आलिंगन (भाग 3)
दारावरील बेल चा आवाज येताच,
समिधा ने मला जोरात ढकलले,
उशी माझ्या अंगावर फेकून,
ही घे तुझी समिधा असे म्हणुन पळत खोलीमधून बाहेर गेली.
मी आपला हिर्मुसलेल्या चेहऱ्याने तिच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघत राहिलो.
गेली ना मला सोडून ?
आता मी उठणारच नाही बघ तू
मी मनाशीच पुटपुटलो.
समिधा जाऊन आता खुप वेळ झाला होता .
तिने ना आवाज दिला,
ना ती पुन्हा खोलीकडे फिरकली,
मग काय मी च आपला उठलो
पोटातील कावळ्यांच्या इशाऱ्यामुळे.
आता खूप भूक लागली होती.
खिचन मधून छान सुगंध ही येत होता.
कशाचा आहे ते कळत नव्हते पण छान होता.
मी आपला पावलं चोरत चोरत हळू हळू हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसलो.
चेहऱ्यावर रागाचे खोटे भाव आणून,
मला बघताच समिधा ने चहा टाकला
व म्हणाली चहा घे व अंघोळ कर लगेच.
मी काहीच बोललो नाही.
समिधा'
मी तुझ्याशी बोलतेय समीर,
मग,
मी काय करू नाचू
मी रागात म्हणालो
अरे असे काय बोलतोय
ती समजावण्याचा स्वरात बोलली.
मी ऐकून न ऐकल्या सारखे केले.
मला खरच राग आलाय असे समजून मग माझा राग दूर करण्याचे एक एक प्रयोग चालू झाले.
समिधा हातात चहा घेऊन आली,
व मुद्दाम चहा देताना हाताला स्पर्श करून गेली,
मला जाणवले होते पण मी दाखवले नाही.
एरव्ही केस धुतले की माझ्या जवळही न येणारी समिधा आज मुद्दाम जवळून जाताना
ओल्या केसाला झटका मारून गेली व त्या केसांचे काही थेंब माझ्या अंगावर पडले.
तिचे ते ओले केस,
अंगावरील साडी,
व स्वतःहून माझ्यात समावण्याचा लागलेला ध्यास.
मला तिच्याकडे खेचत होता.
पण तरीही मी सावरून बसलो स्वतः ला,
कारण खोटं खोटं का होत नाही पण मी रागावलो होतो तिच्यावर.
समिधा मुद्दाम माझ्या आसपास वावरत होती.
जेव्हा जेव्हा आमचे भांडण व्हायचे तेव्हा तेव्हा ती नेहमी असेच करायची
कारण भांडण झाले की तिचे मन कुठेच लागायचे नाही.
हे मला माहित असल्यामुळे मी देखील तिच्याशी कधी भांडत नव्हतो.
पण म्हणल आज थोडी मजा घेऊ तिची,
व ती नेमकी जाळ्यात सापडली होती.
मी चहा घेऊन कप बाजूला ठेवला,
आणि टी व्ही बघण्याचे नाटक करू लागलो.
आता समिधाला रहावेना,
ती माझ्या पाठीमागून आली व माझ्या गळ्यात हात टाकून लाडाने म्हणू लागली
ये समीर सॉरी ना रे,
खुप काम होत घरात,
आणि तू असे सकाळी सकाळी हटकलेस
सॉरी ना पिल्लू,
आता ती खरच फसली याची जाणीव मला झाली होती.
मग असा गळाला लागलेला मासा कुणी सोडेल का ?
मी तिला हाताला पकडून डोळ्यांनीच शेजारी बसण्यासाठी खुणावले.
तशी ती पटकन येऊन बसली
भोळी माझी बायको,
मी तिचा हात हातात घेतला
तशा तिचा चेहराच बदलला
एक क्षणही तिच्या त्या चेहऱ्यावरून नजर माझी हटत नव्हती.
तिची ती निळ्या रंगाची साडी,
वाऱ्यावर उडणारे तिचे काळेभोर लांबसडक केस,
व गालाला मी केलेला एका बोटाचा स्पर्श
माझे मलाच स्वर्गसुखाची अनुभूती देत होते.
आज समिधा मला खुप मोहक वाटत होती.
असे वाटत होते की हा क्षण संपूच नये
आता ती पूर्णपणे माझ्या कुशीत विसावली होती.
माझ्या हाताचा तिच्या पोटाला नकळत झालेला की मुद्दाम केलेला निरुतरीत स्पर्श
तिला माझ्याकडे ओढत होता.
तेवढ्यात तिला काहीतरी आठवले व ती
सोडण्यासाठी हट्ट करू लागली
क्रमशः.....….….........
काय आठवले असेल तिला ?
इतके जीवापाड प्रेम करणारे हे दोघ का वेगळे झाले असेल बघुयात पुढच्या , अंतिम भागात
पुढील भाग आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहण्यासाठी मला फॉलो करा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा