हम-तुम भाग -18

hi

आपण मागील भागात पाहिलं कि मानस कॉलेजच्या कामामुळे तन्वीला घरी पीकअप करायला येत नाही त्यामुळे तन्वी त्याच्यावर खूप चिडलेली असते ,आता पुढे तन्वीची झालेली चिडचिड स्नेहा आणि विनय दोघेही हळूच हसत असतात,आणि तन्वीच त्याच्याकडे लक्ष गेलं कि दोघे हि शांत होतात तिघेहि कॉलेजला पोहचतात,विनय त्याची कार पार्किंगमध्ये लावण्यासाठी जातो ,स्नेहा आणि तन्वी तिथेच त्याची वाट बघत थांबतात, स्नेहा :" तन्वी काय झालं ग? तुझा चेहरा का पडलाय ? मानस आला नाही म्हणून ना ? तन्वी : " कुठे माझा चेहरा पडलाय ,आणि हॅलो तो मानस आला नाहीं तर मला काय फरक पडणार आहे ,मला खरच काहीच फरक पडत नाहीये ओके .. इकडे विनय पार्किंगमध्ये जाऊन लगेच मानसला फोन करतो विनय: "कुठे आहेस यार ,ती तन्वी केव्हापासून तुला कॉल करतीये , जाम चिडलीये यार ती ,ज्वालामुखी फकत फुटायचा बाकी आहे मानस : " अरे आता सगळी काम झाली आहेत आणि मी आत्ता कॉल बघितला यार तिचा,आणि ती का बार चिडलीये ? विनय : " अरे यार ती किती भारी तयार झालीये तुझ्यासाठी ,आणि तू बावळट मला विचारतो आहेस कि ती का चिडलीये ते? तिला तू सगळ्यात पहिल्यांदा बघावं अशी इच्छा असें ना तिची ,सगळं सांगावं लागत यार तुला भावड्या जाऊ दे ,तू लवकर ये कँटीनच्या कॉर्नर ला ". मानस : " ओह्ह शीट यार मी तर ह्या सगळ्यमध्ये विसरूनच गेलो , थँक यु यार ,बर झालं तू कॉल केलास ,तु हि मेरा सच्चआ दोस्त है यार आलोच मी " विनय : " आभार प्रदर्शन नंतर कर ये पटकन " मानस लगेच ऑडिटोरियम मधून पळत कँटीनकडे जातो ,त्याला लांबून तन्वी दिसते ,इकडे विनय स्नेहाला कॉल करून काही तरी कारण सांगून पार्किंग मध्ये बोलवून घेतो,मानस तन्वीजवळ पोहचतो ,तिच्याकडे पाहतो ,आणि तो एकदम बोल्ड होतो ,त्याने तन्वीला कधीच वेस्टर्न ऑउटफिटमध्ये पाहिलेलं नसत ,तिचा ब्लॅक कलरचा नी लेन्थ वनपीस,त्यामधून दिसणारा तिचा कमनीय बांधा ,हवेने उडणाऱ्या तिच्या बटा,डार्क आयशॅडोमुळे तिचे बोलके डोळे एकदमच कातिल दिसत असतात ,डार्क ब्राउन कलरच्या लिपस्टिकमध्ये तिचे ओठ ,खुप जास्त मादक दिसत असतात,जणू ते त्याला टिपण्यासाठी आतुर झाले असं त्याला भासते. तन्वीचे मानसकडे बिलकुल लक्ष नसते ,ती फोनवर मानसचा काही मेसेज आला कि नाही ते चेक करत असते नंतर तन्वी गाडीशेजारी त्याच्याकडे पाठ करून उभी असते ,मानसचे हृदय त्याच्या श्वासापेक्षा डबल स्पीडने धावत असते ,त्याची नजर तिच्या डीपनेक मधून दिसणाऱ्या गोऱ्या पाठीवर जाते,त्याला तिला स्पर्श करण्याचा मोह होतो ,पण तो स्वतःला सावरतो तो जवळ जाणार इतक्यात तन्वी वळते ,आणि हाय हिल्स घातल्यामुळे तिचा तोल जातो ,मानस पटकन तिचा हाथ पकडतो आणि तिला सावरतो,तो तिला पाहून तर एकदम मंत्रमुगध होतो ,त्याला वोईलॅन वाजल्याचा भास होतो ,त्याच्या बोटांचा स्पर्श तिच्या कोमल अश्या उघड्या पाठीवर होतो ,त्याच्या स्पर्शाने ती मोहरून जाते ,त्याने मारलेल्या जॅकोब बोगार्डच्या परफूमच्या सुगंधात ती स्वतःला विसरून जाते आणि ती मानसकडे एकटक बघत राहते ,आज मानस नेहमीपेक्षा खूप जास्त हॅण्डसम दिसत असतो,जेलने सेट केलेले केस त्याला शोभून दिसतात आज त्याने क्लीन शेव केल्यामुळे त्याचा चेहरा अजूनच खुलून दिसतो, मानसने ब्लॅक कलरची जीन्स ,त्यावर मरून कलरचा वी नेकचा टी - शर्ट घातलेला असतो ,त्याला मॅचीग असा व्हॅन हुसेनचा ब्लॅक आणि रेड कलरचा कॅज्वेल असं ब्लेझर,पायामधे ब्लॅक कलरचे फॉर्मल शूज ,हातामधे असलेलं फॉसिलच ब्लॅक कलरच घड्याळ त्याच्या श्रीमंतीचं प्रमाण देत असतात, आज तन्वी त्याला खूप जवळून पाहत असते ,तिचे हृदय मानसच्या हृदयापेक्षा जास्त जोरात धावत असत , त्याच्या कातिल नजरेमध्ये तीला प्रेम दिसत ,आज खर तर तन्वीची विकेट पडलेली असते,मानसला मिठी मारण्याची तिला खूप जास्त इच्छा होते ,पण ती तस नाही करत. मानस तिच्या आणखीन जवळ जातो ,तिच्या गालाजवळ ,त्याचा गाल असतो ,तो अजून जवळ येतो ,त्याच्या गालाला येणारा बॉडी शॉप च्या अर्बेर आफ्टर शेवचा सुगंध तिला अजून बेचैन करतो .ती तिचे डोळे बंद करते ,मानस अजून पुढे जातो आणि तिच्या कमरेखालुन हाथवर नेत तिची बॅकनेकची निघालेली झिप नीट करतो ,आणि तिच्या कानात म्हणतो " यु आर मोस्ट ब्युटीफुल गर्ल इन होल वर्ल्ड ,लुकिंग गॉर्जस स्वीटी” कानाजवळ आल्यामुळे त्याचे उष्णश्वास तिला जाणवतात, आणि पोटामध्ये खूप सारी फुलपाखरे उडाल्याचा तिला भास होतो, मानसने निघालेली झिप लावताच ती एकदम डोळे उघडते, तिचे हार्टबिट एवढे वाढलेले असतात कि ते मानसला ऐकू जातात ,तिला काहीच सुचत नाही आणि परत त्याच्या डोळ्यात हरवून जाते ,ती एकटक त्याच्याकडे बघत असते ,तिची अजून मज्जा घेण्यासाठी तो तिच्या कानाजवळ बोलतो “तू जर तुझ्या कातिल नजरेने मला पाहत राहिलीस तर तर मला स्वतःला सावरणं कठीण होऊन जाईल "त्याच्या ह्या बोलण्याने ती भानावर येते आणि लाजेनेच गोरीमोरी होते, त्याच्यापासून थोडी दूर होते ,मानस तिचा उडालेला गोंधळ पाहून हळूच हसतो ,इतक्यात विनय आणि स्नेहा तिथे पोहचतात,मानसला पाहून स्नेहा बोलते ."" मानस तू कधी आलास ,अरे पार्किंगमध्ये गाडी लावायला जागाच मिळत नव्हती ,खूप शोधल्यावर मग एक मिळाली ,त्यातच वेळ झाला ,बर झाल तू आलास ,तन्वीला तुझी कंपनी मिळाली ." मानस थोडास हसून स्नेहाला मुद्दाम बोलतो ,मानस: " स्नेहा पण मला वाटतय कि तन्वीला माझी कंपनी आवडलेली दिसत नाहीये ,बघ ना काही बोलतच नाहीये आल्यापासून , तन्वी : " मी कुठे असं बोलले कि मला त्याची कंपनी आवडली नाही ते ? " तन्वी असं बोलल्यावर मानस एकदम खट्याळपणे हसत तिच्याकडे बघतो ,तिच्या लक्षात येत कि तो मुद्दाम असं बोलतोय ,ती विषय बदलण्यासाठी बोलते तन्वी : " अरे चला आपण जाऊयात ,उगीच उशीर होईल " सगळे ऑडिटोरियमकडे जायला निघतात,,तन्वी हळूच चोरून मानसकडे पाहते ,तो तिच्याकडेच पाहत एक भुवई उंचावतो खट्याळपणे हसत तिच्याकडे बघतो ,तशी ती परत लाजते आणि स्नेहाकडे बघून गप्पा मारते ,

तळटीप : फ्रेशर पार्टीसाठी नेक्स्ट पार्ट मध्ये भेटू .तुमचा काही फ्रेशर पार्टीच्या काही आठवणी असतील तर नक्की कळवा..तुमच्या कमेंटची वाट पाहते ,लवकर भेटू परत .....sayo nara ....

🎭 Series Post

View all