दुजाभाव भाग -3

कौटुंबिक
भाग -3

ति ड्रेस घेऊन तशीच आत बेडरूम मध्ये जाते, पलंगावर आडवी होते..

" नेहमी माझ्यात आणि ताई मध्ये अंतर का मानलं जातं..? ताई ला चांगल आणि मला असं घाणेरडं, खराब का देतात..? " त्रिशा मनातल्या मनात बोलते.

तेवढ्यात दारावरची बेल वाजते, बाबा दार खोलतात. कोमल थकून आत येते, " काय गं आज जास्त कामं होतं का..? " बाबा तिला विचारतात..

" हो बाबा,, त्रिशा आली का..? " कोमलचा पहिलाच प्रश्न असतो.

" हो आली तर, आत बेडरूम मध्ये आहे.. " आई कोमलच्या हातात पाणी देत..

कोमल आत बेडरूम मध्ये जाते, आज कोमलचा पगार झालेला असतो. तिने न विसरता आणि आवडीने त्रिशाच्या आवडतीची मिठाई घेतलेली असते.

" त्रिशा.. " कोमल आवाज देते..

त्रिशा कोमलचा आवाज ऐकून हळूच डोळे पुसते, कोमल आली म्हणुन तिला आनंद ही होतो.
" मिठाई आणलीस..? " त्रिशा लहानमुली सारखं तिला प्रश्न करते .

त्रिशाला माहित असत, पगार झाला की ताई तिच्या आवडीची मिठाई आणणार..

कोमल तिच्या हातात तिच्या आवडीची मिठाई चा बॉक्स ठेवते..
त्रिशा बॉक्स खोलते, आणि त्यातला एक तुकडा उचलून तोंडात घालते..

कोमल आणि त्रिशा बाहेर हॉल मध्ये येतात, कोमल चहा चा घोट घेते. आणि पगार झालेला ति तिच्या आईच्या हातात ठेवते..

त्रिशा हे सारं पाहत असते, कोमल ची जुनी सवय होती. पगार झाला की लगेचच आई च्या हातात द्यायचा.

" अरे यार ताई ने तर पगार आईच्या हातात दिला, आता कसं मागु..? " त्रिशा मनातल्या मनात बोलते.

आई बेडरूम मध्ये जाते, आतुन ति पिशवी घेऊन येते ज्यात आई ने आणलेला ड्रेस असतो, " ह्म्म्म धर, तुझ्यासाठी.. " आई कोमलच्या हातात ड्रेस देते.

" हे काय ड्रेस..? छान आहे.. " कोमल बोलते. आणि ति अंगाला लावुन त्रिशा ला दाखवते..

त्रिशा मानेनेच होकार देते, तेवढ्यात दारावरची बेल वाजते.

त्रिशा दार उघडते, दारात काटे काकी असतात..

" आई काटे काकू आल्या आहेत.. " त्रिशा ओरडून सांगते..

आणि काटे काकु आत येतात, " अगं बाई काटे वहिनी..! या ना आत या .. " आई त्यांना बसायला सांगते.

" आता ह्या वेळेला येणं कसं केलं..? " आई विचारते.

इकडच्या तिकडच्या गोष्टी झाल्या नंतर काटे काकु सरळ विषयाला हात घालतात, " तुमच्या कोमल साठी स्थळ आणलं आहे.. " काटे काकु बोलतात.

बाबा हे ऐकुन डोळ्यांवरील चष्मा बाजुला करतात, आईचा आनंद गगणात मावत नव्हता, " खरंच, मुलगा काय करतो..? वगरे वगरे आई प्रश्न करते. "

" थांबा मि तुम्हाला फोटोच दाखवते.. " असं बोलुन काटे वहिनी पिशवीतुन फोटो काढुन आईच्या हातात देतात..

आई फोटो पाहुन, " अरे वाह,, छान आहे की मुलगा.. " आणि ति फोटो बाबांना दाखवते..

" तुमची मुलगी लक्ष्मी आहे लक्ष्मी, संस्कारी आहे. आणि घरातल्या प्रत्येक कामाची जबाबदारी कशी घ्यायची हे सुद्धा तिला माहित आहे. म्हणुन मि जबाबदारीने हे स्थळ सुचवलं.. " काटे काकु कोमलची तारीफ करत होत्या.

आईला हे ऐकुन अतिशय आनंद होतो, तिचे डोळे भरून येतात..
" हो तर, बरोबर बोललात तुम्ही वहिनी.. बरं मि कोमल ला दाखवुन कळवते तुम्हाला.. " आई बोलते.

काटे काकु त्रिशा कडे पाहतात, " त्रिशा, तुझं ही लग्न जमवुया ताई चं झालं की. चालेल ना तुला..? " आणि काटे काकु हसायला लागतात..

त्रिशा ला हे ऐकुन फारच राग येतो, " तुला जेवण वगरे येतं ना बनवायला..? "

हे ऐकुन आई मध्येच बोलते, " छे ओ, हिला कुठे काय येतं. साधं चहा सुद्धा तिला हाताने घेता येईना.. " आई काटे काकु ला बोलतात.

आईचं बोलणं ऐकुन त्रिशा रागाने बेडरूममध्ये निघुन जाते..
काटे काकु इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलुन निघुन जातात..

रात्र होते, त्रिशा बराच वेळ बेडरूमच्या बाल्कनीत उभी असते, कोमल तिच्या जवळ जाते., " काय गं त्रिशा अशी एकटीच बाल्कनीत उभी का आहेस..? कसला विचार करतेस..? कोणी मुलगा वगरे आवडला की काय..? " कोमल मस्करीत विचारते..

" काही काय ताई, सहज उभी आहे. परीक्षा ही आल्या आहेत तोंडावर त्याचाच थोडा विचार करतेय.. " त्रिशा बोलते.

कोमल ला हसु येतं, " अरे बापरे तु आणि परीक्षेच टेन्शन..? बरं काही अडलं तर सांग मला मि आहे ना.. "

क्रमश...

🎭 Series Post

View all