हम-तुम भाग -13

hi

मानस आणि तन्वीने प्रेमाच्या जादुई दुनियेत प्रेमाचं पहिलं पाऊल टाकलेले असते .दुसऱ्यादिवशी येणारी सकाळ हि दोघांसाठी खूप प्रसन्न आणि प्रफुल्लित असते .. मानस नेहमीसारखा लवकर उठून फ्रेश होऊन त्याच्या आवडत्या जिममध्ये वर्कआउट करतो ,त्यानंतर तो त्याच्या आवडत्या गार्डन मध्ये जातो त्याच्या बंगलोच्या गार्डनमध्ये मस्त हिरवीगार झाडे सगळीकडे पसरलेली असतात , नुकत्याच पडून गेलेल्या पावसामुळे थोडास धुकं पडलेलं असत ,हिरव्या पानांवर पडलेले दवबिंदू एखाद्या हिऱ्यासारखे चमकत असतात, पक्ष्याचा किलबिलाट कानांना एकदम सुखद अनुभव देऊन जातो. नुकत्याच उमलल्या लाल गुलाबाच्या कळ्या पाहून त्याला तन्वीची आठवण येते, मस्त वातावरणात त्याचे मन खूप सुखावून जाते ,त्याला आजचा दिवस नेहमीपेक्षा एकदम वेगळा भासतो . गार्डेनमधून घरात येताना तो तन्वीच्या विचारांमध्ये असतो आणि त्याच मिसिंग झालेलं स्माईल परत त्याच्या चेहऱ्यावर आलेलं असत.त्याला असं हसताना बघून त्याच्या मॉमला खूप छान वाटत." गुड मॉर्निंग हॅण्डसम ,होप यू आर फिलिंग बेटर टुडे ,इट्स गुड टू सी युर क्युट स्माईल अगेन ." मानस त्याच्या मॉम ला मिठी मारून विश करतो " ओह गुड मॉर्निंग मॉम ,काल तुझ्या हातच्या भजी आणि कॉफि पिल्यानंतर लगेच माझी स्माईल परत आली .फीलिंग फ्रेश नाऊ.. " दयाट्स लाईक माय चॅम्प ,असाच हसत आणि खुश राहत जा रे ,काल मला तुझी खरच काळजी वाटत होती,चल लवकर आवरून घे ,परत कॉलेजला जायला उशीर होईल . " " ओके मॉम मी वरून येतो खाली ब्रेकफास्ट करायला ,मॉम तुला लेट होत असेल तर तू जा ऑफिस ला." ." यस बेटा ,आय नीड टू गो ,बाय." असं बोलून त्याची मॉम ऑफीसला निघून जाते. मानस त्याच्या रूममध्ये जातो आणि मस्त ब्लॅक टी-शर्ट आणि ब्लु जीन्स घालून रेडी होतो आणि त्याच्या बाईक वरून विनयला पिक करायला जातो,विनय त्याची वाट बघत खाली थांबलेला असतो.." आज काय स्पेशल आहे का? आज हिरो एकदम ह्रितिक रोशन सारखा दिसतोय यार.. " " काही नाही रे विनय सहजच जरा मूड चांगला होता म्हणून " विनय : " असं आहे तर ,म्हणजे काल तन्वीचा मेसेज आला वाटत तुला ?म्हणूनच तुझा मूड चांगला झालाय वाटत .. मी बोललो होतो तुला काल ,पण जाऊ दे माझ्यावर विश्वास नाही ना तुझा . " अरे असं नाहीये ,तू हि तो मेरा सचा यार है ." विनय : " एक विचारू मानस? तू खर सांगणार असशील तरच विचारतो . मानस: " बस का यार ,तुझ्याशी कशाला खोटं बोलणार मी ,एक काय दहा विचार मित्रा " विनय : " तू तन्वीच्या खरंच प्रेमात पडला आहेस ना भावड्या ? तुझ्या डोळ्यात दिसतंय ते .." विनयने एकदम विचारल्यामुळे तो जरा गडबडतो . मानस : " विनय यार मी तुझ्याशी कधीच खोटं बोलणार नाही ,पण मला माहित नाही नक्की प्रेम काय असत ते ,तन्वीला दुरून जरी पाहिलं तरी माझे हार्टबिट वाढतात , मला नेहमी तन्वी माझ्याजवळ असावी असं वाटत ,तीच हसण , रुसणं ,चिडणंपण मला खूप आवडत यार , तिच्या डोळ्यात पाहिलं तरी मला माझं अस्तित्व विसरायला होत ,तिच्या नशील्या डोळ्यामध्ये कैद व्हावं असं वाटत,कधी ती दिसली नाही तर मन बेचैन होत यार ,,जर तू ह्याला प्रेम म्हणत अशील तर मी आहे तिच्या प्रेमात ,,येस यु आर राईट ,आय रिऍली लव्ह हर “ ... विनय : " मग तू तन्वीला तुझ्या भावना का सांगत नाही यार ,आणि भावड्या तू तन्वीच्या प्रेमात पडला आहेस हे मला तुझ्याआधीच माहित आहे ,म्हणून तर काल तुझ्यासाठी मी तन्वीला तू आजारी असल्याच खोट सांगितलं आणि तुझा नंबर पण दिला ,आणि मला वाटत कि तन्वीपण तुझ्या प्रेमात पडलीये ,पण जस तुला जरा उशिरा कळलं तस तिला पण जरा वेळच लागेल बहुतेक " मानस: " विनय मला नाही वाटत तन्वीला असं काही वाटत असेल म्हणून,तू तिला बिलकुल काही नाही सांगणार मला प्रॉमिस कर ,तस पण तिला ऑलरेडी बॉयफ्रेंड आहे तिला, माझ्या प्रेमाबद्दल सांगून मला तिची मैत्री गमवायची नाही यार ." विनय : " अरे पण तिला बॉयफ्रेंड आहे हे तुला कोणी सांगितलं?" मानस : " तूच नाही का बोलला कि ती तिच्या बॉयफ्रेंडशी फोनवर बोलत होती म्हणून .. विनय : " यार सॉरी ते मी असच मुद्दाम बोललो होतो ,तू तिच्या प्रेमात आहेस हे त्याशिवाय तुला कळलं नसत म्हणून यार " मानस: " विन्या तू ना खरंच इम्पॉसिबल आहेस यार ,तुझ्या त्या बोलण्याने माझी किती बेक्कार अवस्था झाली होती माहितीये का तुला ... पूर्ण रात्रभर रडत होतो मी ,जेवलो सुद्धा नाही , पण यार थॅंक यु ,तुझ्या खोट बोलण्यामुळे मला खरचं मी प्रेमात पडल्याची जाणीव झाली यार " असं बोलून मानस विनयला मिठी मारतो .. " मानस पण जर तू तिला लवकर तुझ्या भावना तिला सांगितल्या नाहीस तर खरंच तिला कोणी दुसरच प्रपोझ करेन यार ." " विनय कधी तरी जरा चांगल बोलत जा रे भावा ,तू बोलतोय ते पटतंय मला ,पण यार तिला असं एकदम कस सांगू यार ,ती नाही बोलली तर ?" " मानस तू टेन्शन नको घेऊ ,तस पण मी तिच्या मोबाइल मध्ये ह्रितिकचा वॉलपेपर पाहिला ,म्हणजे तन्वीला ह्रितिक खूप आवडतो .और भाई आप क्या ह्रितिक से कम हो क्या ? आणि मी तुझ्याबद्दल तिच्या डोळ्यात खरंच प्रेम बघितलं यार ,तू एक दिवस नव्हता तर किती अस्वस्थ झाली होती ती " " विनय खरंच असेल का रे असं ,कि मला चांगल वाटाव म्हणून बोलतो आहेस ? " " अरे मानस खरच सांगतोय यार तुझी शप्पथ ,मी कशाला उगीच तुझ्याशी खोट बोलेल ,बर चल आता कॉलेजला तुझं बघून घे तुझ्या तन्वीच्या डोळ्यात म्हणजे तुला विश्वास बसेल .. दोघेपण कॉलेजला पोहचतात ,तन्वीची ऍक्टिवा पाहून मानसचे हृदय जोरात पळू लागत ,आणि त्याच्या चेहऱ्यावर क्युट स्माईल येत.. " मानस तूला तन्वीच्या डोळ्यात पाहायचं आहे ,तिच्या गाडीच्या डोळ्यात पाहून नाही कळणार ,काय तिच्या गाडीकडे बघून स्माईल करण चालू आहे ,चला लवकर .." मानस विनयचं बोलण ऐकून एकदम लाजतो आणि केसांमधून हाथ फिरवतो ..दोघे क्लासकडे जातात , आज मानसला नेहमीच कॉलेज एकदम वेगळं भासत ,कँटीनच्या जवळून जाताना त्याला तन्वी एका मुलाला मिठी मारताना दिसते ,ते पाहून त्याला खूप राग येतो ,डोळ्यात पाणी जमा होत,त्याच्या मुठी आवळतो आणि एकदम तन्वीकडे जायला निघतो तन्वीच लक्ष मानसकडे जात ती त्याला पाहून एकदम खुश होती ,ती त्याच्याकडे येणार इतक्यात तिच्या समोरून कीर्ती मानसकडे जाते,आणि त्याच्यावर चिडते ," काय यार मानस तू काल प्रॅक्टिसला का नाही आलास ? तुला बर वाटतंय ना ? मी तुला खूप मिस केलं यार असं बोलून ती त्याला एकदम मिठी मारते ... तन्वी ते पाहून खूप चिडते आणि रागाने तिथून निघून जाते ... मानसंच लक्ष तिच्याकडेच असत ,ती गेल्यानंतर त्याच्या लक्ष्यात येत कि कीर्तीने त्याला मिठी मारली ते ,तो तिला हळूच त्याच्यापासून दूर करतो आणि क्लासकडे निघून जातो .. विनय सगळा प्रकार बघून डोक्याला हाथ लावतो बोलतो .." ह्या दोघंच खरंच सगळं अवघड दिसतंय मला ,आता कुठे गाडी जरा रुळावर येत होती ...ह्या दोघांना एकत्र आणण्यासाठी विनय बाबा तुम्हाला जरा जास्त कष्ट घ्यावे लागणार आहेत असं दिसतंय ... असं बोलून विनय पण क्लासरूमकडे जातो .

क्रमशः

तळटीप : तन्वी कोणाला मिठी मारते? आणि आता मानस काय करेल ? दोघे एकेमकांना आपल्या भावना सांगतील का ? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर लवकर मिळतील

तुमच्या प्रतिक्रिया अवश्य कळवा ,जसे तुम्ही पार्टची वाट पाहता तशी मी तुमच्या कमेंटची वाट पाहत असते ,नक्की कळवा …. 

माझ्यानावाशिवाय कृपया माझी कथा कुठेही शेयर करू नका .साहित्यचोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे ,असे करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ©वृषाली गावडे

🎭 Series Post

View all