हुजूर मरहटे आ गये ! भाग १
" जहाँपनाह के खिदमत मे आदाब अर्ज हैं... " एक शिपाई नुकताच नमाज पढून उठलेल्या आणि आपल्या चटईची घडी घालणाऱ्या औरंगजेबाला म्हणाला.
औरंगजेबने एक शांत कटाक्ष त्या शिपायाकडे टाकला. शिपायाची नजर खाली आणि मान वाकलेली होती. पुन्हा आपल्या चटईची घडी घालायला सुरुवात केली आणि म्हणाला, " कहो... क्या हैं ? "
" हुजूर, शहाबुद्दीन खान साब आपसे मिलने की चाहत लेके आये हैं. " शिपाई.
" कुछ देर बाद, मेरे इशारे के बाद अंदर भेज देना. " औरंगजेब.
औरंगजेब आपल्या विचारात होता. ' छह साल....! छह साल इस शहाबुद्दीनने बेकार गवाये. एक छोटासा किल्ला नही ले पाया. स्वराज का सबसे आसान, सबसे कम उचाईवाला किल्ला. ' किल्ले रामशेज '
बीस हजार फौज के साथ भेजा था उसे. और उस किल्ले पर महज कुछ मरहटे थे. उसने कहा था, " हुजूर, महज कुछ ही दिनो में किल्ला मुगल रियासत में होगा. " लेकिन.... लेकिन इन मरहटो ने छह साल उसे वहासे हिलने नही दिया. इतनी जदोजहद के बावजुद मरहटे जाने कहांसे रसद किल्लेतक पोहचाते थे ? आखिर हमे फौज वापस बुलानी पडी.
तबसे आज तक इस शाहबुद्दीन की शक्ल नही देखी हमने. और आज वह खुद आया हैं. क्यू ? उसे अपनी जान की परवाह नही ? उसका नाम सून मानो जख्म ताजा हो गया हैं. '
आपल्याच विचारात असलेल्या औरंगजेबने शहाबुद्दीनला आत पाठवण्याचा इशारा केला. थोड्याच वेळात नजर आणि मान खाली घातलेल्या शहाबुद्दीनने अदबीने आत प्रवेश केला.
औरंगजेबने शांत कटाक्ष त्याच्यावर टाकला. नजर आणि मान खाली असूनही शहाबुद्दीनला त्या घातक नजरेबद्दल जाणीव झाली आणि त्यांच्या मानेवरून घर्म बिंदू खाली आला. काही क्षण शांततेत गेले. शहाबुद्दीनच्या तोंडून शब्द फुटत नव्हता.
अखेर औरंगजेब कडाडला, " तूम हमे अपनी यह शक्ल दिखाने आये हो ? "
शहाबुद्दीन अडखळत, "न...नही... नही हुजूर, वह तो एक बात पता चली, और लगा जैसे मुझपर लगा दाग मिटाने का मौका खुदा ने दिया हैं. इसीलिये आपके पास आया हुं. रामशेज के किल्ले में जो हुआ, उसके बाद आपको मुह दिखाने के लायक नही रहा मे. लेकिन इस बार शायद.... जान की सलामती हो तो.... "
औरंगजेब, " कहना क्या चाहते हो ? साफ साफ कहो. "
शाहबुद्दीन कुजबुजत म्हणाला, " हुजूर, मैंने अपने जासूस लगा रखे थे. और पता चला हैं की, रामशेज का किल्लेदार सूर्याजी जेधा, उसे संभाजी महाराजने अपने पास बुला लिया हैं. और इस वक्त वह किल्ला किसी बेहद कम उमर लडके के पास आहे. वही किल्लेदार हैं. सूर्याजी जेधा के पास तजुर्बा था. इस लडके के पास वह नही. मेरे मुकाबले तो बिलकुल नही.
आप अगर हुकम दे तो, इस बार रामशेज हर हाल में, मैं लेके रहुंगा. अपने उपर लगा दाग मिटाने का एक मौका दे हुजूर. " शाहबुद्दीन गुडघ्यावर बसत म्हणाला.
औरंगजेब यावर थोडा वेळ विचार करत म्हणाला, " हम तुम्हे एक मौका जरूर देंगे, लेकिन........
लेकिन अगर इसबार किल्ला हात न आया तो....
लेकिन अगर इसबार किल्ला हात न आया तो....
जाते वक्त कबर खोद के जाना.... "
औरंगजेबचा होकार मिळताच शहाबुद्दीन किल्ले रामशेज वर चाल करण्यासाठी तयार झाला.
क्रमश:
सूचना : माझ्या सर्व कथा वाचता याव्यात म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevourite" ऑप्शन निवडून घ्या. जेणेकरून सर्व कथांचा आनंद तुम्हाला घेता येईल.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा