भाग -4
" ताई अगं ऐक ना, मला ना..!" त्रिशा मध्येच बोलायची थांबते..
" काय गं काय झालं..? काही बोलायचं आहे का..? " कोमल विचारते.
" आमची ग्रुप ची ट्रिप जात आहे, म्हणजे कॉलेज कडुन नाही. आम्ही ग्रुप ने ठरवली आहे, त्यासाठी काही पैसे हवे होते.. " त्रिशा बोलते.
" अगं पण तुझी परीक्षा आहे ना..?" कोमल विचारते.
" अगं परीक्षे नंतर.. देशील का.. प्लीज.. " त्रिशा तिला प्रेमाने सांगते.
" बरं बरं, किती हवे आहेत..? " कोमल विचारते.
" जास्त नाही काही पाच हजार.. " त्रिशा बोलते.
कोमल ला हे ऐकुन धक्काचं बसतो, " एवढे..? अगं पण..!"
"ताई प्लीज, मि नाही हट्ट करणार. आणि मि तुझ्याकडे पुन्हा असा हट्ट करणार नाही." त्रिशा बोलते.
" अगं पण... बरं मि पाहते, पण हा अभ्यासावर लक्ष द्यायचं. उगाच ट्रिप ट्रिप करत बसायची नाही.. " कोमल तिला समजावून सांगते.
" थँक्स ताई.. " आणि ति कोमलला घट्ट मिठी मारते.
" तु आईला सांगितल का..? की तु ट्रिप ला जाणार आहेस ते.." कोमल विचारते.
" नाही ताई, पण आता नको नाहीतर आई आत्ताच नाही म्हणुन सांगेल.. तसं ही तिला नेहमी माझा राग येतो, त्यात अजुन भर नको. " त्रिशा नाराज होऊन बोलते.
सकाळ होते, कोमल ऑफिस ला जायच्या तयारीला लागते.
त्रिशा सकाळी फ्रेश होऊन बाहेर सोफ्यावर येऊन बसते.
त्रिशा सकाळी फ्रेश होऊन बाहेर सोफ्यावर येऊन बसते.
" त्रिशा अगं हा चहा ताई ला न्हेऊन दे.. " आई त्रिशाला चहा न्हेन्यासाठी आवाज देते..
त्रिशा चहा घेऊन कोमल च्या पुढ्यात ठेवते, " त्रिशा कॉलेज संपल की एखादी चांगली नोकरी पकड आणि कामाला लाग. तसं ही ताई चं लग्न होणार, त्या नंतर तुला हातभार लावावा लागणार.. " आई किचन मधुन बोलते.
" अगं आई कॉलेज संपल की मला पुढे काही कोर्स करायचा आहे, मि नाही जॉब ला जाणार.. " त्रिशा साफ नकार देते.
हे ऐकताच आईला राग येतो तिचा पारा चढतो, " का नाही लागणार, तुला जबाबदारी वगरे काही कळत की नाही. अगं तुझ्या ताई कडे बघ, कॉलेज संपल तशी ति जॉब ला लागली. आज स्वतःच्या पायावर उभी आहे, आणि म्हणुन चांगल स्थळ ही येत आहे लग्नासाठी.. " आई धडाधड बोलते.
" अगं ताई ने जे केलं ते मि सुद्धा करणं गरजेचं आहे का..?" त्रिशा उलट आईला विचारते.
" हेच हेच म्हणुन मला तुझा राग येतो, आणि म्हणे आई आम्हा दोघींमध्ये दुजाभाव करते. " आई बोलुन दाखवते.
" अगं त्रिशा, शांत हो का वाद घालतेस.. अजुन वेळ आहे पुढचं पुढे बघु.. " काजल त्रिशाला समजावते.
" अगं पण ताई..??? " त्रिशा तिला खुणावते.
" आई आणि तुही शांत हो, पाहूया आपण पुढे काय करायचं ते. आता सकाळी सकाळी वाद नको, मि समजावते तिला. " कोमल आईला सुद्धा समजावते.
" बरं तु तो ड्रेस घालुन पाहिलास का..? आज जमलं तर घालुन जां ऑफिस ला.. " आई काजल ला बोलते.
" हो मि पाहते..!' आणि काजल चेंज करण्यासाठी आत जाते..
थोड्या वेळाने काजल बाहेर येते, " आई गं हा ड्रेस मला होतं नाही, नको मला. " काजल बोलते.
तसं त्रिशा काजल कडे पाहते., " अरे देवा नाही होतं का..? तुझ्याच मापाचा आणलेला, मग झाला कसा नाही..? ठीक आहे तु दे मि बदलून आणते."
" नाही नको, मि हा त्रिशा ला देते तिला होईल.. " आणि काजल त्रिशाच्या हातात तो ड्रेस देते, त्रिशा ड्रेस घेऊन फारच खुश होते आणि बेडरूम मध्ये जाते.
आरशा सामोरं स्वतःला ड्रेस लावुन पाहते, " छान दिसेल तुला.. " काजल बोलते.
" अगं पण ताई तुझ्या तर मापाचा आहे, मग तुला का नाही झाला..? " त्रिशा विचारते
काजल हसते, " झाला पण तो तुझ्यावर जास्त छान दिसेल म्हणुन तुला दिला खुश ना..? तोंड पाडुन होती माहित आहे मला.. "
संध्याकाळ होते काजल घरी येते, आल्या आल्या ति त्रिशाला विचारते, " आई अगं त्रिशा आली नाही का अजुन..? "
" कधी लवकर तर कधी उशिरा कसला कशाला ताळमेळ नाही, तु फ्रेश होऊन ये मि तुला चहा देते.. " काजल ची आई बोलते..
तेवढ्यात त्रिशा येते, " आई गं आई.. " ति बॅग एका बाजुला टाकुन पसरून बसते.
" काय गं होतीस कुठे आणि इतका उशीर का झाला..? फोन करुन सांगायची काही पद्धत आहे की नाही..? " आई बोलते.
आई चा आवाज ऐकुन काजल बाहेर येते, " अरे झालं काय..? अगं आई इतकी चिडली का आहेस तु..? " काजल विचारते.
" अगं चिडू नाही तर काय करू, साधा फोन ही करता नाही येत हिला.. कुठे जाते काय करते काही सांगायची पद्धत आहे की नाही हिला..? वैताग आला आहे मला हिच्या पासुन.. " आई चिडून बोलते पण त्रिशा शांतपणे ऐकत असते..
" अगं शांत हो, हिने मला फोन करुन सांगितलं होतं.. हो की नाही त्रिशा.. " काजल आईच्या पुढ्यात तिची बाजु घेते.
" बरं हे घे.. " काजल त्रिशाच्या हातात ट्रिप चे पैसे ठेवते.
" हे काय हे कसले पैसे..? " आई काजल ला विचारते.
" अगं तिची परीक्षा नंतर ट्रिप जाते आहे, त्याचे हे पैसे.. " काजल बोलते.
" कर अजुन लाड, बिघडू दे अजुन ति.. " आई चिडून बोलते.
त्रिशा ला रडूच येतं.. काजल आईला समजावते..
" अगं आई माझ्यात आणि त्रिशा मध्ये दुजाभाव का..? ति कोणतं ही कामं करत नाही म्हणुन की..? अगं प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो, ति शिकेल हळू हळू तु तिला असं अंतर नको देऊस.. " काजल आईला समजावते..
" अगं आई माझ्यात आणि त्रिशा मध्ये दुजाभाव का..? ति कोणतं ही कामं करत नाही म्हणुन की..? अगं प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो, ति शिकेल हळू हळू तु तिला असं अंतर नको देऊस.. " काजल आईला समजावते..
आई च्या डोळ्यांत पाणी येतं, ति त्रिशाला जवळ घेते..
कधीही कोनामध्ये दुजाभाव करू नये त्यामुळे नात्यात अंतर वाढत..
समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा