हृदयी प्रीत जागते भाग ९
क्रमश : भाग ८
मंथनने फोन ठेवला आणि तिथेच गाडीत स्टेअरिंग वर डोकं ठेवून थोडा वेळ पडून राहिला ..
एक मन त्याला सांगे कि आता नव्या इकडे आहे .. आत्ताच्या आता हिला घेऊन कुठेतरी गायब होतो .. तिचेही माझ्यावर प्रेम आहे ती पण कदाचित यायला तयार होईल .. पण लगेच दुसरे मन जोरात त्याला फटकारत होते .. मित्र आहे शंतनू माझा .. आणि मी त्याचा विश्वासघात करू .. तेही मुली साठी .. या आधी मीच त्याला म्हणायचो मैत्रीत मुलगी आली नाही पाहिजे आणि हे काय ? हा विचार मनात कसा येऊ शकतो ?
बसल्या बसल्या घाम आला त्याला .. त्याने तिथूनच नव्याच्या मोबाईल वर कॉल केला.
मंथन " हाय, बोलू शकतो का आता ?
नव्या " हा बोल .. अजून गेला नाहीस घरी .. कार दिसतेय म्हणून विचारलं ?"
मंथन " मला शंतनूचा कॉल आला होता आता.. त्याला कळलंय आपण आज दिवसभर पार्टी केलीय ते .. काहीच बोलला नाही बिचारा .. नव्या आपण चूक केली का ग ? त्याचा माझ्यावर किती विश्वास आहे आणि मी त्याच्या होणाऱ्या बायकोला दिवसभर फिरवले .. आणि .. मिठीत पण घेतले .. मला लाज वाटतेय माझी "
नव्या " नको आता जास्त विचार करुस .. होऊन गेलंय आता ते .. खरंतर मीच त्याला सांगितले .. कि आज दिवसभर मी तुझ्या बरोबर होते ते .. वरती आले बघते तर त्याचे ३ मिस्ड कॉल होते .. म्हणून लगेच कॉल केला आणि सांगून टाकले .. मनावरचं ओझं उतरल माझ्या .. "
मंथन " बरं झाले बोललीस ते .. बरं ऐक त्याने मला तुला घेऊन गावी बोलावलंय .. आणि जायच्या आधी तुझ्यासाठी शॉपिंग करायला सांगितलय .. "
नव्या " हो बोलला मला तो .. पण तू नको येउ बरोबर .. मी करेन मॅनेज "
मंथन " नव्या .. एक विचारू .. ?"
नव्या " हा बोल "
मंथन " तुला शालू घेऊन द्यायला सांगितलाय त्याने मला .. इतका विश्वास आहे त्याचा माझ्यावर .. प्लिज येशील माझ्या बरोबर .. आणि नसेल यायचं तर मी जो आणून देईन तो शालू चालेल तुला ?
नव्या " ठीक आहे .. भेटू उद्या .. पण आता मी शंतनूची होणारी बायको आहे हे दोघांनी विसरायचं नाही "
मंथन " नक्कीच .. ऑल द बेस्ट तुम्हां दोघांना "
नव्या " थँक यु .. बाय "
दोघांनी मनातून ठरवून टाकले .. सगळ्या भावना दाबून टाकायच्या आणि जे पुढे आहे ते स्वीकारायचं
-------------------------------------
शंतनूच्या आई बाबांची पण खूप गडबड चालू झाली .. मुलगा लहान आहे म्हणता म्हणता सून आणायची वेळ आली .. खरेदी सुरु झाली .. साड्या , दागिने , नवीन बेड दोन्हीकडे .. नवरीला दोन्ही घरात नांदवायची होती .. मामी पण अख्या गावात आमंत्रण देत होती .. दारी मंडप बांधू लागले , वाजंत्री, घोडा , सगळे पटपट बुक झाले .. आचाऱ्याला निमंत्रण धाडले .. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला मामा कपडे देणार होता .. त्याची शॉपिंग "
नव्याच्या घरी पण दारी मंडप .. जावयाचे पाय कोण धुणार , रुखवत , साड्या , मेहंदिवाली , बांगड्या वाली सर्वांना बुक केले . नव्या आली कि तिला लगेच मेहंदीला बसवायची , लगेच बांगड्या , मग हळद वाटायची .. असे प्लॅनिंग जोरदार सुरु होते .. आजी आणि आजोबा जरा वयस्कर होते पण हाताशी माणसे लावून सगळी तयारी करून घेत होते .. नव्याला ना आई होती ना बाबा .. आजोबांनी सांभाळ केला होता ..
शंतनू आधीच लाडका त्यात आता लग्न म्हणजे काय बघायलाच नको .. त्याच्या तोंडातून पडलेला प्रत्येक शब्द झेलत होते .. मामाने शंतनूची शॉपिंगची जवाबदारी घेतली होती त्यामुळे कशातच काहीच कमी राहणारच नव्हते .
-------------------
दुसऱ्या दिवशी मंथन नव्याला घेऊन शॉपिंगला गेला .. खूप साऱ्या दुकानात फिरून नव्याने एकदम खास जांभळ्या रंगांचा त्यावर सिल्व्हर बुट्टे असा शालू सिलेक्ट केला .. तिथल्या दुकानदाराने तिला टेम्पररी नेसवला आणि आरशात बघायला सांगितले .. मंथन तिला त्या शालूत बघतच बसला .. इतकी सुंदर आणि तेजस्वी दिसत होती ती .. गोऱ्या रंगावर जांभळा रंग एकदम खुलून दिसत होता ..
नव्या " मंथन , हा शालू कसा वाटतोय ? का तो रेड घेऊ ?"
मंथन " हाच घे यात तू खूप सुंदर दिसतेय " पटकन बोलला पण तिला ऑकवर्ड वाटू नये म्हणून नजर चोरत उगाच मोबाईल वर " हॅलो .. हॅलो " करत माहेर गेला
नव्याला हसायलाच आले त्याचे नाटक बघून
शालू तर झालाच इतर बाकीची तिला जे जे पाहिजे होते ते तिने खरेदी केले ..
मंथन " अजून काही घ्यायचंय का ?"
नव्या " मंथन , मला ना शंतनू साठी एक गिफ्ट घ्यायचं होते ? नक्की काय घेऊ कळत नाहीये ? कॅन यु प्लिज हेल्प मी इन धिस "
मंथन " उम्म्म .. ब्रेसलेट कसे वाटेल ?"
नव्या " ग्रेट आयडिया .. आपण गोल्डचे ब्रेसलेट घेऊ त्याला "
मंथनने गोल्ड शॉप मध्ये गाडी वळवली .. मग नव्याने शंतनू साठी एक मस्त ब्रेसलेट घेतले ..
नव्या " मंथन , आय एम हंग्री नाऊ ? काहीतरी खाऊया का ?"
मंथन " जो हुकूम मॅडम . बोलो आप क्या खाना पसंद करोगी ?"
नव्या " जो आप खिलाओगे ?"
मंथन " आपण ना आज मस्त थाय रेस्टोरंटला जाऊ "
नव्या " नको .. त्या पेक्षा महाराष्ट्रीयन फूड खाऊ "
मंथन " मग .. थाळी आवडते का तुला ?"
नव्या " उम्म .. नको रे त्या पेक्षा पावभाजी खाऊ "
मंथन " किती ते नखरे करतेस ग खाण्यासाठी ? आताच्या आता तीन चॉईस बदलल्या तुझ्या ? कसं काय शंतनू करणार आहे काय माहित? त्याला तर पिठलं भाकरीच हवी असते .. रोज दिलीस तरी खाईल "
नव्या " पिठलं .. याक .. आय जस्ट डोन्ट लाईक इट "
मंथन " अग ए .. अन्नाला नावं ठेवू नये "
नव्या " सॉरी .. "
मंथन " अरे सॉरी काय ? मी पण असेच बोललो .. इतके काही सिरिअस नाही "
नव्या " मंथन , शंतनू आणि मी चांगले कपल होऊ ना .. त्याला स्पोर्ट्स आवडत नाही .. मला आवडते . मला पिठलं आवडत नाही .. त्याला आवडते .. त्याला लांब केस आवडतात मला शॉर्ट "
मंथन एकदम शांत झाला होता .. त्याची आणि तिची दोघांची चॉईस बऱ्यापैकी सेम आहे हे त्याला कळलेच होते एव्हाना .. पण आता उत्तर काय द्यायचं ?"
नव्या " टाळतोस ना उत्तर ?"
मंथन " शंतनू कधीच त्याची आवड थोपवत नाही समोरच्यावर "
नव्या " हमम .. हि इज गुड गाय .. आय नो .. म्हणूनच होकार दिलाय मी "
मंथन " दोन दिवस आधी घरी जायचंय तुला .. परवा सकाळी तयार रहा "
नव्या " तू लग्न होई पर्यंत थांबणार आहेस ?
मंथन " येस अफकोर्स .. मेरे यार कि शादी है भाई .. अग त्याला काही लागले तर आणायला मी असलेला चांगल आहे ना .. म्हणून थांबणार आहे "
बोल बोलता दोघे रेस्टोरंटला आले आणि शेवटी इडली सांबर खाऊ लागले .. चॉईस वेगळीच झाली शेवटी
----------------------------------------------------
दोन दिवसानानंतर मंथन ठरलेल्या वेळात नव्याला घ्यायला हॉस्टेल वर आला ..
तिच्या मैत्रिणी एकेक करून बॅग्स खाली आणून देत होत्या आणि हा एकेक बॅग डिकीत भरत होता .. अख्खी डिकी भरली तरी अजून बॅग्स येतच होत्या .. मागची सीट पण फोल्ड करून त्याने सगळ्या बॅग्स कार मध्ये बसवल्या ..
थोडया वेळाने नव्या खाली आली .. बहुदा इकडेच पार्लर उरकले होते तिने त्यामुळे फेसवर एक प्रकारचा ग्लो आला होता .. केस स्ट्रेट करून आली होती आणि मोकळे सोडले होते .. गावी जायचे म्हणून हातात , गळ्यात , डायमंड बारीक नेकलेस आणि कानातले घातले होते .. नेहमी तिला टॉम बॉय सारखी बघायची सवय झाली होती पण आज ती हेड टू टो मुलगी झाली होती .. पायात नाजूक चप्पल .. हातच्या पायाच्या बोटांना नेलपेंट .. ओठांवर पिंकीश लिपस्टिक .. डोळ्यांत काजळ .. इतकी सुंदरता बघून इकडे हृदय धडधडायला लागले होते .. बेबी पिंक चुणीदार .. आणि दुपट्टा जो हवेत उडत होता .. दोन्ही हातांवर मेहेंदी काढली होती मॅडम ने म्हणून उशीर झाला यायला तिला ..
मेहंदीचे हात पाण्यात बुडवायचे नव्हते .. पण मेहंदी सुकून पडली होती त्यामुळे रंग चढायला लागला होता .. इतकी सुंदर दिसत होते दोन्ही हात .. एखाद्याला असे वाटेल हात हातात घेऊन त्यावर ओठ ठेवावे आणि त्या मेहंदीचा सुगंध घ्यावा ..
आता हे असले विचार मनात आणून मनातच दाबत होता बिचारा मंथन.
मंथन ने तिला दार उघडून आत बसवले
नव्या "थँक यु " आणि कुठेही हात टच होणार नाही याची खबरदारी घेत गाडीत बसली "
मंथन " निघायचं ?"
नव्या " हो ..आणि एक आज मला जरा लागली तर मदत कर काय ? माझे हात मेहंदीचे आहेत "
मंथन " ओके मॅडम "
नव्या " मॅडम मॅडम काय लावलंय ?"
मंथन " असेच ग .. "
मग काय घरी जाताना तिला खायला घालणे , पाणी पाजणे , तिचे तोंडावर आलेले केस मागे करणे .. त्याला एका क्लिप मध्ये बांधणे हि असली कामं बिचारा मंथन करत होता ..
दोन तासांच्या प्रवासा नंतर गाव आले ..
नव्या " मला आधी माझ्या घरी सोड .. मग तू शंतनू कडे जा .. गाडीत माझे सामान भरपूर आहे ना म्हणून "
मंथन " ठीक आहे .. "
मग तिला गावात तिच्या घरी सोडले .. आजोबांना पाया पडला .. तिच्या घरी चहा प्यायला आणि मग शंतनूच्या घरी निघाला
नव्या " थँक्स फॉर एव्हरी थिंग .. तुझी खूप मदत झाली आज .. "
मंथन " आता कधी भेटशील ?"
