वैष्णवी... तुझ्या नावातचं आई जगत्माता वास करत होती गं. मग का ओळखू शकली नाहीस वेळीच तुझ्यातल्या स्त्री शक्तीला? असं टोकाचं पाऊल उचलण्याआधी का नाही लढलीस स्वतः साठी? त्या नराधमाने ज्यावेळी पहिल्यांदा तुझ्यावर हात उचलला होता त्याचं वेळी का परतवला नाहीस त्याचा वार?
ठाऊक आहे गं बायका सोसत राहतात... कित्येक जखमा भळभळत्या ठेवून काहींचं झालं नाही असं वर वर दाखवत राहतात पण तुझी परिस्थिती त्यातली मुळी नव्हतीचं गं. लढायला हवं होतंस तू. तुझ्यासाठी नाही तर किमान तुझ्या चिमण्या बाळासाठी आज तू जिवंत असायला हवी होतीस.
त्या तान्हुल्याचा आक्रोश होत असेल गं तुझ्यासाठी. गाय जशी वासरू हरवलं तर सैरभर होते तशी तुझी आई तुझ्यासाठी झुरतेय गं वैष्णवी. डोळ्यातलं पाणी खळलं नाही त्या माऊलीच्या. ते नराधम मुक्त आहेत आज तू त्यांची शिकार होतीस उद्या दुसरी कोणी असेल. हे नाही तर अशी कित्येक कुटुंब आजही कोण्या बापाच्या पोटच्या लाडक्या गोळ्याला त्रास देऊन रोज जिवंतपणी मरणयातना देतायत. त्यांना धडा शिकवायला म्हणून तरी तू जगायला हवं होतंस.
सिंधू ताई सपकाळ ह्यांचा आदर्श आपल्या समाजासमोर आहे. त्यांनी किती अवघड परिस्थितून स्वतःला सावरून समाजासाठी मौल्यवान कार्य केलं आहे त्यांचा आदर्श घेऊन जरा हिंमत दाखवायला हवी होतीस. वैष्णवी तू आज हवी होतीस.
हुंडाबळी आज काही आपल्या समाजासाठी नवं नाही. ह्या गंभीर समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून सरकारनेही कडक हुंडाबंदी जाहीर केलेली आहे पण आपल्याचं आजूबाजूचे काही लोक त्यांच्यातल्या निर्दयतेला खतपाणी देऊन आजही ही घाणेरडी प्रथा समाजात रूढ करू पाहत आहेत. त्यांना आता मुळापासून समूळ नष्ट करायची वेळ आली आहे.
आई बापानं दिलं लग्न मनासारखं करून
सुरुवातीचे दिवस गेले पिसापरी अलगद उडून....
मिळालं मोठ्ठं घर पण पोकळ त्याचे वासे
पावलागणिक नव्हती फुलं होते केवळ बोचरे काटे....
सुरुवातीचे दिवस गेले पिसापरी अलगद उडून....
मिळालं मोठ्ठं घर पण पोकळ त्याचे वासे
पावलागणिक नव्हती फुलं होते केवळ बोचरे काटे....
लग्नाच्या वेदीवर नव्हती आनंदाची झालर
होती नजरेत फक्त त्याच्या पैशाची भूक जबर.....
फक्त होत्या मागण्या अनेक
पुरवताना सावलीसारखी हरवून गेली त्यात कोवळी लेक.....
होती नजरेत फक्त त्याच्या पैशाची भूक जबर.....
फक्त होत्या मागण्या अनेक
पुरवताना सावलीसारखी हरवून गेली त्यात कोवळी लेक.....
जात होती होरपळून आगीत रोज ती
हसणं बोलणं विसरून मारहाण सोसत होती.....
कधी दागिन्यांची मागणी तर कधी पैशाची
सगळं देऊनही शेवटी झोळी रिकामी लेकीच्या बापाची….
हसणं बोलणं विसरून मारहाण सोसत होती.....
कधी दागिन्यांची मागणी तर कधी पैशाची
सगळं देऊनही शेवटी झोळी रिकामी लेकीच्या बापाची….
सून नाही तर केवळ ATM मशीन होती ती
हसऱ्या चेहऱ्यामागे तिच्या वेदना लपलेली....
ती गेली शेवटी अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून
काय होतं कमी म्हणून तिच्या आईबापाचं सर्वस्व घेतलं ओरबाडून….
हसऱ्या चेहऱ्यामागे तिच्या वेदना लपलेली....
ती गेली शेवटी अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवून
काय होतं कमी म्हणून तिच्या आईबापाचं सर्वस्व घेतलं ओरबाडून….
भावपूर्ण श्रद्धांजली वैष्णवी. तू जिथे असशील तिथे आता शांत हो. तुझा छळ करणाऱ्या परिवाराला न्यायदेवता नक्कीचं दंड देईल विश्वास ठेव.
©️®️सायली पराड कुलकर्णी
©️®️सायली पराड कुलकर्णी
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा