Login

ह्रदयी प्रीत जागते भाग ७

Story Of Two Friends And Their Love


हृदयी प्रीत जगते भाग ७

क्रमश : भाग ६

मग काय ह्या तिघांची अशी गट्टी जमली .. नव्या पण तशी फ्रीच होती आणि त्यात मंथन तिच्या आजू बाजूला आहे याचा तिला किती आनंद होत होता काय सांगू ..
तिघे मंथनच्या बाईक वरून फिरत होते .. आधी वडापाव खायला घेऊन गेले तिला .. आणि तिने पण मस्त मिरची घेऊन वडापाव खाल्ला .. तिखट तिखट चटणी ठसका लागे पर्यंत खाल्ली .. आणि तिच्या सेवेला पाणी घेऊन हे दोघे दोघे हजर होते .. तिला खूप मज्जा वाटू लागली .. तिला नुसता ठसका लागला तर ह्या दोघांचा जीव वर खाली होत होता .. आपले असे इतके लाड होतायत कोणाला नाही आवडणार?. एखाद्या प्रिसेंस सारखे दोघे तिची काळजी घेत होते .. तिने पाठीला तिची काळी सॅक लावली होती आणि एका पॉंईटला तिघे एकमेकां सोबत इतके कंफेरटेबल झाले कि ती दोघांच्या मध्ये उभी राहून दोघांच्या खांद्यावर हात टाकून उभी राहिली .. (कव्हरपेज सारखी)
तिघांच्या मनात आता या क्षणाला हि नक्की कोणाची होणार ? असा काहीच विचार नव्हता .. तिघे एकमेकांची कंपनी एन्जॉय करत होते.
मंथन आणि शंतनू काहीतरी जोक मारायचे आणि ती फिदी फिदी हसायची .. तिच्या आयुष्यातला सर्वात चांगला दिवस ती आज जगत होती.. रात्री तिला धाब्यावर जेवायला नेले .. तिघे एक बाजेवर एकत्र मांडी घालून बसले आणि मस्त गप्पा मारत , ताकाच्या ग्लासनी चिअर्स करत जेवले . मग तिला वेळेत हॉस्टेलला आणले ..
जाताना चक्क तिने दोघांना मोठी मारली
नव्या " यार !! लिटरली गाल दुखले माझे .. खूप हसवलेत तुम्ही मला .. आजचा दिवस माझ्या आयुष्यातील एकदम भारी दिवस होता .. आपले रिलेशन काहीपण बदलू दे पण आपली मैत्री अशीच राहिली पाहिजे "
मंथन आणि शंतनू " थ्री चिअर्स फॉर अवर फ्रेंडशिप "
मंथन " सिरिअसली, यु आर फॅन लविंग गर्ल .. आमच्या दोघांत कधीच तिसरा कधी आला नाही पण तुझी कंपनी आम्ही खूप एन्जॉय केली."
शंतनू " मग .. गाव वाली कोणाची आहे? आम्ही दोघे एकाच गावचे आहोत "उगाच कॉलर टाईट करून बोलला.
मंथन " झाले याच गावाचे रामायण सुरु .. "
नव्या " मंथन , तू कधी आलाय का गावाला ? अरे इतक मस्त गाव आहे ना .. माझ्या आजोबांचा मोठा वाडा आहे "
शंतनू " माझ्या घरी आलाय तो एक दोनदा "
नव्या " आता आलास ना कि माझ्या घरी ये "
शंतनू " बस काय ? फक्त एकट्याला बोलावते ?"
नव्या " अरे तू तर आता सारखाच येशील कि ? जावई बापू ?" आणि डोळे मिचकावत हसली
शंतनू " चला .. बाय गुड नाईट .. मी जातोय उद्या गावाला .. तुला काही निरोप द्यायचाय का ?"
नव्या " नाही .. माझी मॅच आहे .. उद्या ?"
मंथन " कुणीकडे ? ते शिवाजी पार्कच्या शेजारच्या ग्राउंड वर ?"
नव्या " हो .. तू पण उद्या तिकडेच आहेस का ? "
मंथन " हो "
नव्या " मंथन मग मला उद्या इथून पीक करशील का ? प्लिज ? मला ना त्या ऑटो मधून जायला कंटाळा येतो "
मंथन " ठीक आहे चालेल कि ? शंतनू मी तिला पीक ड्रॉप केले तर चालेल ना ?"
शंतनू " काय भावा ? तुझीच आहेच ना ती "
नव्याने त्याला डोळे मोठे करून खुणावले
शंतनू " म्हणजे मैत्रीण रे .. मग विचारतोस कशाला ?"
नव्या " चला मग .. मंथन किती वाजता येशील ?"
मंथन " ९ वाजता रेडी रहा .. मी वेट करत नाही कुणाचा? आणि मला लेट झालेलं पण आवडत नाही "
नव्या " माहितेय मला "
शंतनू " चल बाय "
मंथन " बाय "
नव्या " बाय" अगदी हे लोक जाई पर्यन्त उभी राहिली.
-------------------------------
ह्या दोघांचा दिवस अजून संपला नव्हता .. दोन दोन बिअरच्या बॉटल घेऊन दोघे त्यांच्या फेव्हरेट टेकडीवर आले .. आणि एकमेकांना चिअर्स करून बॉटल्स ओपन केल्या आणि गप्पा मारू लागले
शंतनू " ऐका ना मंथन ,आता समजा माझ्या मामाने किंवा घरातल्यांनी हिला रिजेक्ट केलं .. तर तू तिच्याशी लग्न करशील ना ?"
मंथन " ए गप ए .. काहीपण .. तिला कुणी रिजेक्ट करावं असे काहीच नाहीये तिच्यात .. तू का असा निगेटिव्ह विचार करतोय? आणि तुम्ही लोक एकदम क्युट दिसता एकत्र .. एक गाववाले पण आहात. "
शंतनू " हा रे पण माझ्या घरातले जरा प्रॉब्लेमॅटिक आहेत .. नव्याला फ़ुटबाँल खेळून देणार नाहीत लग्नानंतर ? ती नाराज होईल रे "
मंथन " अरे .. असे नको करुस ? तू तिच्या मागे खंबीर उभा राहा .. किती भारी खेळते ती "
शंतनू " तेच तर ना .. माझ्या मुळे तिचं नुकसान होईल ? एक काम करतो का ? तू लग्न कर ना तिच्याशी ? आपण ना तिला सरप्राईज देऊ या ? आयत्या वेळी नवरदेव बदलूया "
मंथन " ए गप ए .. तुझा मामा .. बंदुकीतून गोळी घालेल मला "
शंतनू " अरे बस काय भावा .. मी असेलच ना तिथे ? आपण सिक्रेट प्लॅन करू ?"
मंथन " पण तुला ती आवडते ना ?"
शंतनू " पण तुला पण ती आवडते ना ?"
आणि दोघे हसले .. बाहेरून हसत होते पण मनातून दोघेंही रडत होते ..
शंतनू " हे बघ , मी ना विचार केला .. नव्या ना मॉडर्न आहे .. मला ती आवडली होती ती गावातली होती तेव्हा आवडली होती .. तेव्हा तिने परकर ब्लाउज , दुपट्टा , ओढणी घातली होती .. लांब सडक केस होते .. मी चेहराही नव्हता पाहिला नीट ..तरीही तिच्या प्रेमात पडलो .. पण तीच नव्या मला म्हणाली मी गावाला आजोबांच्या धाकातुन तसे कपडे घालते इव्हन केस पण खोटे लावते .. म्हणजे ती खरी शहरात रमते रे .. तुला तर माहितेय ना .. मी लग्ना नंतर गावी सेट होणार आहे .. तर मी नाहीये सुटेबल तिच्यासाठी "
मंथन " काही नाही रे .. लग्न झाले कि कशाला खेळेल ती फुटबॉल .. तू टेन्शन नको घेऊस .. जमलं तर सपोर्ट कर नाहीतर लाव शेती करायला ?"
शंतनू " त्या पेक्षा तू लग्न कर ना तिच्याशी ? दोघे मस्त फुटबॉल खेळा .. मोठे व्हा .. एकमेकांना साथ देऊ शकाल .. मला स्वतःला खेळात फार इंटरेस्ट नाहीये .. "
मंथन " पण माझ्यासाठी मॅच बघायला येतोस ना तसाच तिच्या मॅच बघायला जात जा ? दुसरे काय पाहिजे तिला ?"
शंतनू " यार मंथन तुला कळत नाहीये ? मला काळजी वाटते तीची ? ती खुश लाईफ डिझर्व करते .. तू लग्न कर तिच्याशी "
मंथन " तसेही आपल्या दोघांच्यात तू तिला आधी पाहिलंय .. तू आधी तिच्या प्रेमात पडलाय म्हणजे खरा क्लेम तुझाच आहे .. आणि मला तिची अजिबात काळजी नाहीये कारण मला माहितेय तू नक्की तिला खुश ठेवशील "
शंतनूने मंथनला समजवयाचा खूप प्रयत्न केला पण मंथन काही माघार घेइ ना आणि लग्नाला तयार होई ना ?आता आयत्या वेळी ह्याला लग्नाला उभा करायचा म्हणजे कसा करायचा ? हा काय लहान कुक्कुलं बाळ नाहीये ? आणि मामाला कळलं तर मामा एकला नाही दोघांना गोळ्या घालेल .. म्हणेल तुला लग्न करायचे नव्हते तर मग मला तयारी करायला का लावली ?"
मंथन " चल जाऊया ? तुला घरी सोडतो .. मला सकाळी उठाचय "
शंतनू " तरी पण मी काय सांगतो त्यावर जरा रात्री विचार कर .. मला तर असे वाटते तिला पण तू आवडतोस .. तू नव्हतास तेव्हा रडत होती आणि तू आल्यावर खुशीने नाचत होती "
मंथन " गप रे .. तुझ्या जोक्स वर ती खूप हसत होती "
शंतनू " काही पण ? ती दोघांच्या जोक्स वर हसत होती "
मंथन " बरं .. चल आता . आणि एक मनात काही गिल्ट ठेवू नकोस .. मला ती आवडली हे फक्त मी तुला बोललो होतो .. आणि मी आता विचार केला कि मी फक्त तिच्या खेळण्यावर प्रभावित झालो होतो .. बाकी काही नाही .. तू आणि ती जोडी खूप छान आहे "
शंतनू " बघ हा मग नंतर रडत बसशील ? आज आणि उद्या आहे तुझ्या जवळ ? मी उद्या जातोय गावी तर मी मामला लग्न कॅन्सल करायला पटवू शकतो अजून वेळ गेलेली नाही .. एकदा का घरात तयारी सुरु झाली कि मग मी हि काहीच करू शकणार नाही "
मंथनला थोडीशी चढली होती
मंथन " काँग्रट्स , माझ्या नव्याला खुश ठेव काय ?"
शंतनूला हे वाक्य ऐकताना किती यातना झाल्या होत्या त्याचे त्याला माहित
शंतनूचे के मन सांगे " ह्याला मी एवढा चान्स देतोय तर हा घेत नाहीये .. मग हा उभा राहिलाच नाही तर माझे नव्याशी लग्न होईल .. आणि नव्या कायम नाराज राहील
शंतनू " मंथन , अरे ती मला बोलली .. मला मंथन आवडतो .. तू .. तूच कर तिच्याशी लग्न .. मी उद्या कॅन्सल करून येतो माझे "
मंथन " वेडा आहे का तू ? ती किती खुश आहे ? मघाशी नाही का बोलली जावई तुला "
नव्याचा नवरा शंतनूच होणार असे मंथनने ठरवूनच टाकले होते.
0

🎭 Series Post

View all