नव्या " आता डायरेक्ट लग्नात .. बहुदा आता ग्रहमख आहे मग घरातून नवरीने बाहेर पडायचे नसते "
मंथन " ओके .. काँग्रेचुलेशन .. स्टे हैपी .. कधीपण काहीपण मदत लागली तर तुला एक मंथन नावाचा मित्र आहे हे विसरू नकोस ?"
नव्या " हे तू पण लक्षांत ठेव .. मी शंतनूची बायको झाले तरी आपली मैत्री आपण कायम ठेवू .. तसेही आता गेल्या आठवड्यात खेळले ती माझी शेवटची मॅच होती .. आता शक्य नाही होणार .. शंतनूच्या आई बाबांना नाही आवडणार सुनेनं खेळलेलं .. त्या बोलल्यात मला तसे "
मंथन " तू खूप चांगली आहेस .. किती सहज काही गोष्टी स्वीकारल्यास .. "
नव्या " असो बाय .. हे गाव आहे असे तुझ्याशी बोलत बसले तर लोकं नावं ठेवतील .. थँक्स वन्स अगेन "
मंथन " बाय .. टेक केअर "
नव्या " बाय .. आणि एक माझ्या सासरच्या लोकांसमोर माझ्याशी बोलायला पुढे येऊ नकोस "
मंथन काहीच बोलला नाही .. पण एक नजर तिच्यावर रोखून पाहिलं आणि गाडीत जाऊन बसला
मन तर मन पण डोळेही भरून आले होते त्याचे .. गाडीतल्या बॉटल मधले पाणी प्यायले आणि त्या बरोबर भरून आलेले अश्रू पण प्यायले आणि शंतनूच्या घरी निघाला ..
-------------------------------------------------------
मंथन शंतनूच्या घरी आला तर बघूनच हडबडला .. शंतनूचा एक हात फ्रॅक्चर झाला होता आणि गळ्यात बांधला होता
मंथन " काय रे हे .. हाताला काय झाले ?"
शंतनू " अरे माझा हात फ्रॅक्चर झाला .. त्या दिवशी आलो ना त्या दिवशी पुन्हा पडलो .. हेअर फ्रॅक्चर आहे फार काही नाही "
मंथन " काय तू आता लग्नाला असा उभा राहणार आहेस का ?"
शंतनू " त्यात काय झाले ? एक हात आणि बाकी सगळे पार्टस व्यवस्थित आहेत माझे ?"
मंथन " डोके सोडले तर " आणि हसायला लागला
शंतनू" " हे बरोबर बोललास तू ? डोकं गेलंय कामातून ?"
मंथन " मग मंगळसूत्र कसे घालणार ?"
शंतनू " तेवढ्या पुरता हात बाहेर काढेन ... तसेही जास्त मोठे फ्रॅक्चर नाहीये .. होईल लवकर बरं "
मंथन " लग्नाची जोरदार तयारी चालू आहे .. मंडप , स्टेज , खुर्च्या , रथ सगळे बाहेर येऊन रेडी झालंय "
शंतनू " हा ना .. मामा म्हणजे काय विचारू नकोस .. जंगी तयारी केलीय .. बरं ते सोड .. माझ्या बायकोला आणलेस का ? नाहीतर तीच नाही यायची ?" आणि हसायला लागला
मंथन " बस काय ? आताच तिला घरी सोडून आलो .. आणि नाही आली तर जगात कुठे पण जाऊदे आपण उचलून आणू तिला "
शंतनू " म्हणूनच हे काम मी तुला दिले होते "
पुढे दोन दिवस लग्नाची जोरदार तयारी चालू होती .. मंथन घरातल्या मेंबर सारखी सगळी कामं करत होता .. ह्या दोन दिवसांत नव्याचा काही कोणाशी कॉन्टॅक्ट झाला नाही .. तिच्या घरी पण लग्नाची जोरदार तयारी चालू होती इतके नक्की .. मंथनला राहवले नाही म्हणून मुद्दामून वाट चुकला असे दाखवत नव्याच्या घराकडे जाऊन एक दोनदा आला .. तरी पण मॅडमचे दर्शन काही त्याला झाले नाही ..

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा