हम-तुम भाग -10

hi

हम-तुम भाग 10

तन्वी आणि स्नेहा दोघीपण कॉलेजला जातात,तन्वी स्नेहाला तिच्या परफॉर्मचा निर्णय सांगते "स्नेहा तु मला काल डान्सबद्दल सांगितल्यावर मी त्याच्यावर काल पूर्ण विचार केला ,मला तुझं म्हणणं पटलंय आणि मी परफॉर्म करण्याच ठरवलं आहे ." स्नेहा एकदम खुश होते . "वा एकदम मस्त तन्वी ,मी तर खूप खुश आहे तुझ्या निर्णयांवर ,पण मला एक सांग ,मी तर नेहमी तुला सांगत असते तेव्हा कधीच माझं पटत नसतं ,आणि आज एकदम कस काय पटलंय तुम्हांला मॅडम ? खर सांग मानसने सांगितलं म्हणून तयार झालीयेस ना? तन्वीला कळतं ,कि तिला स्नेहाने तिला एकदम बरोबर पकडलंय ,ती सारवासारव करण्याचा प्रयत्न करते ."नाही ग स्नेहा ,तू माझी बेस्टी आहे ना ,म्हणून विचार केला गं ,आणि तुला तर त्याच कौतूकचं नाहीये ,मला नाही बोलायचंय तुझ्याशी जा ." "अग तन्वी असं नको ना बोलू यार,तुला माहितीये ना मी तुझ्याशी न बोलता नाही राहू शकतं ,मी तर सहजच चिडवत होते ." " स्नेहा ठीक आहे पण तू जर मला परत चिडवलं तर मात्र खरच कट्टी तुझ्याशी ओके ."ओके तनु चल आपण मानसला जाऊन भेटून सांगूयात ," तन्वी आणि स्नेहा मानसला शोधत ऑडिटोरियममध्ये येतात , इकडे मानस आणि कीर्तीचा साल्सा डान्स परफॉमन्स सुरु असतो .

"गुलाबी आँखें, जो तेरी देखी

शराबी ये दिल हो गया

सम्भालो मुझको, ओ मेरे यारों

सम्भलना मुश्किल हो गया"

साल्सा आणि रीमिक्स सॉन्ग असल्यामुळे ते डान्स करताना एकदम जवळ येतात.सगळे त्यांचा डान्स ए एन्जॉय करत असतात .पण त्यांचा डान्स बघून तन्वीला थोडी चिडचिड होते , इतक्यात कोमल विनयला बोलते ." दोघे एकमेकांबरोबर कसले भारी दिसतात ना विनय,एकदम परफेक्ट कपल ," विनय तन्वी आणि स्नेहाला बघून मुद्दाम कोमलला बोलतो ."खरंच यार कोमल दोघे एकदम रब ने बना दि जोडी सारखे दिसतात ,विनयच बोलणं ऐकून तर तन्वीला खूप राग येतो ,पण असं का होतंय हे तिला बिलकुल कळत नाही.इतक्यात त्यांचा डान्स पूर्ण होतो आणि सगळे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात स्नेहापण जोरात टाळ्या वाजवते ,तन्वी स्नेहाला चिडून बोलते ."एव्हडं काय झालाय तुला टाळ्या वाजवायला ,इतकं चिकटून डान्स करायची काही गरज आहे का? साल्सा पेक्षा किती तरी चांगले डान्सफॉर्म्स आहेत ना? त्यापेक्षा जरा ट्रॅडिशनल डान्स करायचा ,होता ,पण जाऊ दे मला काय करायचा ,तन्वी चिडून बाहेर निघून जाते . स्नेहाला तन्वीच्या चिडण्याचं कारण समजत नाही .इकडे विनय तन्वीची रिऍक्टशन बघून खुश होतो, स्नेहाकडे येतो. "हाय विनय ,आता तर तन्वी बरी होती .एकदम काय झालं हिला मला तर कळतच नाही यार ," विनय हसून स्नेहाला बोलतो "ऐसा हि जी कि आग दोनो तरफ लगी हैं ,पर दोनो प्यार से अंजाण है क्या करे? विनयचं बोलणं ऐकून तर स्नेहा अजूनच कन्फयुस्ड होते ."अरे काय यार इकडे तन्वी असं काय वागते ते कळत नाहीये आणि तू तर नेहमीप्रमाणे कोड्यात बोलतोय ते मला कळत नाहीये ,जाऊ दे मी जाऊन बघते तन्वीला काय झालं ते ." मानसने तन्वीला बाहेर जाताना बघितलं असत तो विनयकडे येतो ."अरे विनय तन्वी आली होती ना ,मी तिला परत जाताना बघितलं ,काय बोलली का ती तुला ?काय हि मुलगी भेटून तर जायचं ना . विनय त्याची नाराजी पाहून बोलतो ."अरे हो बहुतेक तिला तिच्या बॉयफ्रेंडचा फोन आला होता म्हणून घाईघाईत निघून गेली रे ,आता बॉयफ्रेंड असल्यावर तुझ्यासाठी विशेष असं काही निरोप नाही दिला तिने… मानस जरा चिडून बोलतो “.तिच्या घरून आला असेल फोन ,तुला काय माहित तिच्या बॉयफ्रेण्डचा फोन होता म्हणून? " अरे मानस पण ती खूप प्रेमाने बोलत होती ,नक्कीच तिच्या बॉयफ्रेंडचा फोन असेल बघ ,आणि एवढ्या सुंदर मुलीचा बॉयफ्रेंड तर असेलच ना भाउड्या ,क्या तू भी ? " विनय मुद्दाम बॉयफ्रेंड ह्या शब्दांवर जास्त जोर देऊन बोलत होता . विनयचं बोलणं ऐकून मानस एकदम स्तब्द झाला,त्याला नंतरच बोलणं काही ऐकूच येत नव्हतं , त्याला खूप वाईट वाटलं .जेव्हा विनयने खांद्यावर हाथ ठेवला तसा तो दचकला ,"अरे मानस मी तुझ्याशी बोलतोय कुठे हरवलाय ? तन्वी निघून गेली ,आता इथेच थांबलास तरी ती लगेच थोडी येणार आहे ? ."मानस विनयचा हाथ झटकून तिथून निघून जातो .,तेव्हड्यात कीर्ती विनयकडे येते ."अरे हा मानस कुठे गेलाय आता,डान्स स्टेप्स थोड्या चेंज करायच्या आहेत असं बोलत होता ,आणि असा कसा निघून गेला हा मला न सांगता ?. विनय कीर्ती कडे हसून एक भुवई उडवून बोलतो ."अरे जानेमन ,अभि तो शुरुवात है ,आगे आगे देखो होता है क्या ? कीर्ती त्याच्याकडे बघून चिडून त्याला बोलते ."यार मला टेन्शन आलाय आणि तू काय डायलॉग मारत बसलाय ,जा त्याला शोधून आण प्रॅक्टिससाठी ." "कीर्ती मला नाही वाटत ,तो आता येईल ,तू आता उद्याच कर प्रॅक्टिस ,मी जातो त्याला शोधायला ,बाय . " विनय बाहेर निघून जातो .त्याच्या आधीच स्नेहा बाहेर आलेली असते , पळत जाऊन तन्वीला आवाज देते."तन्वी ,अग थांब ,काय गं एकदम का निघून आलीस तिथून? मानसला भेटायला गेलो होतो ना आपण ? "स्नेहा मला वाटतंय आपण त्या सर्क्युलरनुसार नाव मेल करूयात ,उगिच कशाला कोणाला त्रास द्यायचा? त्यांच्या डान्समध्ये डिस्टर्ब कशाला करायचं ?." स्नेहाला तन्वीला नक्की काय झालं ते कळतंच नाही ,पण ती चिडली असल्यामुळे ती तिला जास्त काही बोलत नाही." तुझं म्हणणं पण बरोबर आहे ,आपण मेल करू ,मग तर झालं ,पण तू आता शांत हो बर . " अग स्नेहा मी कशाला चिडू ,मला कशाला राग येईल जाऊ दे आपण क्लासमध्ये जाऊ. आधीच ह्या मानसमुळे खूप लेट झाला आहे . दोघीपण क्लासमध्ये जातात .मानस चिडल्यामुळे ऑडिटोरियममधून बाहेर येतो आणि गाडी काढून कॉलेजच्या ग्राउंड जवळ जाऊन एकटा बसतो .ती त्याची एकदम आवडती जागा असते ,ग्रॉऊंडच्या कडेला एक मोठं पिपळाच झाड असतं ,त्याचा सावलीमध्ये एक लाकडी बेंच असतो,तिथून दूरवर असणारे डोंगर दिसत असतात .मानस जेव्हापण खूप खुश किंवा दुखी असतो तेव्हा तो इथे एकटा बसून मन हलकं करत असतो. तो मनातल्या मनात बोलत असतो ."इतक्या सुंदर मुलीचा बॉयफ्रेंड नाही हे शक्यच नाही , खरंच तन्वीचा बॉयफ्रेंड असेल का? मी हा विचारच कधी केला नाही, मी हा विचार करायला हवा होता ,पण मला का इतका त्रास होतोय? मी खरच तिच्या प्रेमात पडलोय का? तिचा बॉयफ्रेंड असल्यामुळे आता असा विचार करून काय फायदा ? मला नक्की कशाचा त्रास होतोय हेच नक्की कळत नाहीये ,मानसाच्या डोळ्यात नकळत पाणी येत .तेव्हड्यात विनय त्याला शोधत तिथे येतो ,त्याच्या डोळ्यात पाणी बघून त्याला थोडं हसु येत ,"अरे यार मानस इथे बसलाय तू ,आणि मी तिकडे अख्खा कॉलेज पालथं घातलं ,ती कीर्ती पण चिडली होती तुझ्यावार ,काय झालं तू एकदम निघून का आलास ? काही प्रॉब्लेम झालाय का भावा ,आणि तुझ्या डोळ्यात पाणी का आलाय ? आर यु ओके माय ब्रो ?.. विनयला पाहून तो पटकन त्याचे डोळे पुसतो "अरे विनय यार तू कधी आलास ? ते वाऱ्यामुळे डोळ्यात कचरा गेला असेल म्हणून पाणी आलं . मी तर सहजच आलो इकडे ,तुला माहितीये ना हि माझी स्पेशल जागा आहे . विनय त्याला जास्त काही विचारत नाही .दोघे थोड्यावेळ तिथे बसतात आणि मग नंतर कॅन्टीनला जातात ,स्नेहा आणि तन्वी लेक्चर्स झाल्यामुळे त्यापण कँटीनला येत असतात . तन्वी कॉर्नरवर बसलेल्या मानस आणि विनयला बघते,आणि मुद्दाम त्यांच्यापासून एकदम लांब असलेल्या टेबलवर बसते. स्नेहा ऑर्डर द्यायला काउंटरवर जाते.स्नेहाला बघून विनय मुद्दाम तिच्याजवळ बोलायला येतो विनय:." काय ग स्नेहा ,तन्वी एकदम का निघून गेली ते कळलं का?" स्नेहा :" नाही रे ती चिडली कि मी तिला शक्यतो काही विचारात नाही तिचा राग शांत झाल्यावर मग तीच सांगेन ." विनय :" ओके ,तुझ्या मैत्रिणींला खूपच राग येतो वाटत ? ते जाऊ दे ,तुम्ही दोघी ऑडिटोरियम कशाला आला होतात ? म्हणजे काही काम होत का ?...स्नेहा :" अरे ते फ्रेशर पार्टीमध्ये परफॉर्मन्स साठी तन्वीच नाव द्यायला आलो होतो ,काल मानसने तिला समजाऊन सांगितलं तेव्हा तिला पटल, सकाळी तर एकदम खुश होती , पण आता जरा अवघड वाटतंय .मला नाही वाटत ती भाग घेईल म्हणून ." विनय : " असं आहे तर ,मी बोलेल तिच्याशी तू नको जास्त विचार करू ."

क्रमशः

माझ्यानावाशिवाय कृपया माझी कथा कुठेही शेयर करू नका .साहित्यचोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे ,असे करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ©वृषाली गावडे

तळटीप :तुमच्या F बरोबर कमेंट पण येऊ द्या . कमेंट वाचल्यावर लिहायला अजून उत्साह येतो .तुमचं प्रेम कमेंटमधून पण दिसून द्या ...

🎭 Series Post

View all