आलिंगन (भाग 4) अंतिम

Hug is a short story about husband and wife's love ,

आलिंगन (भाग 4)

माघील भागात आपण पाहिले समिधाला काही तरी आठवले व ती समीर ला सोडण्यासाठी हट्ट करू लागली 

 आता पुढे 

मी आता तुझ्या कुठल्याही नाटकाला किंवा भूलथापाना बळी पडणार नाही.
व सोडणार पण नाही समीर जिद्दीने म्हणाला 


हो का बरररररररररररर,
समिधा, सांभाळून घेत म्हणाली.

समिधाने थोडे शांत होण्याचे नाटक केले. 
माझे लक्ष थोडे विचलित झाले की,
 ती हाताला जोराचा झटका देऊन निघून गेली.
 व म्हणाली काय समिरराव अजून बायकोवर पकड नीट जमली नाही वाटत आणि जोरात हसत किचनमध्ये गेली.


मला खुप राग येत होता स्वतः चा
 काय इतकीशी हडकुळी बायको भारी भरली आपल्यावर,
मी स्वतःच राग राग करू लागलो. 
त्याच रागात मी जोरात हात सोफ्यावर मारला अर्थात मलाच लागले व आवाज मात्र समिधापर्यंत पोहोचला,

पोहोचल्यालेल्या आवाजाला प्रतिसाद देखील आला.
हळू,
 माझ्या बाबांनी लग्नात दिलाय तो. 

मी रागाने च जोरात हो माहीत आहे 
असे म्हणालो. 
व विचार करू लागलो,
हे लग्नात असे सामान फक्त आयुष्यभर जावयाने टोमणे खावे म्हणून देत असतील का?
की अजून काही षडयंत्र असेल या पाठीमागे. 

माझे मलाच हसू आले मी काय विचार करतोय म्हणून, 

सोप्यावर बसून बसून बोर झाल्यावर 
मग मी मोर्चा बाथरूम कडे वळवला, म्हणल चला,
 घेऊ आता अंघोळ करून 
कधीतरी आपल्यालाच करायची आहे.

पुन्हा स्वतःवर हसून आंघोळीला गेलो.
अंगावरून ओघळणाऱ्या पाण्यासोबत 
आजची समिधा ही आठवत होती. 
हाताला साबण लावून चेहऱ्याला लावण्यासाठी डोळे बंद केले.
तर डोळ्यासमोर सकाळची समिधा उभी राहिली.
ती निळ्या रंगाची साडी, 
ओले केस, 
तिचा तो स्पर्श, 
तिची वाढलेली हृदयाची स्पंदने,
का कुणास ठाऊक पण आज मला समिधाची वेगळीच ओढ लागली होती.
असे कधीच झाले नव्हते यापूर्वी. 
अगदी नवीन लग्न झाले होते तेंव्हा देखील मग आज असे अचानक का ?
आज समिधा मला वेगळीच भासत होती. 

मी तिच्या विचारात गुंतलो होतो. 
 अचानक कानठळ्या बसण्या इतका आवाज झाला.
 त्या पाठोपाठ समिधा चा देखील आला. 

मला काही कळेना 
हातातील साबण केव्हाच गळून पडली होती. 
अंगावर पाणी घ्यावे हे देखील मला कळेना.
 मी पटकन आवरून तसाच आवाजाच्या दिशेने पळालो. 
किचन मध्ये जाण्यासाठी काहीच मार्ग नव्हता फक्त धुराचे व आगीचे लोट बाहेर येत होते.
तेवढ्याच आगीने वेढलेली समिधा बाहेर आली. 
 मला दूर राहण्यास सांगत होती. 
ती पुन्हा पुन्हा विनवणी करत होती दूर राहण्यासाठी.
पण ज्या बायकोवर जीवापाड प्रेम होतं 
ती आत्मा होती माझा, 
ती स्वास होती माझा, 
ती हृदय होती माझे, 
ती सर्वस्व होती माझे, 
अश्या बायकोला या अवस्थेत बघणे मला तरी शक्य नव्हतं.
 हृदय किंचाळत होत, 
डोळ्यांना फक्त धारा लागल्या होत्या,
शब्द फुटत नव्हते,

मी जवळ दिसेल ते ओढू लागलो.
 आग विजवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होतो.
मी ओरडत होतो,
 किंचाळत होतो, 

 माझी समिधा फक्त मला दूर राहण्यास सांगत होती. 

आतापर्यंत माझ्यात सामावण्याचा ध्यास लागलेली समिधा.
 आता दूर जात होती व मी ईच्छा असूनही तिला थांबवू शकत नव्हतो. 
घरात आगीचे तांडव चालू होते.
 व फक्त आम्ही दोघेच त्या आगीशी खेळत होतो. 

तेवढ्यात मोठे कपड्या सारखे काहीतरी हाताशी लागले मी वाऱ्याच्या वेगाने समिधा ला त्यात गुंडाळले, 
इतका वेळ  ओरडणारी समिधा आता शांत झाली होती.

तिचे काही क्षणापूर्वी मोहक वाटणारे रूप
काळे पडले होते, 
मला आवडणारा तो साडी चा रंग बेरंग झाला होता, 
तिच्या शरीरावरील आग विझली होती.
पण त्यात समिधा खुप भाजली होती. 

मी तिचे डोके मांडीवर घेऊन खाली बसलो व ओरडू लागलो.
नाही समिधा तू मला एकट्याला सोडून नाही जाऊ शकत.
मी जाऊच देणार नाही तुला,
थांब मी डॉक्टर ला फोन करतो.
मी तुला काही होऊ देणार नाही. 

तेवढयात तिने माझा हात धरला व म्हणाली ये वेड्या आपली सोबत इथपर्यंत च होती.
पण जाताना माझी शेवटची ईच्छा पूर्ण कर. 
मी फक्त नाही ,नाही , असेच ओरडत होतो, 
दुसरे काही सुचत नव्हते मला. 

ती म्हणाली हट्ट करू नको जास्त वेळ नाही माझ्याकडे. 
ऐक माझे प्लीज.
तिचा तो करून स्वर,
डोळ्यात माझ्यासाठी प्रेम,
संपूर्ण अंग भाजलेले असतानाही 
त्या स्पर्शात मला जाणवनारा प्रेमाचा ओलावा, 

मी म्हणालो बोल 

ती म्हणाली मला शेवटचं एकदा 
फक्त एकदा

आलिंगन दे ना, 

मला एकदा तुझ्या मिठीत घे ना,

मला शेवटचं तुझ्यात सामावू दे ना, 

मला शेवटचा क्षण तुझ्या सोबत जगायचा आहे व तो ही कायमचा,

मी क्षणाचाही विलंब न लावता तिला घट्ट मिठीत घेतले,
हा क्षण इथेच थांबवा व मी आयुष्यभर असेच जगावं तिच्या मिठीत म्हणून मी देवाचा धावा करू लागलो, 

हे आलिंगन जन्मजन्मांतरी असेच  रहावे 
त्यापुढे नियतीनेही झुकावे, 

पण  हे आता निरर्थक होत 
काही सेकंदात मला तिची स्पंदने जानवेनाशी झाली,
शरीर थंड पडले 

मी तिच्याकडे बघितले तर तिचे डोळे बंद होते.
व चेहरा शांत 
मी एकच टाहो फोडला समिधा, समिधा ...........................

दामोदर काका (  समिधा नंतर मी त्यांच्यासोबत राहत होतो) नि 
हलवले व मला जाग आली 
डोळ्यात फक्त अश्रू होते 
मी अलगद अश्रू पुसले 
व समिधा च्या फोटोकडे बघत 
म्हणालो 
का गेलीस ग मला एकट्याला सोडून, 

आज दहा वर्षे झाली पण माझा एक क्षण ही  जात नाही की तुझी आठवण येत नाही,  

तू पण नावाप्रमाणेच निघाली समिधा 

त्या समिधा ला होमात आहुती देतात 
व तू माझ्या प्रेमात दिलीस, 

आयुष्यभर सोबत राहील माझ्या 
ते शेवटचे

' आलिंगन ,


कथेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार, काही सूचना असेल तर नक्की कळवा त्यांचे स्वागत असेल, कथा कशी वाटली ते कमेंट्स मध्ये सागा, ते लिखाणासाठी प्रोत्साहन देत 
निरोप घेते 
घरी राहा 
सुरक्षित राहा