दुजाभाव भाग -1

कौटुंबिक
" आई अगं टिफिन आणतेस ना गं, उशीर होतो आहे ऑफिसला जायला.. " कोमल तिच्या आईला बोलते.

" हो हो,, आले झालं.. " कोमलची आई तिच्या हातात डब्बा देत.

" बरं वेळेवर जेवुन घे, नाही तर अपचन होईल. असंच तुला अपचन चा त्रास आहे.. "आई तिला काळजीने बोलते.

" हो गं आई, बरं काय दिलं आहेस आज टिफिनला..? " कोमल विचारते..

" तुझ्या आवडती वांग्याची भाजी आणि चपाती.. " कोमलची आई बोलते...

" काय वांग्याची भाजी..? अगं दुसरं काही भेटलं नाही का तुला बनवायला.. " त्रिशा म्हणजे कोमलची धाकटी बहीण मध्येच बोलते.

तसं आई तिच्यावर भडकते, " वाह,, काय नाक मुरडलस भाजी ऐकुन.. तुझा ह्याच्याशी काही संबंध आहे का..? " आई भडकून बोलते.

" हे चांगलं आहे, ताईला आवडतं म्हणुन वांग्याची भाजी आणि मला माझ्या आवडीचं काहीच नाही.. असं का..? " त्रिशा विचारते..

" तु कामाला जातेस का..? घर म्हणुन तुझा काही हातभार आहे का..? घरात कसली मदत तरी करतेस का तु..? " आई बोलते आणि किचन मध्ये निघुन जाते..

" अगं हो हो.. शांत व्हा दोघी जरा. अरे सकाळी सकाळी कसले वाद घालतायत तुम्ही.. " कोमल बोलते.

" अगं ताई पण.. " त्रिशा पुन्हा काही बोलायला जाणार तेवढ्यात कोमल तिला शांत व्हायला खुणावते.

" मि ऑफिस ला जाते, उशीर होतो आहे मला. आणि हो भांडु नका पुन्हा.. " कोमल बोलते, आणि ऑफिस साठी निघते.

त्रिशा रागाने बेडरूम मध्ये निघुन जाते, सकाळ चे बारा वाजतात. त्रिशा कॉलेजसाठी तयार होऊन बाहेर हॉल मध्ये येते, " आई गं नाश्ता देतेस का गं..? कॉलेज जायला उशीर होतोय.. "

आई हु नाही किंवा चु नाही, पुन्हा त्रिशा तिला आवाज देते, " आई गं देना चहा.. "

" उठून घे, तयार आहे फक्त कपात ओतुन घ्यायचा आहे.. " आई बोलते.

" शि.. बाई, ताई ला दिलास ना मग मला द्यायला काय झालं..? " त्रिशा बोलते.

" पाहते आहेस ना मि दुसरं कामं करतेय ते, मग स्वतःचा चहा ओतुन घ्यायला काय झालं.. लहान नाही ना तु आता.. " आई तिला असं बोलुन जबाबदारीची जाणीव करुन देते.

त्रिशा मुकाट्याने चहा घेते, आणि पीत सोफ्यावर बसते.
" हे काय नाश्ता केला आहे, तो का नाही घेतलास..? " आई विचारते.

" नको मला, तुला माहित आहे मला पोहे नाही आवडतं ते. " त्रिशा बोलते.

" नाश्ता आवडतो म्हणुन खायचा नसतो, पोट भरण्यासाठी खायचा असतो. " आई तिच्या पुढ्यात नाश्ता आणुन देते.

आणि तिच्या समोरच ति बसते, " अगं नको म्ह्टल ना, पोट फुगेल माझं. " आणि ति नाष्टाची डिश बाजूला करते.

आई रागाने तो नाश्ता उचलून किचन मध्ये ठेवते, " नको खाऊस, म्हणुन मला तुझा राग येतो. बाहेरच चमचमीत खायला तुला आवडतं पण घरातलं नाही. आणि स्वतः कमवत असती तर तुला कळलं असत.. " आई तिला रागाने बोलते.

त्रिशा रागाने कॉलेजसाठी निघते, तिला आईच्या बोलण्याचा फार राग आलेला असतो.

त्रिशा कॉलेज पोहचते, समोरच बाईकवर त्रिशाचा ग्रुप बसलेला असतो.

" हेय त्रिशा, तुला आजचा प्लॅन कळाला का..? " त्रिशाची कॉलेज ची मैत्रीण गौरी बोलते..

कोणता आणि कसला प्लॅन त्रिशाला काही माहित नसतं, " नाही कसला गं..? "त्रिशा विचारते.

"आपली परीक्षा कॉलेज संपलं की लगेचच पिकनिक ला जायचा प्लॅन केला आहे." गौरी बोलते.

त्रिशाच कॉलेज लवकरच संपणार होतं, त्रिशाला पिकनिक, ट्रिप, लॉंग ड्राईव्ह या साऱ्या गोष्टी खुप आवडतात.

" अगं कसल्या विचारत पडलीस..? " त्रिशाचा कॉलेज चा मित्र समीर तिला विचारतो.

" अरे काही नाही, बरं जायचं कुठे आहे..? " त्रिशा उत्साहात विचारते.

" अलिबाग.. " त्रिशाची मैत्रीण निधी बोलते.

" अरे वाह,, सो मग त्या पुढील प्लॅनिंग केली आहे का..किती दिवस, कुठे राहायचं वगरे.. " त्रिशा विचारते.

" प्रत्येकी पाच हजार रुपये काढायचे आहेत, आणि दोन दिवसांसाठी. आणि आपल्या ग्रुप मध्ये बाईक आहेत त्या घेऊन जाऊया.. " गौरी धडाधड बोलतं होती.

ग्रुप ने प्लॅन नीटसर आखला होता.

" पाच हजार..? देवा मला नाही वाटतं घरून देतील. आई तर अजुन सुनवेल.. काय करू... काय करू.. नाही बोलु का..? नाही नको ताई शि बोलते.. " त्रिशा मनातल्या मनात बोलतं होती...

" काय गं काय झालं..? कुठे हरवलीस..? " समीर विचारतो.

त्रिशा भानावर येते, " अरे नाही काही नाही.. " त्रिशा बोलते.

" मला तर घरून पाच काय दहा हजार सुद्धा भेटतील.. " निधी बोलते.

" मला ही, पण तरी माझे जमावलेले पैसे आहेत. त्यात थोडे घरचे टाकतील.. " गौरी बोलते.

जो तो खुश होता, सगळ्यांना अलिबागचे वेध लागले होते.

क्रमश...


🎭 Series Post

View all