तर घे ?"
मंथन " अरे जेव्हा शंतनू माझ्या बरोबर असेल तेव्हाच तू बोलायचं माझ्याशी ?"
नव्या " त्याचा काय संबंध ?"
मंथन " संबंध ? तू होणारी बायको आहेस त्याची "
नव्या " शट अप .. माझे निर्णय मी घेत असते ? "
मंथन " घे मग .. मला कशाला मध्ये घेतेय ?तुला काय करायचय ते करायला तू मोकळी आहेस "
नव्या " मंथन .. माझे ऐकणार आहेस का ? प्लिज "
मंथन " आय सेड नो "
आणि मंथनने गाडीला किक मारली आणि निघून पण गेला ..
इतका कठोर वागला होता तो त्याच्या प्रेमाशी .. घरात आला आणि तोंडावर पाणी मारून मारून तोंड धुवताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली त्याने .
---------------------------------------
रागातच तीने आजोबांना फोन केला आणि सांगितले कि मी लग्नाला तयार आहे ..
इकडे मामांना सरपोतदार आजोबांनी फोन करून होकार कळवला आणि लवकरात लवकर पुढची बोलणी करायला या असे कळवले.
मामांनी लगेच शंतनूच्या आई वडिलांना कळवले कि मुलीने होकार दिलाय आणि तिला शंतनू बरोबर लग्न करायचे आहे .. शंतनूचे बाबा एकदम खुश झाले त्यांना वाटले कि मुलीने होकार दिलाय म्हणजे मुलीला शंतनू पसंत आहे .. लगेच ह्याच रविवारी गावाला जाऊन मुलगी बघून जमलं तर लगेच टिळा करायचा असे घरातले ठरवू लागले .मामाने आणि बाबांनी मिळून शंतनूला हे सरप्राईज द्यायचे ठरवले त्यामुळे हि गोष्ट त्याच्या पासून लपवून ठेवली ..
---------------------------------------------------
इकडे नव्याने शंतनूला गाठले .
नव्या " काँग्रट्स "
शंतनू " कशा बद्दल ?"
नव्या " तुझे लग्न ठरले ना ?"
शंतनू " अजून तरी नाही .. मुलीने होकार दिला नाहीये "
नव्या रागातच " अरे .. अजून किती होकार पाहिजे तुला ? सांगितले ना घरी आजोबांना कि मी लग्नाला तयार आहे म्हणून "
शंतनू " काय ? मला हे कोण काहीच बोलले नाही ?"
नव्या " तू चेक कर घरी "
शंतनू " काय मॅटर आहे .. सांगशील का नीट ? मंथन आणि तुझा ?"
नव्या " तू तुझ्या मित्राला विचार ना ? सगळे मीच कशाला सांगू ?"
शंतनू " ए तू माझ्याशी नीट बोलत जा हा .. नाहीतर विसरून जाईन कि तू एक मुलगी आहेस ? उगा फुकट नडायचं नाही "
नव्या एकदम रडायलाच लागली तशी शंतनूची हवा टाईट झाली
शंतनू " सॉरी .. सॉरी .. रडतेस तू पण बाकीच्या पोरीनं सारखी "
नव्या " मग काय करू ? रडायलाच लावता तुम्ही लोक .. दगड आहेत सगळे .. आजोबा , मंथन , तू , तुझा मामा .. सगळे " हुंदका
शंतनू " अरे आम्ही दोघांनी काय केलंय ? आता तू सांगितलेस म्हणून थांबवले होते ना मी टिळा ना बिळा .. मग तुला कोणी शहाणपणा करायला सांगितला होता "
नव्या " त्या मंथनला थोबडवावीशी वाटते मला.. ऐकून पण घेत नाहीये अजिबात”
शंतनु " एक मिनिट .. माईंड युअर लँग्वेज .. माझ्या मित्रा विषयी बोलतेय तू याचे भान राख "
नव्या " मला बोलायचंय त्याच्याशी तू बोलवून घे त्याला "
शंतनू " तुला बोलायचंय ना .. मग तू बोलावं ना "
नव्या " तो म्हटलं तुला जे काही बोलायचंय ते शंतनू समोर बोल "
शंतनू " हे बघ , माझ्याकडून तुला काही प्रॉब्लेम नाहीये .. तुझे त्याच्यावर प्रेम आहे तर तू त्याच्याशी लग्न कर "
नव्या " तो मला म्हणतो मी तुझी होणारी बायको आहे इतर काही त्याला कळत नाही आणि दिसत नाही "
शंतनू " मी काय करू मग ? तो तुझा प्रश्न आहे ?"
नव्या " तुम्ही दोघे समजता काय रे मला ? खेळणं ? जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही माझ्या मागे लागणार .. मला बायको मानणार .. मग वाहिनी मानणार .. मी काय इमोशन लेस पुतळा आहे का ?"
शंतनू " हे बघ , माझ्या पेक्षा तो जास्त चांगला आहे तू त्याच्याशीच लग्न कर "
नव्या " तो हि तेच म्हणतोय पण ?"
शंतनू " तुझा काय प्रॉब्लेम काय आहे ? तुला जर तो आवडतो तर घरी कशाला सांगितलेस कि मी लग्नाला तयार आहे ? मूर्ख ?"
नव्या " मी आहेच लग्नाला तयार पण आता त्याला कसे आणायचे तिकडे हे तू ठरव "
शंतनू " म्हणजे ?
नव्या " म्हणजे मला तुझी मदत हवीय ?"
शंतनू " काय ?"
नव्या " आपण दोघे लग्न करतोय असे त्याला दाखवू ? मग त्याची अक्कल ठिकाणावर येईल आणि मग एक पॉईंटला तुझ्या जागी त्याला उभे करू "
शंतनू " वाह !! काय प्लॅन आहे ? साला माझ्या इमोशनचा चक्का चूर केलाय तू "
नव्या " हे बघ शंतनू , मंथन माझ्या मनात गेल्या वर्षांपासून आहे .. मी आधी SD कॉलेज ला होते .. गेल्या वर्षी मंथन मॅचेस खेळायला आमच्या कॉलेजला आला होता .. त्याला खेळताना बघूनच मी माझे भान हरपले होते .. पण तो माझ्याकडे काय कोणत्याच मुलीकडे वळून सुद्धा बघत नसे .. माझ्याकडे वळून न बघणे म्हणजे मला माझा अपमान झाला असे वाटले .. मी त्याला पटवायचे ठरवले .. मग त्याला किती तरी दिवस फॉलो करत होते .. पण फॉलो करता करता कधी मी त्याची झाले माझे मलाच कळले नाही .. मग केवळ त्याला मिळवण्यासाठी मी फुटबॉल च प्रशिक्षण घेतले .. खुप मेहनत घेतली .. मग या वर्षी या कॉलेज मध्ये न्यू ऍडमिशन केले .. आणि जेव्हा मॅचेस मध्ये दणादण गोल मारले तेव्हा कुठे त्याची नजर माझ्यावर आली .. पहिल्या दिवशी उगाचच मी त्याला इग्नोर केले .. पण खरतरं हे असे व्हावे हेच माझी ईच्छा होती .. सगळे प्लॅन नुसार होत होते तर नेमके तू मला सकाळी गावात पाहिलेस त्या पांढऱ्या कोकरा ला उचलून ठेवताना आणि तुझा वेगळाच सिन सुरु झाला .. आणि तुझ्या मामानी लगेच लग्नाची मागणी घालून आणखी घोळ केलाय .. आता जर मी लग्नाला नाही उभी राहिले तर आजोबा चिडतायत .. आणि राहिले तर मला माझा मंथन नाही मिळत आहे .. बोल आता काय करू " आणि डोळ्यांवर हात ठेवून ती रडायला लागली
शंतनूने काळजीने तिच्या खांद्यावर हात ठेवला ( फ्रेंडली ) " ह्या देवाचा .. मला सर्वात जास्त राग येतोय आता .. आम्ही दोघे इतके क्लोज मित्र आहोत हे माहिती असताना सुद्धा देवाने एकाच मुलीच्या प्रेमात पाडले ? का असे करतोय हा ? कोणता खेळ खेळतोय हा देव " तोही जरा इमोशनल झाला होता.
तेवढ्यात नेमका मंथन शंतनूला भेटायला आला होता आणि त्याने मागूनच हे पाहिले कि शंतनूने तीच्या खांद्यावर हात ठेवला आहे.. आणि ती पण त्याच्या खांद्यावर डोके ठेवून बसली आहे .. हे पाहून एक मिनिट छातीत धस्स झाले त्याला एक वेगळीच कळ उठली .. घसा सुकला त्याचा .. आणि तो वळून जातच होता तर त्याचा पाय दगडावरून घसरला तसे ह्या दोघांनी त्याला वळून पहिले
दोघेहि एकदम " मंथन " हाक मारली
मंथन " सॉरी , मी बहुदा डिस्टरब केले "
शंतनू " बस काय भावा , अरे ये ना .. तुला माझ्या नव्या मैत्रिणीशी भेटवतो "
मंथन " अरे काय बोलतोय "
शंतनू " अरे म्हणजे हि \"नव्या " पण माझी नवी मैत्रीण आहे .
तसे तिघेही हसले
मंथन " चल आपण ना आपल्या नव्या मैत्रिणीला आपल्या अड्ड्यावर फिरायला नेऊ "
मंथनला शंतनू तिथे असताना नव्या बरोबर बोलायला काहीच ऑब्जेक्शन नव्हत " ठीक आहे , चला "
शंतनू " पहिले जाऊ अण्णाच्या वडापावच्या गाडीवर .. मग तुलसीदास चहा .. मग टेकडी आणि मग रात्री. "
नव्या " मला आठ वाजता हॉस्टेलला पोहचावे लागते "
शंतनू " अरे डोन्ट वरी .. तुमको राईट टाइम पे पाहुचायेंगे "
मंथन " तू मराठीत बोल रे .. तुझी हिंदी खूप वर्स्ट आहे "
शंतनू " वही च ना अपुनको हिंदी आयला नहीं "
तसे तिघे हसले.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा