Login

हृदयी प्रीत जागते भाग ५

Story Of Two Friends And Their Love
हृदयी प्रीत जागते भाग ५
क्रमश : भाग ४
नव्या " मी कोणी वस्तू नाहीये .. शंतनू "
शंतनू " आय नो, म्हणूनच असे भांडणं करून काही उपयोग नाही .. आपण असे करू .. तू एक महिना माझ्या बरोबर थांब .. तुला एक जरी कारण असे सापडले कि ज्यामुळे तू मला रिजेक्ट करू शकशील तर मी तुझे रिजेक्शन एक्सेप्ट करेन .. मला न जाणून घेता,बाहेरून बघूनच तू मला रिजेक्ट करू शकत नाहीस .. "
नव्या " पण मी हे का करू ? मला नाही करायचंय हे सगळे ?"
शंतनू " कारण माझे तुझ्यावर प्रेम आहे हे सिद्ध करायला मला वेळ मिळेल तेवढा ..कदाचित तुझा नकार होकारात बदलेल. "
तेवढयात नव्याच्या घरून तिला कॉल आला..आणि तिला सांगितले कि येत्या रविवारी टिळा ठरवतायत तर शनिवारी गावी यायला सांगितलंय.
नव्याची नुसती चीड चीड होत होती.
नव्याने थोडा विचार केला ..
नव्या " ठीक आहे.. एक महिना तुला दिला मी.. पण या एक महिन्यात घरातल्यांनी टिळा वगैरे असले प्रकार केले नाही पाहिजेत ..आपले जर लग्न झाले तर आपण दोघे जेव्हा तयार असू तेव्हाच होईल.. कोणाच्या एकाच्या प्रेमा मुळे नाही झाले पाहिजे"
शंतनू "डन .. सो आता आपण एक महिना मॅक्सिमम वेळ एकत्र घालवायचा..आणि असा जबरदस्तीने किंवा ऑकवर्ड होऊन एकत्र राहण्या पेक्षा " लेट्स बी फ्रेंड्स .. मी माणूस म्हणून चांगला आहे .. तुला त्रास नक्कीच देणार नाही "
नव्या " सॉरी .. मी जरा जास्तच रुड वागले ना .. अरे ते अरेंज मॅरेज म्हटले कि माझे डोकं दुखत .. सॉरी "
शंतनू " फ्रेंड्स " म्हणत त्याने हात पुढे केला.
तिने पण त्याच्या हातात हात दिला " फ्रेंड्स "
नव्या "एक मदत पाहिजे होती "
शंतनू " बोल "
नव्या "आपण दोघे आता फ्रेंड्स आहोत तर हेच आपण सगळ्यांना सांगू .. आपल्या घरातून आपल्या लग्ना बद्दल चर्चा चालू आहे हे कोणाला नको सांगुस .. उगाच बाकीचे लोक चिडवा चिडवी करतात .. मला नाही आवडत ते "
शंतनू " फ्रॉम माय साईड .. मी कोणाला नाही सांगणार .. तसा माझा एक जिवलग मित्र आहे .. त्याच्या पासून मी काहीच लपवून ठेवत नाही ..अगदीच वेळ आली तर मी त्याला सांगू पण शकतो .. बाकी कोण नाही "
नव्या " ठीक आहे .. पण त्याला पण सांग कि अजून काही ठरले नाही .. म्हणजे जे सत्य आहे ते सांग "
शंतनू " मी तुझ्या प्रेमात आहे हे त्याला माहितेय .. फक्त ती व्यक्ती तू आहेस हे त्याला माहित नाहीये "
नव्या " ओके .. मग आता सांग घरी ... कि लगेच टिळा वगैरे नको म्हणून .. ते लोक रविवारीच करायच्या विचारात आहेत "
शंतनू " आता जर मी काहीच सांगितले नाही तर रविवारिच तू माझी होशील .. इतके सगळे माझ्या बाजूने आहे .. तरीपण तुला एक महिना देतोय .. तू माझ्याशी प्रामाणिक रहावीस अशी अपेक्षा .. जर मला वाटले, कळले कि तू मला फसवतेय .. तर आहेस तिथून उचलून गावी घेऊन जाईन आणि लग्न करेन तुझ्याशी."
नव्या जरा घाबरलीच .. त्याच्या डोळ्यांत पाहून तो बोलतोय ते तो करू शकतो हे तिला दिसले होते ..
तेवढ्यात कॉफी आली.
शंतनु " घे कॉफी "
नव्या " थँक यु "
शंतनू " बाय द वे .. ते काल घातलेल्या ड्रेस त्यामध्ये तू खूपच छान दिसत होतीस .. "
नव्या " थँक यु "
शंतनू " आणि ते ऊस .. डायरेक्ट तोंडाने खातेस .. कसले भारी .. मी कधी नाही केले "
नव्या " अरे ते माझे आजोबा आहेत ना जरा स्ट्रीट आहेत .. गावी गेल्यावर तसलेच कपडे घालावे लागतात .. मी तर खोटी वेणी पण लावते .. असे लहान केस त्यांना नाही आवडत " आणि खळखळून हसली
शंतनू " म्हणजे ती लांब वेणी .. खोटी होती का ?"
नव्या " हो .. "
शंतनू " वाटत नव्हते खोटे केस आहेत म्हणून "
नव्या " तू इतके कधी पाहिलेस?"
शंतनू " काल”
तेवढयात तिकडे मंथन आला .. कॉफी घ्यायला
शंतनू ने त्याला आवाज दिला
मंथन " अरे तू तर .. त्या तिला भेटायला जाणार होतास ना ?"
शंतनू " अरे तिने मला डिच केले .. तीचा फोन आला आज नाही जमत आहे .. नंतर कधीतरी .. हि बघ .. हि नव्या .. माझी मैत्रीण "
नव्या " हॅलो मंथन "
मंथन " हॅलो ? तुम्ही दोघे ओळखता एकमेकांना ?"
शंतनू " अरे हि .. माझी स्कुल फ्रेंड आहे .. अशीच इथे बसलेली दिसली तर बसलो कॉफी घ्यायला ."
विनाकारण शंतनू आज मंथन जवळ खोटे बोलला तेही नव्याच्या सांगण्यावरुन
मंथन "ओके .. भारीच "
शंतनू " तू हिला कशी ओळखतोस ?"
नव्या " गाईज !! ऐका ना .. मला एक काम आहे .. मी निघू का ? प्लिज. "
शंतनू " ओके .. बाय .. सी यु .. "
मंथन काही सांगेल त्याच्या आधीच ती बोलून निघून गेली.
मंथनला ती जाऊ नये असेच त्याला वाटतं होते.. तो एकटक तिच्या कडे बघत होता तर ती तिकडून निघून गेली
शंतनू " अरे काय ? कसला विचार करतोय ? भेटली का तुझी वाली ?"
मंथन " भेटली तर होती पण आता गेली बहुदा "
शंतनू " अरे आज मुलींची मॅच आहे .. मगाशी मी बोर्ड पाहिला.. आपण दोघे इकडून तिकडेच जाऊ .. कदाचित ती तुला ग्राउंड वर मॅच खेळतानाच दिसेल "
मंथन " ती भेटलच.. तू फोटो दाखव ना वहिनीचा ?"
शंतनू " अरे .. वहिनी अजून बहुदा तयार नाहीये .. त्यामुळे जरा हे प्रकरण होल्ड वर ठेवावे लागेल .. म्हणजे माझे प्रयत्न चालू आहेत .. तिला पेटवण्याचे " आणि हसला .
मंथन " अरे भाई !! डोन्ट टेक टेन्शन .. तू एवढा स्वीट आहे हे जेव्हा तिला कळेल ना ती धावतच येईल तुझ्याजवळ ."
शंतनू " चल , जाऊया "
दोघे बिल पे करून पुन्हा कॉलेजला आले
का कुणास ठाऊक मंथन त्याला आता लगेच हे सांगू शकला नाही कि हीच ती मुलगी जिचा जर्सी नंबर २ आहे. आणि शंतनू स्वतःच्याच टेन्शन मध्ये असल्यामुळे त्यानेही काही जास्त विचारले नाही.
-------------------------------------
मुलींची मॅच होती आणि मंथनला ती मॅच नव्या साठी बघायला पण जायचे होते ..पण आज त्याच्या बरोबर शंतनू असणार होता .. तो आहे म्हणजे तो पण मॅच बघायला येईल .. आणि त्याने तिला पाहू नये असे मंथनला वाटू लागले .. का ? कारण कळेना ?
दुपार नंतर शंतनू मंथनच्या खूप मागे लागला कि चल मॅच बघायला जाऊ .. म्हणजे आपल्याला जर्सी नंबर दोन चे दर्शन होईल .. पण नाहीच मंथन काही मॅच बघायला जायला तयार होई ना .. आणि काहीतरी कारण काढून चक्क तो दुपारीच घरी गेला .. असे पहिल्यांदाच झाले होते कि शंतनूला न सांगता तो निघून गेला होता ..

शंतनूला मनातून जरासे वाईट वाटले .. पण आज त्याला जर्सी नंबर दोन कोण आहे ते बघायचंच होतं म्ह्णून शंतनू एकटाच मुलींची मॅच बघायला गेला .. आणि थोड्याच वेळात त्याला कळून चुकले कि जर्सी नंबर २ म्हणजेच नव्या आहे .. शंतनूला खूप वाईट वाटले .. एकदम मूडच गेला त्याचा .. साला इतक्या वर्षांत पहिल्यांदाच कोणीतरी पसंत पडले होते तर नेमकी तीच मंथनला पण आवडली ..
शंतनू रागानेच तिथून उठला आणि मंथन आणि शंतनू चा एक गप्पा मारायचा टेकडी वरचा स्पॉट होता तिथे एकटाच जाऊन बसला .. काय करावं ? मंथनला माहित नाहीये कि त्याला आवडलेली मुलगी म्हणजेच नव्या आहे .. पण मला माहितेय कि माझी आणि त्याची आवडलेली मुलगी हि एकच आहे .. मी मामाला सांगून लगेच पुढच्याच आठवड्यात चट मंगनी पट ब्याह करून घेतो .. म्हणजे मला काही माहित नव्हते असे सांगता येईल .. लगेच दुसरे मन .. असे करणे योग्य नाही .. नव्या आत्त्ता आलीय .. मंथन माझा जिगरी दोस्त आहे .. त्याला फसवणं योग्य नाही .. पण आता करायचं काय ? मी तिला वहिनी म्हणून सहन नाही करू शकणार आणि ती माझी झाली तर मंथनला हे सहन नाही होणार .. हातात बिअरचा कॅन घेऊन शंतनू घटाघट कॅन संपवत होता .
मोबाईल वर सतत मंथनचा कॉल येत होता .. पण शंतनू आज कोणाचाच कॉल उचलायच्या कंडिशन मध्ये नव्हता .. डोळ्यांतून आपोआप पाणी येत होते ..
एकटाच टेकडीवर जोरात तो हाक मारू लागला " नव्या ... मंथन ... नव्या शंतनू .. कोणती जोडी चांगली वाटतेय ? असा विचार करत होता ..
अशा विचारात बिअरची कॅन वर कॅन संपवत होता तो .. त्यामुळे आता पाय लटलट कापू लागले होते आणि नशा खूप चढली होती .. एकटाच त्या टेकडीवर किती वेळ होता काय माहित ?
-------------------
दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा तो मंथनच्या घरी बेडवर होता .. मंथन सकाळीच उठून फुटबॉल प्रॅक्टिसला गेला होता ..
शंतनू उठला तर मंथनच्या नोकराने त्याला चहा नाश्ता दिला .. शंतनूने तो खाल्ला आणि त्याच्या घरी जायला निघाला ..
तेवढ्यात मंथन आला
मंथन " थांब , मी फ्रेश होतो .. दोघे एकदमच जाऊ कॉलेजला "
शंतनू " नको .. तू ये मागून .. मी जरा घरी जाऊन येतो .. दोन दिवसात घरी नाही गेलो कि आई चिडते .. "
मंथन " ठीक आहे .. मग कॉलेजला भेटू "
शंतनू " थँक्स काल साठी "
मंथनने जाऊन त्याला घट्ट मिठी मारली .. " मला वहिनी आवडलीय .. मी काल फोटो पाहिलाय मोबाईल मध्ये "
शंतनू कसनुसा हसला " मला पण जर्सी नंबर २ वहिनी म्हणून आवडलीय "
मंथन " गप रे .. "
शंतनू " मी आजच मामाकडे जातो आणि लग्न कॅन्सल करून येतो .. तुझी आणि तिची जोडी खूप छान दिसेल "

मंथन " तुझी आणि तिची पण जोडी खूप छान दिसेल "
शंतनू काहीच बोलला नाही आणि गाडीला किक मारून घरी गेला.
---------
इकडे नव्या जरा रिलॅक्स झाली होती कारण रविवारचा टिळा सध्या साठी कॅन्सल झाला होता .. आता तिला एक महत्वाचे काम करायचे होते आणि ते हि लवकरात लवकर ..मॅच जिंकून आल्यावर सगळ्या पोरी पुन्हा पार्टी करायच्या मूड मध्ये होत्या पण आज नव्या काहीतरी खोल विचारात होती .. बराच वेळ शांत चित्ताने तिने विचार केला आणि मनातल्या मनात काहीतरी ठरवलं .. मोबाईल हातात घेतला आणि कोणाला तरी कॉल केला .
0

🎭 Series Post

View all