आलिंगन(भाग 1)
आज रविवार सुट्टी चा दिवस,
मस्त पडलो होतो पलंगावर पेगाळत,ना कसले टेन्शन ना कुणाचा धाक जणू स्वर्गसुखाची अनुभूती घेत होतो मी
या कुशिवरून त्या कुशीवर कधी डोक्यावर उशी तर कधी उशीवर डोके,
कधी पायाची अढि तर कधी एक अडवा करून दुसरा दूर फेकून देत पसरवलेला जसा तो माझा नाहीच
खुप वेळा पासून हाच कार्यक्रम चालू होता माझा
खिडकीच्याफटीमधून येणारी ती सूर्याची कोवळी किरणे, व त्याला मिळणारी कोकिळेची साथ
हो कोकिळेची च
माझ्या खोली च्या बाजूला एक झाड आहे व त्यावर कोकिळा राहते तिच्या परिवारासह माझ्या सारखी
ती किरणे
ती कोकिळा
समिधा ने दारात सडा मारला असावा व त्यामुळे सुटलेला तो मातीचा गंध, वाऱ्यावर मनसोक्त डुलणारी ती कोवळी पाने सगळं कसं रम्य वाटत होतं
मी तर पूर्ण भान हरवून गेलो होतो त्यात
जणू सगळेच मला खुनवत होते उठा समिरराव खुप लाड झालेत आता
कारभारीन देवीचे रूप धारण करण्या अगोदर निघा अंघोळीला,
मी माझ्या मनाशीच हसू लागलो
व जसे समिधा च्या आवाजाची वाट बघू लागलो कारण तिचे बोलणे खाल्ल्या शिवाय उठायचे नाही असा प्रण केला होता मी
तेवढ्यात मनकवड्या समिधा ने माझे मन जाणले
'अरे समीर उठ ना किती वाजलेत बघ तरी,
मी ऐकून न ऐकल्या सारखे केले
अग कालच्या इतकेच वाजलेत, मी हळूच बोललो तिला ऐकू जाणार नाही अशा स्वरात
माझा काहीच प्रतिसाद नाही हे बघून तिने पुन्हा आवाज दिला
समीर पाणी टाकले अंघोळीला उठला का?
मी मुद्दाम पुन्हा कूस बदलली ,
तिचा आवाज देण्याचा व माझा फक्त कूस बदलण्याचा सपाटा चालूच होता
माझा काहीच प्रतिसाद नाही हे बघून ती रूमकडे आली
व दरवाजामध्ये उभे राहून म्हणाली चल उठ अंघोळ करून घे
मला आणखी देवपूजा करायची आहे
मी केविलवाण्या स्वरात म्हणालो
अग कसेतरी च होतंय
नेमकं काय होतंय समीर तुला डॉक्टर ला बोलावू का?
ती काळजीने म्हणाली
खुप जड झाले,
ताप पण,आला
पूर्ण अंग दुखत आहे
काही कळेना काय झालं
मी हळू आवाजात बोललो
आता मात्र ती काळजीत पडली
अरे रात्री तर ठीक होता,
व असे इतके सगळे दुखतय ते पण एक सोबत
थोडे आश्चर्य नाही वाटत का ?
ती विचार करत बोलली
अरे कसले आश्चर्य
रात्री ठीक असेल तर सकाळी आजारी पडू नये असा नियम आहे का ?
तू फक्त दुरून वकिली कर पण जवळ येऊन बघू नकोस मला काय झालंय ते
मी नाराजीचा स्वर काढून बोललो
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा