हम-तुम भाग -12

hi

तन्वी सकाळी लवकर उठते,आणि बाल्कनी मध्ये जाते , सगळीकडे मस्त सोनेरी प्रकाश पसरलेला असतो त्यात ,पक्ष्यांचा किलबिलाट ,थंड वारा त्यामुळे वातावरण एकदम प्रफुल्लित झालेलं असत ,तन्वीला एकदम प्रसन्न वाटतं ,ती फ्रेश होते आणि कॉलेजला जाते.स्नेहा आणि तन्वी दोघीपण एकमेकांशी गप्पा मारत क्लासरूमकडे जात असतात तेव्हड्यात विनय त्यांना क्रॉस होतो ,त्याला पाहून स्नेहा त्याला आवाज देते . "हाय विनय ,अरे आज एकटाच दिसतोय ? मानस आला नाही का कॉलेजला ?. " अरे हो तो आज कॉलेजला आला नाही ,त्याला जरा बर वाटत नाहीये असं म्हणत होता." विनयने असं सांगितल्यावर तन्वीचा चेहरा एकदम पडतो." काय झालं त्याला ?काल तर एकदम चांगला होता .. " अग तन्वी काल जरा कणकण वाटत होती ,बहुतेक त्याला ताप आला असेल ,त्याचा फोनवरचा आवाज पण जरा खोल वाटलं ग," विनय मुद्दाम जरा जास्तच सांगतो .. " अरे असं असेल तर त्याने डॉक्टरकडे जायला हवं ना,गेला कि नाही तो ? " हो तुझं म्हणणं एकदम बरोबर आहे ,पण त्याने ऐकलं पाहिजे ना ,एकदम हट्टी आहे तो ,मला नाही वाटत तो जाईल डॉक्टरकडे,एक काम कर तूच सांग त्याला बघू ऐकतो का ते? "मी केला असता फोन पण माझ्याकडे त्याचा नंबर नाहीये ना ,आणि हट्टीपणा करायला लहान आहे का तो ? " विनय : " काय सांगतेस तुझ्याकडे त्याचा नंबर नाहीये ,इथेच तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तर ,डोन्ट वरी ,मी देतो तुला नंबर ओके" तन्वी तिचा मोबाइल विनयला देते ,विनय तिच्या मोबाइलवर मानस आणि त्याचा नंबर सेव करतो ,आणि मोबाइल तिच्याकडे परत देताना त्याला तिच्या मोबाईल मध्ये ह्रितिक रोशनचा वॉलपेपर दिसतो . "हे घे तन्वी मी माझा आणि मानसचा नंबर सेव केलाय तुझ्या मोबाईलमध्ये ,कभी भी, कूछ भी प्रॉब्लेम आया तो हमे बेझिझक कॉल करने का ," विनय असं बोलल्यावर दोघीपण हसतात . तन्वी :"ओके बॉस हमेशा आपुन याद रखेंगा ," विनयला त्याचे बाकीचे मित्र बोलवत असतात त्यामुळे त्याना गुडबाय करून तो निघून जातो .स्नेहा विनयच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघून तन्वीला बोलते " तन्वी यार हा किती गोड़ बोलतो ना? तन्वी : "हो ग स्नेहा खरच कि , तुझं त्याला बघून झालं असेल तर आपण जाऊया क्लासरूममध्ये ,कारण पाटणकर सर नक्कीच खूप कडू बोलतात . स्नेहा आणि तन्वी दोघीहि हसत क्लासरूममध्ये जातात.मानस आजारी आहे हे कळल्यावर तन्वीच लेक्चरमध्ये लक्ष लागत नाही ,ती मोबाइल काढते आणि मानसचा सेव केलेला नंबर व्हाटसपला जाऊन त्याच DP बघते , त्या फोटोमध्ये मानस एकदम भारी दिसत असतो ,एकदम एखाद्या हिरोसारखा त्याने ब्लॅक हाल्फ स्लीव्ह टि-शर्ट ,ब्लू जीन्स ,आणि त्याच्या लुकला साजेस गॉगल, लावलेला असतो एका हातामध्ये पाठीवर टाकलेले जॅकेट ,आणि त्याच्या ब्लॅक bmw ला टेकून तो सूर्यास्त पाहत असतो . त्याचा हा फोटो बघून तर तन्वीला अजूनच त्याची आठवण येते आणि काळजी पण वाटते .ती त्याचा फोटो तिच्या मोबाइलमध्ये सेव करून ठेवते आणि स्वतःशीच थोडीशी हसते ,तिला हसताना बघून पाटणकर सर तिला ओरडतात ." मिस तन्वी ,तुम्हाला क्लासमध्ये बसण्यात काही इंटरेस्ट नसेल तर तुम्ही बाहेर जाऊ शकता ," पाटणकर सरांचा आवाज ऐकून तन्वी एकदम दचकते " सॉरी सर,इट विल नोट ह्यपन्नेड अगेन ,आय एम एक्सट्रेमली सॉरी ." .सगळ्यांसमोर सर ओरडल्याने तन्वीला जरा ऑकवर्ड फील होत,ती मोबाइल बॅगमध्ये ठेवून देते आणि लेक्चरमध्ये लक्ष देते .

मानस काल तन्वीचा विचार करून थकलेला असल्यामुळे त्याला सकाळी उशिरा जाग येते ,आणि कॉलेजला विशेष लेक्चरस नसल्यामुळे तो कॉलेजला न जाण्याचा विचार करतो. विनयला तो कॉलेजला येणार नाही हे सांगण्यासाठी तो त्याला फोन करतो ," हाय विनय ,गेला का तू कॉलेजला ? अरे मला ना जरा आज उठायला उशीरच झाला,सॉरी यार माझ्यामुळे तुला उशीर झाला असेल ना ? " अरे त्यात काय एव्हडं मानस , तू मला काल जरा डिस्टर्ब वाटलास ,मला थोडा अंदाज होताच कि तू आज कॉलेजला सुट्टी मारशील म्हणून मी तुझी जास्त वाट न बघता कॉलेजला निघून आलो ,पण काय बाबा तू कॉलेजला एक दिवस नाही आलास तर इथे लोकांना किती आठवण येतीये तुझी माहितीये का ?" विनय मानसची मज्जा घेण्यासाठी त्याला बोलतो , मानस : " काय यार विन्या,तुला सकाळी सकाळी मीच भेटलो का ? कशाला उगिच गरीबाची चेश्टा करताय तुम्ही ,आमची कशाला आठवण काढेल कोणी ?' विनय : " जाऊ दे मानस यार तुला माझ्यावर विश्वासच नाहीये ,मी आता तुला काहीच सांगणार नाही ,आणि हे पण नाही सांगणार कि तन्वी ,जाऊ दे मी कशाला तुझा वेळ वाया घालवतोय ,चल भेटू उद्या बाय " तन्वीच नाव ऐकून मानस एकदम खुश होतो " ये थांब थांब तू आता तन्वीच नाव घेतलंस ना ? तिने विचारलं का माझ्याबद्दल ? " विनय : " जाऊ दे ना यार तुला मी काही बोललं कि खर वाटत नाही ,बर तू उद्या येणार आहेस का? " मानसला आता विनयचा थोडा राग येतो मानस : विनय मी तुला काही विचारतोय .त्याच तुला उत्तर द्यायची गरज वाटेल नसेल तर सांग तस ,सांग ना यार काय बोलली तन्वी ?" विनय : " तन्वीबद्दल ऐकायचं आहे का तुला ? सॉरी यार माझ्या लक्षात नाही आलं ., काही विशेष नाही बोलली ,फकत विचारात होती कि तू आला नाही का कॉलेजला? तिने असं विचारल्यावर माझ्या मधला क्रिएटिव लेखक जागा झाला ,मग मी तिला तू थोडं आजारी आहेस अशी स्टोरी लगेच बनवून सांगितली ," मानस: " काय यार विनय ,कशाला असं खोट सांगितलं तिला,मला तू आधी सांगितलं असत तर आतापर्यंत मी कॉलेजला पोहोचलो असतो .विनय: " हो मला माहित होत ते म्हणूनच नाही सांगितलं ,आणि बघ तू माझ्या खोटं बोलण्याने तुझा फायदाच होणार आहे कळलं ना, आज संध्याकाळी नाही तन्वीचा तुला फोन किंवा मेसेज आला तर लव्हगुरु असं नाव लावणार नाही मी ब्रो ." मानस: "तुझं लॉजिक तर मला कधी काळतच नाही यार ,आणि ती कशाला मला फोन किंवा मेसेज करेल ? तू असं खोट बोलायला नको होत यार ,जाऊ दे ते अमोल आणि कीर्तीला बाकीच्या राहिलेल्या कामाचे डिटेल्स पाठवले आहेत ,तू प्लीझ तेवढ बघून घे यार ,काही प्रॉब्लेम आला तर कॉल कर मला ओके ." विनय मानसशी बोलून ऑडिटोरियमकडे जातो .

तन्वीला तिच्या डान्स स्टेप आणि परफॉर्मन्सची तयारी करायची असते, म्हणून दोघी लेक्चर संपून ऑडिटोरियममध्ये जातात. मानस तिथे नसल्यामुळे तिला खूपच एकटं वाटत ,त्याची खूप आठवण येते .विनय त्या दोघीना बोलवतो, " हाय तन्वी, मग कुठला डान्स करणार आहेस तू ? झाला का डान्स बसवून ? नाहीतर एक काम कर एकदा करून दाखव सगळ्यांना म्हणजे मग तुला सगळे सजेशन देतील ओके? विनयचं बोलणं ऐकून तन्वीला एकदम टेन्शन येते "नाही नाही अजून बसवून नाही झाल्यात स्टेप्स ,एक दोन दिवसात होईल बसवून सगळं ,मग मी करेल तुमच्यासमोर,तसपण आज मानसपण नाहीये ना ,तो आल्यावर ठरवू मग ओके ? विनय : अरे मानस नसला म्हणून काय झालं ? आम्ही आहोत ना सगळे . तन्वी : " तस नाही ,पण अजून स्टेप्स फिक्स नाही झाल्या ना म्हणून ,बाकी काही नाही ." कीर्ती : " काय रे विनय उगीच तिला कशाला त्रास देतोय ,नाहीतर तिच्या ऐवजी तुझाच डान्स परफॉर्मन्स ठेवेल मी,तन्वी लक्ष नको देऊ त्याच्याकडे ,चल आपण दोघी मिळवून डिसाईड करू ." दोघीपण स्टेजवर जातात . कीर्ती आणि तन्वी मिळून डान्स परफॉर्मन्स डिसकशन करतात .कीर्ती एकदम प्रोफेशनल डान्सर असल्यामुळे ती तन्वीला बऱ्याच गोष्टी समजावून सांगते.विनय स्नेहाजवळ येऊन बसतो . विनय : " अरे मी जर डान्स केला ना तर सगळ्यांचं फ्लॉप शो होईल ,म्हणून मी करत नाही कळलं ." स्नेहा : " तुला खरच एव्हडं भारी डान्स करता येतो ? मग तू का नाही करत डान्स? विनय : "किती भोळ ग माझं कोकरू ते ,अगं स्नेहा मला फकत गणपती डान्स येतो ग बाळा ,मी त्यांना मुद्दाम चिडवत होतो ." त्याच बोलणं ऐकून स्नेहा खूप हसते स्नेहा : " अरे मला वाटलं खरच येत असेल तुला ,म्हणून बोलले ,पण जर गणपती डान्स असेल तर नको करू मग तू . कीर्ती आणि तन्वी मिळून डान्स स्टेप्स फायनल करतात . तोपर्यंत स्नेहा आणि विनय एकदम गप्पांमध्ये रंगून गेलेले असतात.तन्वी स्नेहाकडे येते आणि चिडवण्यासाठी तिला बोलते तन्वी : " स्नेहा माझा आणि कीर्तीचा डान्स बसवून झालाय, तुमच्या गप्पा झाल्या असतील तर आपण निघूया का? विनय : " अरे किती वेळ लावता यार तुम्ही ,आम्हाला केवढ बोअर झालाय ,चला आता लवकर . " असं बोलून विनय त्याची बॅग घेण्यासाठी जातो तन्वी स्नेहाला चिडवते ," मला तर वाटत नाहीये कि तू बोअर झालिये म्हणून,थोडं अजून उशिरा यायला हवं होत का ग ? " स्नेहा : " काय ग तनु ,असं काही नाहीये उंगिच चिडवू नकोस निघुयात आपण नाहीतर उशीर होईल . दोघीपण घरी जातात .इकडे तन्वी तीच जेवण आणि सगळी काम आवरून तिच्या रूममध्ये येते ,ती तिचा मोबाईल घेऊन तिच्या आवडत्या बाल्कनीमधल्या झोक्यावर जाऊन बसते.. मानसच्या व्हाटसपवरून जाऊन " हाय मानस " असा मेसेज टाईप करते ,आणि परत डिलीट करते ,ती मनात विचार करते "असं एकदम कसा त्याला मेसेज करू ,त्याला काय वाटेल ? पण त्याची तब्येत कशी आहे हे पण विचारणं गरजेचं आहे .आधीच तो आजारी आहे कळल्यापासून मला करमतं नाहीये ,जाऊ दे करतेच मेसेज,असा विचार करून ती मेसेज टाईप करून सेंड करते.. इकडे मानस त्याचे फेव्हरेट सॉंग्स ऐकत असतो .मेसेजचं बीप वाजल्यामुळे तो चेक करतो ,पण अननोन नंबर बघून तो लक्ष देत नाही,पण त्याला अचानक विनयच बोलणं आठवत,आणि तो तन्वीचा मेसेज असेल अश्या आशेने रिप्लाय करतो ." हाय ,मे आय नो हुस नंबर इझ थिस?" त्याचा रिप्लाय बघून तन्वी खुश होती ." हाय इट्स तन्वी ,हाऊ आर यू ? मला विनय ने तुला बर नाही असं सांगितलं म्ह्णून मेसेज केला " तिचा रिप्लाय वाचून मानस बेडवरुन एकदम खाली उडी मारली ,तो एकदम खुश झाला,मनातल्यामनात विनयला थँक्स बोलला ,तन्वीचा मेसेज वाचून त्याचे हार्टबिट एकदम वाढतात ,," ओह हाय तन्वी ,आय एम ओके नाऊ ,थँक्स फॉर मेसेज ." इकडे त्याचा मेसेज बघून तन्वीचे पण हार्टबिट वाढतात ,एक अनामिक हुरहूर तिला जाणवू लागली.जुजबी बोलून दोघांनी पण एकमेकांना गुडनाईटचे मेसेज करतात . मानस आणि तन्वी खूपच खुश झाले दोघांच्या चेहऱयावर छान स्माईल आलेले असत आणि त्या आनंदात निद्रादेवीच्या कुशीत झोपून जातात

तळटीप : पहिल्यांदा प्रेमात पडतानाचा प्रवास हा खूप हळुवार असतो .एकमेकांविषयी वाटणारी ओढ पण नक्की काय होतय हे लक्षात येत नाही , आपली आवडती व्यक्ती थोडावेळ सुद्धा डोळ्याआड होऊ नये अशी इच्छा होते . मानस आणि तन्वीच्या प्रेमाचा प्रवास सुरु झालाय ...स्टोरी वाचून तुमच्याही पहिल्या प्रेमाच्या आठवणी ताज्या झाल्या असतील तर नक्की शेयर करा

तुमच्या F बरोबर कमेंट पण येऊ द्या . कमेंट वाचल्यावर लिहायला अजून उत्साह येतो .तुमचं प्रेम कमेंटमधून पण दिसून द्या ...

क्रमशः

माझ्यानावाशिवाय कृपया माझी कथा कुठेही शेयर करू नका .साहित्यचोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे ,असे करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ©वृषाली गावडे

🎭 Series Post

View all