पुरुषवादी -७
आता रोज नियमित क्रमाने नंदिता क्लास...नंतर घर आणि आणि पुन्हा क्लास एवढंच तीच विश्व होतं...
मन लावून अभ्यास करते हे बघून नयन अगदी खुश होत असे..
पण नंदिता ची आता चिडचिड होत होती..
परीक्षा जवळ येत होती..टेन्शन येतं होते..आता जेवण झोप सगळीकडेच दुर्लक्ष होत होते आणि अशातच तिची तब्येत खराब झाली..
आता दवाखान्यात जायचे सोडून मॅडम गोळ्यांनी काम चालवू लागल्या..अर्थात ठीक नाही झाली..
आणि शेवटी अडमित करण्याची वेळ आली आणि त्यावेळी सुद्धा दवाखान्यात तिचा पारा सुटला..
आणि ती परत एकदा नयानला खूप बोलून गेली..
मुकाट्याने नयन ने ऐकून घेतले कारण परीक्षेच्या तणावात होती म्हणून बोलून गेली...
हळू हळू दोघांचे असेच वाद वाढत होते ..
अखेरीस नयन एक दिवस घरी आला आणि सर्वांना सांगितलं ...
आई ..बाबा..मी आणि. नंदिता दुसरीकडे राहायला जात आहोत..
घरातले थोडे दुखावले पण नंदिता समोर कोणीच काही नाही बोले...
आता या निर्णयाने नंदिता अजूनच संतप्त झाली कारण नवीन घरापासून क्लास खूप दूर होता ..आणि तिला एक तास नियमित लागणार होता आणि एक महिना असा जाणं तिला मान्य नव्हता...
खूप प्रयत्न करून सुद्धा नयन ऐकाना..
शेवटी दोघे नवीन घरात जाण्यास सज्ज झाले..
काही दिवस राहिल्यानंतर नंदिता. पण कळवण्यात आले होते की क्लास आता बंद होणार आहे शेवटचा महिना अभ्यास करावा म्हणून बंद करण्यात आला..
आता नंदिता दिवस रात्र घरात खूप अभ्यास करू लागली ...
इथे तिला पूर्णतः शांतता होती...
अचानक तिने एक दिवस नयन चे बोलणे ऐकले ..
बहुतेक भांडत असावा पण कोणाशी आणि का?
म्हणून ती त्यास विचारायला गेली तर
त्याने अगदी अनेक्षितपणे उत्तर दिले..
अग काही नाही आईची कटकट चालू होती आम्हला घरी यायचे तू येऊ का नाही देत ...
आता तू सांग नंदिता एवढं लगेच येणं गरजेचं आहे का? कळत का नाही यांना!
संतापातच नयन तिथून निघून गेला..
नंदिता ला काही कळेना म्हणून ती सुद्धा अभ्यास करत बसली.
काही वेळाने तिला नणंद बाईंचा फोन आला...
आणि बराच वेळ गप्पा झाल्या आणि अखेरीस ठरलं की त्या दोन दिवस मुक्कामी येणार ...
आता ही बातमी तिने नयन ला सांगितली आणि तो आणखीनच चिडून गेला...पण काही बोलला नाही.
दुसऱ्या दिवशी नणंदबाई आल्या..
त्यांची खातिर्दरी करता करता सकाळ झाली...
पण सकाळी त्यांना लवकर चहा लागतो म्हणून नंदिता लवकर त्यांच्या खोलीत गेली तर त्यांचे आवाज आणि बोलणे ऐकून जणू तिला रडूच कोसळले..
मनोमनी ती स्वतः ला खूप कोसू लागली...
आणि घरात येऊन ती नयन ला
शोधू लागली ..
अखेरीस मंदिरात तिला नयन दिसला...पण इथे कसे बोलावे म्हणून ती शांत बसली..
काही वेळात नयन घरी आला...आज बघतो तर सर्व त्याच्या आवडीचे ...त्याल भानगड काही कळेना...पण त्याने जेवणाचा खूप आस्वाद घेतला..
क्रमशः.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा