Login

माणुसकी त्या दिवंगत आत्म्याची

The Man With Great Heart
माणुसकी म्हणलं की माझ्या समोर येतो माझा भाऊ..
आणि करोना काळातील त्याने केलेला संघर्ष दुसऱ्यांसाठी..ही सत्य घटना आहे माझ्या भावाच्या आयुष्याची पहिल्या करोना लहरीत निस्वार्थ पाने त्याने केलेल्या सेवेची..
आणि दुर्दैव त्याचे दुसऱ्या करोना लाटेत याच कोरोना मुळे अवघ्या पाच दिवसात त्याला आपला जीव गमवावा लागला.खूपदा वाटत मनाला की त्याची ती माणुसकी ती पुण्याई का कुठे आडवी आली नाही?
कारण त्याचे कर्तुत्व आणि निस्वार्थ पण पाहता ज्या प्रकारे झटपट तो सोडून गेला एखाद्या भयानक स्वप्ना प्रमाणे वाटते.
त्याच्या आठवणीत आणि त्याला श्रद्धांजली म्हणून ही त्याची माणुसकी गाथा..
माझा भाऊ अमोल..आयुष्याचे खाच खळगे झेलत त्याने आयुष्य खूप मोठ्या पदावर आणले.लातूरच्या नामांकित लोकांपैकी तो एक.मनामध्ये नेहमी परोपकारी भावना असायची त्याला नेहमी वाटायचं फक्त मदती अभावी कोणचे शिक्षण किंवा मेडिकल ट्रीटमेंट राहू नये.तो सतत प्रयत्न करायचा गरजू लोकांना मदत करायचा.
आणि त्याची ती माणुसकी अजून प्रबळ झाली कोरोना काळात.लातूर मध्ये मोती नगर एरियात पहिला कोरोना पेशंट आढळला.लागोपाठ त्या घरातील सहा लोक पोझिटिव निघाले.पूर्ण घराला बंद करण्यात आले त्या एरियात संचारबंदी केली.आवकजावक बंद करून फक्त नित्य उपयोगी वस्तूंचा पुरवठा चालू केला.पण परिस्थिती अशी की त्या लोकांना कोणी पाणी ही द्यायला तयार नव्हते.कोरोनाची दहशत तशीच होती.माझ्या भावाला जेंव्हा कळाले क्षणाचाही विलंब न करता तो घटना स्थळी पोहचला.त्या पूर्ण कुटुंबाला पाणी, नाश्ता आणि चादर पुरविली. आंबुलेन्स मधून त्यांना घेऊन जाताना दवाखान्यात भरती करे पर्यंत त्यांचा सोबत तो होता.त्यांचे सख्ये नातेवाईकही कोणी भीतीने यायला तयार नव्हते.पण माझा दिलदार भाऊ कशाचीही परवा न करता फक्त माणुसकीच्या नात्याने तो मदत करत राहिला.
हळू हळू कोरोना चांगलाच फोफावला.सगळीकडे लॉकडाऊन सुरू झाले.कित्येक गरीब मजदुर लोक जे डेली कमवून खायचे त्यांची अपदा होऊ लागली.दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत होवु लागली.मग माझ्या भैयाने लातूर मोबाईल किचन नावाची सुविधा उपलब्ध केली.ज्यामध्ये सर्व गरीब व गरजू लोकांना पोळी भाजी आणि वरणं भात असा सकस आहार लोकडाऊन मध्ये उपलब्ध करून दिला.जवळजवळ 3 महिने विना रुकावट त्याने हे काम चालू ठेवले स्वखर्चातून.
सोबत जे लोक एका गावातून दुसऱ्या गावात चालले होते किंवा जे लोक विद्यार्थी पोटापाण्यासाठी किंवा शिक्षणासाठी लातूर मध्ये होते आणि आता लातूरहून आपल्या गावी परत जात होते त्यांच्यासाठी सुध्या बस स्टँड वर डब्बा उपलब्ध करून दिला.रोजगार अभावी रिकाम्या खिशाने जाणाऱ्यांना महिना भराच राशन पाणी दिले. 15किलो पीठ ,तांदूळ ,डाळ अजून थोडे किराणा असा किटच बनवून दिला.
न जाणे किती कुटुंब त्याने त्या काळात पोसले विना कोणत्या नावाचे आणि प्रसिद्धीचे.
रात्री अपरात्री जावून कोरोना पीडित लोकांची व त्यांच्या परिवारची होईल तेवढी मदत तो करायचं उद्देश एकच माणुसकीची ओढ.
हा झाला कोरोना पहिल्या लाटेत त्याने केलेल्या कामाचा आढावा.
दुसऱ्या लाटेत तर त्याने जनजागृतीचे डॉक्टरांच्या मदतीने लातूर व लातूर जिल्ह्याच्या आसपास खेड्यामधून कॅम्प राबवले. सनिटायझर आणि मास्क मोफत वाटप केले.
एवढेच नाही तर ज्यांना रेमिटायझर किंवा अजून त्या रेलेटेड वैदकिय मदत लागेल तिथे पुरवठा केला.अगदी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणा 22 एप्रिल 2021आणि 23एप्रिल 2021या दोन दिवस त्याने लातूर मध्ये vaccination ड्राईव्ह  अरेंज केला फ्री ऑफ कॉस्ट.मोफत जवळजवळ 500हून अधिक लोकांनी फ्री लसीकरण घेतले.
त्याचे दुर्दैव 25 त्याला ताप खूप आली आणि तो अडमिट झाला .25 एप्रिल 2021 ते 1 मे 2021खूप लढला तो या कोरोनाशी.ते पाच दिवस माझ्या वहिनी आणि मुलांसाठी नरक यातने इतके कठीण गेले.1 मे ला माणुसकीचा तो अखंड झरा कायमचा निरोप घेऊन दूर निघून गेला.सगळ्यांना पोरक करून ..
त्याची माणुसकी शब्दात सांगता येणार नाही आई वडील नसताना काय यातना होतात त्याने सहन केल्या म्हणून तो सर्वांना नेहमी प्रेम देत गेला.त्याची माणुसकी आज त्याच्या कुटुंबाला देणार कोणी तरी हवं.त्याची दोन लहान मूल आणि वहिनी एवढाच काय त्याचा संसार.आणि आम्ही दोघी लहान बहिणी.आज तो फक्त स्वतः साठी जगाला असता तर कदाचीत तो फक्त जगाला असता पण आज त्याच्या माणुसकीने सगळ्याच्या मनात तो जिवंत आहे.मला अभिमान आहे माझ्या भावाचा आणि त्याच्या त्या माणुसकीने भरलेल्या जीवनाचा.

तू दूर गेलास सोडून आठवण तुझी मनात आहे..
तुझे अस्तित्व तुझ्या कार्यात नेहमीच पाहत आहे..
तू अनमोल हीरा होता नेहमीच राहशील..
कारण नावा प्रमाणेच तू अमोल आहे आणि तुझ्या 
नावाची माणुसकी आज ही जगात आहे.
0

🎭 Series Post

View all