हुरहुर ह्या जीवाची (भाग दोन)
“सानिका मॅडम, चला आवरा आवरी करा. आज तुमचा इथला शेवटचा दिवस.” यशने सानूला तंबी दिली. यश म्हणजे आत्ताच्या ऑफिसमधल्या सानूचा मित्र कम् बॉस. “काय झालंय सर?” सानूने आश्चर्याने विचारलं. “सांगितलं ना, तुला उद्यापासून इथे यायचं नाही. तू तुझा मेल बॉक्स बघ. तुला इथून काढून टाकले.” यश रागीट स्वरात म्हणाला. सानूनी मेल बॉक्स बघितला आणि तिच्या आनंदाला पारावारच उरला नाही. यशने सानिसाचे मनापासून अभिनंदन व कौतुक केले. कारण सानूच्या कष्टाचं फळ तिला मिळालं होतं. डायरेक्ट समीर सरांच्या टीममधे तिला स्थान मिळालं होतं.
आज रात्री तर सानूला झोपच आली नाही. तिच्या करियरमधली सर्वात महत्त्वाची पायरी तिने पार केली होती. या विचारानेच रात्र सरून गेली. कधी तरी पहाटे तिला झोप लागली. मग कुठला घड्याळाचा गजर आणि कुठली आईची गर्जना. सानू मॅडम आज नेहमीपेक्षा पण थोड्या उशीराचं पोहोचल्या. सानूच्या चेहऱ्यावरची झळाळी मात्र क्षणिक ठरली.
“मी आत येऊ शकते का समीर सर?” उत्साहाच्या भरात सानिसाने विचारले. “अरे सानिसा मॅडम, या, या बसा. पाणी घ्या. तुम्ही चहा घेणार की कॉफी?” समीर सर म्हणाले.
“मी आत येऊ शकते का समीर सर?” उत्साहाच्या भरात सानिसाने विचारले. “अरे सानिसा मॅडम, या, या बसा. पाणी घ्या. तुम्ही चहा घेणार की कॉफी?” समीर सर म्हणाले.
समीर सरांच्या बोलण्यातल्या तिरकसपणाने सानीसाचे नव्या ऑफिसमध्ये स्वागत केले. हे काय कमी होतं म्हणून समीर सरांनी टीम मीटिंगमध्येसुद्धा सानूचा वक्तशीरपणाचं त्यांच्या पद्धतीने फारच कौतुक केलं. जा स्वप्नाळू डोळ्यांनी सानु आली होती त्याचं डोळ्यात आता फक्त अश्रूंची नदी वाहत होती.
“मला ते समीर सर अजिबात म्हणजे अजिबातच आवडले नाहीत. असतील कर्तबगार त्यांच्या घरी.” खूपच रागारागात सानु आईशी बोलत होती. तरी हिम्मत करून आईने विचारलं “सानू काय झालं आहे? मला तर वाटलं कि तू तर एकदम आनंदातच घरी येणार.” सानूच्या रागाचा पारा अगदी गगनभेदी झाला होता. “आनंद...आनंद कुठला जर तुमचा बॉस हिटलरमॅन असेल तर आनंद,सुख,मज्जा हे शब्द तुम्ही विसरायचे.” हिटलर मॅन हा एकदम चपखल शब्द मिळाल्याने सानु मनातल्यामनात हसली.
अफाट ज्ञान, कठोर मेहनत व आकर्षक व्यक्तिमत्व यामुळे समीर सर मुलींच्या मनातले ताईत होते.
अफाट ज्ञान, कठोर मेहनत व आकर्षक व्यक्तिमत्व यामुळे समीर सर मुलींच्या मनातले ताईत होते.
पुढचे काही महिने असेच गेले. कधी कृष्णधवल पटासारखे , तर कधी रंगीबेरंगी रंगानी बहरलेले.ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये सानू आणि टीममधल्या मैत्रिणींमध्ये गप्पांचा फड रंगला होता तेव्हा समीरसरांचा ओघानेच विषय निघाला. सानू नकळतपणे म्हणाली, “निकीता प्लीज, त्या हिटलरमॅन चा विषयच नको.” तसं निकिता, पूर्वा व साधनाला हसूच आवरेना. “पण सानू, समीर सर आधी तसे नव्हते. खूपच मिळून मिसळून राहायचे. एक काय अशी घटना त्यांच्या आयुष्यात घडली आणि दुःखाची साखळी सुरू झाली बघ.” पूर्वाने हिटलरचीमॅनची बाजू सावरली. “हो. फार वाईट झालं आहे. म्हणूनच आम्हाला त्यांच्याबद्दल जास्ती आदर वाटतो.” साधना म्हणाली. “साधु तसं पण समीर सरांना काही म्हटलं कि तुला राग येतो.” सानु मिश्कीलपणे बोलली. “तसं नाही सानु. सरांची ट्रॅजेडी ऐकशील तर तुला कळेल सर किती महान आहेत.” साधना म्हणाली. “हो का... सांग तर तुझ्या महान सरांबद्दल.” सानु ठसक्यात म्हणाली.
“सर त्यांच्या परिवाराला घेऊन ट्रिपवर चालले होते. घाटात समोरून एक भरधाव गाडीने त्याच्या गाडीला टक्कर दिली. हा अपघात एवढा भयानक होता की त्यांच संपूर्ण कुटुंब म्हणजे आई, वडील, बायको अन एक छोटा मुलगा मरण पावले. फक्त सरांचे प्राण वाचले.” साधनाने अतिशय दुःखी भावनेने ही घटना सांगितली. “त्यात परत वडिलांच्या भावाने म्हणजे त्यांच्या काकाने या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांची असलेली थोडी शेती व तिथलं घर हे सर्व स्वतःच्या नावावर करून घेतले. या सर्व आघातांमुळे समीर सर इतके कठोर झाले आहेत.” निकीताने सांगितले. ही कथा ऐकून साधूच्या डोळ्यात आपोआपच अश्रु तरळले. तिच्या पायाखालची जमीनच सरकली.
सानूच्या मनात समीर सरांबद्दलची अढी जाऊन आदर वाढू लागला. सरांचा प्रत्येक कठोर वागण्या मागचा व्याकुळपणा जाणवू लागला. त्यांच्याबद्दलची आपसूकच काळजी, आपलेपणा वाटू लागला. आता हा हिटलरमॅन किती परफेक्ट मॅन आहे अशी भावना बदलु लागली. आणि खुलत असलेल्या कळीची हुरहुर ही जीवाची वाढू लागली.
सानूच्या मनात समीर सरांबद्दलची अढी जाऊन आदर वाढू लागला. सरांचा प्रत्येक कठोर वागण्या मागचा व्याकुळपणा जाणवू लागला. त्यांच्याबद्दलची आपसूकच काळजी, आपलेपणा वाटू लागला. आता हा हिटलरमॅन किती परफेक्ट मॅन आहे अशी भावना बदलु लागली. आणि खुलत असलेल्या कळीची हुरहुर ही जीवाची वाढू लागली.
क्रमशः
प्राजक्ता जोशी सुपेकर
प्राजक्ता जोशी सुपेकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा