हम-तुम भाग -8

hi

हम-तुम भाग 8

तन्वी आणि स्नेहा दोघांना कॉलेजमध्ये सगळीकडे शोधतात पण ते दोघे दिसत नाही ,मग त्या दोघी क्लासमध्ये लेक्चर अटेन्ड करायला जातात.पूर्ण दिवसभर ते भेटत नाहीत. लेक्चर झाल्यावर त्या कँटीनमध्ये येतात आणि कॉफी घेत टाईमपास करत असतात . इकडॆ मानस आणि विनय ,त्याचे फ्रेंड्स पार्टीसाठी तयारी करत असतात ,त्यांना खूप जास्त काम असतात ,फ्रेशर पार्टी साठी डेकॉरेशन , गेम्स ,टास्क ,ऍक्टिव्हिटी ,परफॉर्मन्स प्लॅन करत असतात.ऑडिटोरियम च्या स्टेजवर सगळी टीम बसलेली असते ,एका बाजूला सगळे पेपर्स पडलेले असतात आणि त्याच्या मध्ये मानस बसलेला असतो,कॉलेजचा Gs असल्यामुळे त्याच्यावर सगळी जबाबदारी असते.सगळे खूप थकलेले असतात ,विनय सगळ्यांना खाण्यासाठी स्नॅक्स आणि कॉफीची ऑर्डर द्यायला कँटीनमध्ये जातो ,स्नेहा विनयला पाहते आणि जोरात आवाज देते ,कँटीनमधले सगळे तिच्याकडे बघतात ,तिला लक्षात येत तशी ती जीभ चावून सॉरी बोलते . विनय मुलीचा इतका जोरात आवाज ऐकून जरा दचकतो आणि मागे वळून पाहतो ,कालचा तन्वीचा राग आठवून आणि दोघीना बघून जरा घाबरतो ,त्याला वाटत कि गाडीचं हवा प्रकरण त्यांना कळलं .तो दोघी कडे जरा घाबरत जातो."हाय मी तुम्हाला कालच सॉरी बोलणार होतो पण ."इतक्यात तन्वी त्याला बोलते ." सकाळपासून तुम्हाला शोधतोय आम्ही ,कुठे गायब झालाय तुम्ही दोघेपण ? "आणि तुम्ही आम्हला कशाला सॉरी बोलताय ,खर तर मलाच मानसला सॉरी बोलायचं कालसाठी,पण आज सकाळपासून तो मला दिसलाच नाहीये,मानस आला नाहीये का कॉलेजला? आणि विनय तुम्हालापण थँक्यू बोलायचं होत ,आज सकाळी पण तुम्ही मेकॅनिकला बोलवून माझ्या गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व केलात ,रिऍली थँक्यू सो मंच विनय जरा सुटकेचा निःश्वास सोडतो ."ओह्ह तुम्ही ह्या साठी मला इतक्या जोरात आवज दिला का? हूश वाचलो मी . “..तन्वीला विनयचं बोलणं काळत नाही ती जरा गोंधळून जाते "एक मिनिट विनय तुम्ही काय बोलला आत्ता ,वाचलो ? मला जरा नीट ऐकू आलं नाही. स्नेहा लगेच उठते आणि विनयकडे जाते. "तन्वी ,जाऊ दे ना मुद्याचं बोलू आपण,विनय आम्हाला दोघीना पण तुम्हाला आणि मानसचे आभार मानायचे होते ,काल तुम्ही आमची खूप मदत केलीत," "स्नेहा त्यात काय एवढ ? थँक्यूची काही गरज नाही इट्स माय प्लेझर गर्ल्स ,नो नीड तो से थँक्यू . ऐसे बडे बडे कॉलेज में छोटी छोटी तो भी हेल्प करणी चाहिये राईट सेनोरितां ओह सॉरी तन्वी अँड स्नेहा..तन्वी त्याच्या हातावर कॅडबरी ठेवते आणि विनयला बोलते "अहो विनय पण आम्हाला खरच मनापासून आभार मानायचे आहेत ,त्यासाठी मी टोकन ऑफ थँक्स म्हणून कॅडबरी आणली आहे दोघांसाठी ." तन्वी असं बोलल्यावर विनय पण कॅडबरी घेतो." असं असेल तर व्वा आवडेल मला घ्यायला,वैसे भी किसी ने कहा है ,कभी कॅडबरी को ना नही बोलते नही तो पाप लगता है ." स्नेहाला कळत नाही ती त्याला इनोसेंट्ली विचारते "हो का ,पण कोणी सांगितलं असं ? " विनय एकदम हसतो आणि स्नेहाला बोलतो "ऐसे बाबा विनय ने कहा है बालिके ." स्नेहा त्याच्या उत्तरावर एकदम खुद्कन हसते . विनय दोन्ही कॅडबरी घेतो " ठीक आहे द्या तुम्ही मला कॅडबरी मी देईल मानसला . " तन्वी एकच कॅडबरी देते आणि दुसरी स्वतःकडे ठेवते ."नाही नको ,मानसची कॅडबरी मला स्वतः त्याला द्यायची आहे ,actually मला त्याला कालसाठी सॉरी पण बोलायचं ,मी त्याच्याशी खूप रूडली बोलले , मला खूपच गिल्टी फील होतंय . विनय सगळं ऐकून मनातून एकदम खुश होतो ."ठीक आहे तन्वी ,स्नेहा तुम्ही माझ्याबरोबर चला ,मी तुम्हाला त्याच्याकडे घेऊन जातो . विनय कँटीनमध्ये सगळ्याची ऑर्डर देतो आणि त्यांना घेऊन ऑडिटोरियम मध्ये जातो . मानसच काम बऱ्यापैकी झालेले असते म्हणून तो जरा फ्रेश होण्यासाठी त्याच्या परफॉमन्सची प्रॅक्टिस करत असतो .स्टेजवर सेंट्रलला एक चेअर ठेवली असते ,आणि त्यावर मानस त्याची गिटार घेऊन गाणं म्हणत असतो .

"पहली नज़र में कैसा जादू कर दिया

तेरा बन बैठा है मेरा जिया

जाने क्या होगा क्या होगा क्या पता

इस पल को मिलकेआ जी ले ज़रा

मैं हूँ यहाँ तू है यहाँ मेरी बाँहों में आ आ भी जा

ओ जाने-जाँ दोनों जहाँमेरी बाँहों में आ भूल जा

Baby I love you Baby I love you so much Baby I love you."

मानस मन लावून गाणं म्हणत असतो त्याचा आवाज पण एकदम आतिफ अस्लम सारखा असतो ,त्याचे डोळे बंद असतात . तिघेपण ऑडिटेरियम मध्ये येतात तन्वी त्याच गाणं ऐकून एकदम शॉक होते ,त्याला इतकं सुदर गाताना ऐकून त्याच्या गाण्यामध्ये एकदम मंत्रमुग्ध होते ,ती त्याच्याकडे एकटक बघत असते ,मानसच गाणं पूर्ण झाल्यावर त्याचे सगळे फ्रेंड्स टाळ्या वाजतात ,त्यांचा आवज ऐकून तन्वी एकदम भानावर येते . स्नेहा आणि विनय तिला असं बघून एकदम हसतात ,मानसचं लक्ष त्यांच्याकडे जात ,विनय त्याला आवाज देतो आणि इकडे बोलवतो . मानस उठून गिटार बाजूला ठेवतो आणि त्यांच्याजवळ येतो .."तुम्ही बोला मी स्नेहाला सगळ्यांची ओळख करून देतो .आलोच आम्ही विनय त्यांना बोलायला मीळावं म्हणून स्नेहाला घेऊन त्यांच्या ग्रुपकडे जातो. तन्वीला पाहून मानसचे हार्टबिट वाढलेले असतात ,तन्वीला त्याला पाहून काहीच सुचेनासं होत . दोघे एकाचवेळेस बोलल्यामुळे अजूनच गोंधळ होतो .. मानस तन्वी ला हातानेच बोलला थांब तू आधी बोल. " हॅलो मानस मला तुम्हाला काल घडलेल्या प्रकाराबद्दल तुमची माफी मागायची होती ,मी तुम्हाला विनाकारण रूडली बोलायला नको होत ,मला खरंच खूप गिल्टी फील होतंय कालपासून ,आयम रिऍली व्हेरी सॉरी फॉर एव्हरीथिंग,होप यु फर्गिव्ह मी ."तन्वीला असं कान पकडून सॉरी बोलताना पाहून मानसला थोडंसं हसू येतं . तो मनात विचार करतो किती गोड आणि निरागस आहे हि ."अहो लवकर हो बोला ना माझे हाथ आणि कान दोन्ही पण दुखायला लागलेत,तिच्या बोलण्याने तो अजून हसतो "अहो तन्वी तुम्ही कशाला सॉरी बोलताय ,गैरसमजामुळे होत असं कधी कधी. इट्स ओके .. मला तुमचा राग नाही आलाय ,आणि येऊपण नाही शकत ." " म्हणजे मी नाही समजले ,असं कस मी चूक केलीये तर तुम्ही मला शिक्षा करा हवं तर पण माझं सॉरी तुम्हाला एक्सेप्ट करावंच लागेल.. "ओके ओके ,मी केलं तुम्हाला माफ मग तर झालं ". "थँक्यू तुम्ही खरंच खूप चांगले आहात .पण मला हे काळात नाहीये कि माझ्या गाडीवर जे लेटर ठेवलं त्यात तुमचं नाव होत ,म्हणून मला वाटलं कि तुम्हीच मुद्दामुन माझ्या गाडीच्या टायरमधली हवा काढली ,म्हणून मी तुमच्यावर चिडले . तन्वीच्या चिडण्याच कोडं आता मानसच्या लक्षात येतं आणि तो विनयकडे पाहतो ,तर विनय तिकडे त्याला हाथ जोडून विनंती करतो तन्वी ला नको सांगू म्हणून . "ओह्ह आता माझ्या लक्षात आलं ,जाऊ दे तुम्ही सोडून द्या विषय आता ." " हो मानस तुम्ही बरोबर बोलताय मी सोडून देते विषय ,पण ज्याने पण कोणी केलं ना त्याला शोधून कडेन मी बघा तुम्ही , अरे अजून एक ,हे घ्या चॉकलेट मी तुमच्यासाठी आणलं होत ,टोकन ऑफ थँक्स म्हणून " मानस तन्वीच्या हातातून कॅडबरी घेतो आणि तिला बोलतो "सो स्वीट ऑफ यु ,मला तुम्ही एकेरी नावाने बोलवलं तरी चालेल " असं बोलून मानस मैत्रीसाठी हात पुढे करतो " फ्रेंड्स ?" तन्वी खुश होते आणि ती पण मैत्रीसाठी हात मिळवते " ओह मला तर आवडेल तुमच्याशी मैत्री करायला ,पण तुम्ही पण मला मिस तन्वी च्या ऐवजी फकत तन्वी बोला ,पण तुम्ही तर आम्हाला सिनियर आहात ना, मग सगळ्या सिनिअरसला तर आम्ही सर किंवा अहो असे बोलतो ,मग तुम्हाला पण मला सर बोलवावं लागेल ना ?" इकडे मानसची तर विकेट पडलेली असते त्याच तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं ,तो तिच्या डोळ्यमध्ये हरवलेला असतो ,तिचा पहिला स्पर्श अनुभवत असतो . तन्वी चुटकी वाजवते आणि त्याला नजरेने तिचा पकडलेला हाथ दाखवते .मानस भानावर येतो आणि पटकन तीचा हाथ सोडतो " सॉरी ते जरा माझं लक्ष नव्हतं ,पण तन्वी मला असं सर वैगैरे बोललेलं काही आवडत नाही ,तू मला मानस असं बोलव ,मला काहीच प्रॉब्लेम नाही ओके . "ओके सर मी तुम्हाला आता नेहमी मानस सर बोलेल."अरे यार परत सर ?" दोघे पण एकदम हसतात "ओह सॉरी जरा वेळ लागेल मला तुला मानस म्हणायला ओके ",तेव्हड्यात स्नेहा आणि विनय त्याच्याकडे येतातं .मानस विनय ला सांगतो "विनय एक काम कर ,तन्वीच्या गाडीवर लेटर कोणी ठेवलं ,आणि तिच्या गाडीची हवापण कोणी काढली जरा शोध घे बरं . " तेव्हड्यात स्नेहा मानसला बोलते ."जाऊ द्या सर ,तसं पण त्यांनी सकाळी मेकॅनिकला बोलवून गाडीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय आमचा ,त्या गाडीवरून केवढ महाभारत झालय तेवढ पुरे आता ." लगेच विनय बोलतो " एकदम बरोबर आहे स्नेहाचं, कोणी तरी चुकून केलं असेल ,जाऊ द्या नकोच तो विषय ,मॅटर क्लोज्ड ." मानस विनयच्या बोलण्यामुळे त्याच्याकडे बघून हसतो ,तेव्हड्यात कँटीनमधला मुलगा सगळ्यांसाठी ऑर्डर केलेले स्नॅक्स आणि कॉफी घेऊन येतो . तन्वी आणि स्नेहा क्लासरूमकडे जायला निघतात ,पण विनय त्यांना थांबून घेतो आणि स्नॅक्स ऑफर करतो . मानस तन्वीच्या शेजारी बसलेला असतो ,सगळे गप्पा मारत स्नॅक्स खाऊन घेतात ,सामोसा खाताना तन्वीला एकदम ठसका लागतो ,मानस लगेच पटकन उठून त्याच्या बॅगमधली पाण्याची बॉटल तिला देतो . सगळे मानसची धावपळ पाहून सगळ्यांना मानस तन्वी च्या प्रेमात पडला कि काय अशी शंका येते .

तळटीप :तुमच्या next part बरोबर कमेंट पण येऊ द्या . कमेंट वाचल्यावर लिहायला अजून उत्साह येतो .तुमचं प्रेम कमेंटमधून पण दिसून द्या ...तुमच्या अपेक्षा कळवा, चला मग पटापट कमेंट करा ,तुमचं कथेवरील प्रेम कमेंटमधून दिसू द्यात ,,तुमच्या सगळ्यात जास्त आवडत्या कमेंट म्हणजेच नेक्स्ट पार्ट कधी ह्याच उत्तर 10 july ....

माझ्यानावाशिवाय कृपया माझी कथा कुठेही शेयर करू नका .साहित्यचोरी करणे हा कायद्याने गुन्हा आहे ,असे करताना कोणी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल ©वृषाली गावडे

स्टे होम & स्टे सेफ

🎭 Series Post

View all