Login

शिकारी... भाग ८

विशाल दारातून आत गेला आणि बघतच राहिला. इतके विकृत, क्रूर दृश्य त्याने बघितले नव्हते. हळू हळू तो संपूर्ण हॉल मध्ये नजर फिरवत होता.


मागील भागात आपण बघितले…


"हॅलो, माने काय झालं?" विशाल बोलला.


"साहेब तुम्ही, तुम्ही इथे लवकर या." माने घाबरत बोलला.


"माने काय झालं सांगा." विशाल


"साहेब तुम्ही या. कळेलच तुम्हाला. लवकर या साहेब. इथे खूप मोठा प्रोब्लेम झाला आहे." माने प्रज्ञा च्या घरून बोलत होता.


आता पुढे…


"साहेब या आत लवकर." माने विशाल ची गाडी बघताच त्याच्या जवळ धावत गेला.

प्रज्ञाच्या घरा समोर गर्दी जमा झाली होती.

विशाल दारातून आत गेला आणि बघतच राहिला. इतके विकृत, क्रूर दृश्य त्याने बघितले नव्हते. हळू हळू तो संपूर्ण हॉल मध्ये नजर फिरवत होता.


सगळी कडे रक्त सांडले होते. डायनिंग टेबल जवळ प्रज्ञा च्या वडिलांचा मृतदेह पडलेला होता. त्यांच्या शरीरावर असंख्य वार होते. विशाल हळू हळू आत जात होता. आतल्या बेड वर प्रज्ञाच्या आईचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. तिथेच बाजूला बसून प्रज्ञा विचित्र हावभाव करत होती. जणू ती, ती नव्हतीच. तिचे हात रक्ताने माखलेले होते, हातात चाकू होता तो देखील रक्ताने भरलेला. विशालला बघताच हातातला चाकू बाजूला ठेऊन ती त्याच्या कडे धावत आली.


"कबिर तू असं का वागलास माझ्याशी?" दार उघडायला आलेली प्रज्ञा विशालला बघून त्याची कॉलर पकडून बोलली.


"मॅडम मी इन्स्पेक्टर विशाल." विशाल प्रज्ञाच्या हातून स्वतः च्या शर्टची कॉलर सोडवत तो बोलला.

तितक्यात महिला हवलदार येऊन प्रज्ञाला घेऊन गेली. तिच्या हातात बेड्या बांधण्यात आल्या.


प्रज्ञा तिचीच बडबडत होती.


"ए, हे बघ, मी मारलं ह्यांना. हे तेच होते जे मला जीवे मारण्याची धमकी देत होते. आले होते मला मारायला पण मीच जीव घेतला त्यांचा." असे म्हणून ती जोर जोरात हसत होती.


विशाल तिला बघून सुन्न झाला. तिच्या एकंदरीत वागण्यावरून ती मानसिक दृष्ट्या आजारी आहे हे त्याच्या लक्षात आले.

झालेल्या हत्यांचा पंचनामा, पोस्टमोर्टम वगैरे सगळे सोपस्कार पार पडले.


कोर्टात प्रज्ञा वर खूनाची केस चालू होती. पण तिच्या वागण्यावरून कोर्टाने तिला मनोरुग्णालयात उपचार घेण्यास पाठवले. गुन्हा झाला त्या वेळी गुन्हेगाराचे मानसिक संतुलन बिघडलेले होते हे डॉक्टरांच्या मदतीने सिद्ध झाले होते. त्यामुळे त्यामुळे तिला सोडण्यात आले पण उपचार घेण्यासाठी मनोविकार रुग्णालयात पाठवण्यात आले.


दुसरीकडे…


कबिर वर अजूनही केस सुरू होती. त्याला निर्दोष सिद्ध करणारे पुरावे त्याच्या कडे नव्हते त्यामुळे त्याला दोषी करार देत तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.


कबिर तुरुंगात आणि प्रज्ञा रुग्णालयात जाऊन वर्ष झाले होते.
एक दिवस अचानक तुरुंगातील काही गुंडांनी कबिरला बेदम मारहाण केली त्यात तो प्रचंड जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.


पोलिसांचा पहारा तर होताच कारण सूत्रांवरून त्याला मारण्याचा प्रयत्न होता असे समजले होते. त्यामुळे असा प्रयत्न परत होण्याची दाट शक्यता होती.


चार दिवसांनी बेशुद्ध असलेला कबिर शुध्दीवर आल्याची बातमी लीक झाली. आता कबिर जरा बरा होत होता. पण त्याचे बरे होते कोणाला तरी नुकसान करणारे होते.


एकदिवस सुरक्षेसाठी तैनात हवलदाराची नजर चुकवून कबिर चा मारेकरी आत घुसला. ती मध्यरात्रीची वेळ होती
आणि तो त्याच्या खोलीत घुसला. कबिर झोपलेला होता. त्याने कबिरला उठवले. कबिर त्याला बघून आश्चर्य चकित झाला. त्याच्या हातात चाकू होता.
खोलीत अंधार होता पण त्याच्या हातातील मोबाईल च्या प्रकशात कबिर त्याचा चेहेरा दिसत होता.

"तू." कबिर त्याला बघून शिन आवाजात ओरडला.

"हो मीच. माझ्या मार्गतले सगळे काटे निघालेत. एक तू बाकी आहेस. विचार करत होतो तुला मारू की जिवंत सोडू? पण नाही तुला जिवंत सोडला तर उद्या मलाच धोका आहे. म्हणून तुला मारावेच लागेल." तो बोलला.


कोण असेल तो? मारेल का कबिरला? बघू पुढील भागात.