हुरहुर ह्या जीवाची भाग तीन (अंतिम)
अल्लड व स्वच्छंदी असलेल्या सानूचं मन या समीर पाटील नावाच्या शांत व विचारी माणसाने केव्हाचं पळवलं होतं. कहानीमें और एक ट्विस्ट तो होनी ही चाहिए.
आजच्या दिवसाची सुरुवात मुसळधार पावसाने झाली होती. पण, ऑफिसमध्ये महत्त्वाचं काम होतें आणि समीरसरांना पण बघता येईल या आशेने सानु ऑफिसला पोहोचली. तसे सगळेजण ऑफिसला आले होते आतापर्यंत. जवळजवळ अर्धा तास झाला होता पण अजून समीर सर नव्हते आले. जसा घड्याळाचा काटा पुढे सरकत होता तसं सानूच्या हृदयाची धडधड वाढत होती. तिचं लक्ष फक्त दरवाजाकडे होतं. कधीही एक मिनिट पण उशीरा न येणारं हे चालतं बोलतं घड्याळ अजून कसा आला नाही हाच विचार ती करत होती. आणि...
आतापर्यंत घरातल्या मंडळींनी अतिवृष्टीमुळे पूराची बातमी आमच्यापर्यंत पोहचवली. त्यात आपल्या न्यूज मीडियाने असलेली नसलेली परिस्थिती आमच्यासमोर प्रकाशझोतात आणली होती. समीरसरांनी त्यांचं केबिन बंद करून आमच्याबरोबर केबिन बाहेर येऊन न घाबरण्याचं आवाहन करू लागले. प्रत्येकाशी आपुलकीने बोलून या अचानक पणे उद्भवलेल्या आपत्तीवर मात करण्यासाठी आम्हाला देखील बळ देत होते. एकूणच बाहेरची बिघडलेली परिस्थिती व घरातल्यांना वाटणारी काळजी याचा अंदाज घेऊ समीर सरांनी स्वतः च्या टीममधल्या प्रत्येकाच्या घरी फोन करून खुशाली सांगितली व सुखरूपपणे सगळे घरी पोचतील याची हमीदेखील दिली. त्यांचे हे रूप त्यांच्या नेहमीच्या वागण्यापेक्षा पूर्णपणे निराळे होते. आज त्यांच्या नजरेतला कटाक्ष निघून जाऊन तिथे काळजी जाळे विणले होते.
प्रसंगावधानता दाखवून त्यांनी आधीच आमच्या रात्रीच्या जेवणाची व राहण्याची सोय देखील केली होती. नुसतीच कामातली शिस्त नसून माणुसकीचं व माणसातल्या देवाचं दर्शन त्यांनी दिलं. तसं सानूच्या मनातले प्रेमाचे सप्तपदी सुरात वाजू लागले.
दुसर् या दिवशी सरांनी घरातल्यांना दिलेल्या हमीप्रमाणे सर्वांना घरी सोडण्याची व्यवस्था झाली.पण सानूला मात्र सर स्वतः घरी सोडायला आले.समीर सरांच्या मनात पण सानूबद्दलची अधिक काळजी, आपुलकी, जपणे व अधिक प्रेम वाटू लागलं होतं.

सानूच्या मनातल्या दडून बसलेला भावना पूर्वा, निकिता व साधनानी हेरल्या होत्या. समीर सरांवरून चिडवणं हा त्यांचा नित्यक्रम बनला होता. पण सानूला ही जाणीव होत होती की तिच्या भावनांवर तीचा ताबा संपला होता. पूर्वा, साधना व निकिताच्या मदतीने समीर सरांना प्रपोज करण्यासाठी सानू सज्ज झाली.
पूर्वाही ऑफिसमधली जुनी कर्मचारी असल्यामुळे समीर सर व पूर्वा दोघेही जास्ती संपर्कात होते. पुरादिवशी केलेल्या मदतीचे औचित्य साधून पूर्वाने समीरसरांना हॉटेलमध्ये जेवायचं निमंत्रण दिलं. त्याच पद्धतीने पूर्वा बरोबर सानूही आहे असे पूर्वाने सांगितल्यावर समीर सरांच्या चेहर्यावर गुलाबी छटा उमटल्या.
जरी सानिसा आणि समीर स्वभावाने उत्तर-दक्षिण ध्रुव असले तरी आज मात्र लक्ष्मी नारायणासारखे दिसत होते. समीर सर नेहमीप्रमाणे वेळेवरच आले. पूर्वा ही वेळेवर आली. सानू मात्र तिच्या नेहमीच्या वक्तशीरपणासारखी थोडी उशीराच आली.
योग्य वेळ बघून पूर्वाने जेवण झाल्यावर तिथून पळ काढला आणि आता सानू व समीर सर एकमेकांसमोर होते. तिच्या मनातलं गुपित समीरसरांना सांगणार तेवढय़ातच...
त्यांना एक फोन आला. तो झाल्यावर त्यांचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. त्यांचा मूड पूर्णपणे गेला होता. त्यामुळे ते तसेच ताडताड निघून जाऊ लागले. सानू मागून हाक मारत होती “सर, सर थांबा. प्लीज मला बोलायचं आहे.” पण सरांनी तिच्याकडं बघण्याची तसदी पण घेतली नाही. तिचे डोळे पाण्याने डबडबले होते. तिच्या डोळ्यांदेखत तिचं स्वप्न धुळीत मिसळत होतं. सानूने डोळे घट्ट मिटून घेतले व तसे दोन्ही डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या.
समोरून मधुर, प्रेमळ हाक आली. सानिसा... तसं सानूने डोळे उघडले तर.... तर समीर सर स्वतः हातात लाल गुलाबांचा गुच्छ घेऊन उभे होते. “सानिसा माझ्याशी लग्न करशील का?” आणि हा आनंददायी धक्का बघून सानू अजूनच रडू लागली.
ही प्रेमकहाणी सानूच्या घरी पूर्वाने आधीच सांगितली होती. तेव्हा आई बाबाने समीरसरांची सगळी माहिती काढली. सर्वगुण संपन्न असलेल्या समीरला नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पण सानूची मजा करायची असं त्या दोघांनी ठरवलं.
“आठ वर्षाचे अंतर? काही काय बोलतेस सानू. शक्यच नाही. हा विषय डोक्यातून काढून टाक.” आईने रागवून सांगितले. सानूच्या डोक्यातलं विचारांचं वादळ शमल नव्हतं. सानूचा असा गंभीर चेहरा बघून बाबाच्या मनाला पाझर फुटला व ते हसु लागले. तसं समीर व सानूला या नाट्याचा अंदाज आला व सर्वजण हसू लागले.
हे दृश्य बघून सानूच्या तोंडातून आपसूक चारोळी आली
“ प्रेम वाटते आंधळे तरी डोळसपणाचे
मनाची व जीवाची हुरहुरता वाढवणारे...”

समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा