Login

माणुसकीचे लक्षणं!

माणुसकीचे लक्षण !
*शीर्षक -माणुसकीचे लक्षण!*

चुकीचे शब्द करतात
हृदयावर मोठा वार
थोडासा विचार करून
अशी वृत्ती करा हद्दपार

अहंकार वृत्तीमुळेच
होतो विनाश फार
समजूतदारपणाचा
घाला गळ्यात हार

दुसऱ्याला उगाच हिणवणे
काम नाही हे मनुजा बरे
आपुलकीचा मनी भाव
हे माणुसकीचे लक्षण खरे

स्वतःवरचा संयम
ठेवावा जरा थोडा
वाईट बोलण्याचे कर्म
चांगल्यासाठी साऱ्यांनी सोडा

© विद्या कुंभार

सदर कवितेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.


🎭 Series Post

View all