पुरुषवादी भाग -१
आणि या कार्यक्रमाचा शेवटचा पुरस्कार आहे...
"विमेन ऑफ द यीर"
ऐनी गेस..
मीच सांगतो..
"यावर्षी विमेन ऑफ द यीर पुरस्कार जातो..
"नंदिता देशमाने"
टाळ्यांच्या गजरात सर्वांनी स्वागत केले...
धन्यवाद.. धन्यवाद.. धन्यवाद..
"अग.. नंदिता धन्यवाद कोणाला करते ? अग उठ तुला जायचं नाही ना आज?
नंदिताची आई तिला उठवत होती पण नंदिता आपली स्वप्नात जगत होती..
अखेरीस खूप प्रयत्नानंतर नंदिता उठली..
काय ग आई? खऱ्या आयुष्यात नाही तर कमीत कमी स्वप्नात तरी जगू दे की काय ग तुझा सकाळी सकाळी? नंदिता थोडी वैतागुनच बोलली..
"अग तुला बोली होती ना मी तुला आज मुलगा बघायला येणार आहे ! म्हणून तुला विचारते आज नाही ना जायचं कुठे?"
काय ? काय ग आई तुमचा मला नाही करायचं लग्न! तुला बोलली ना मी जोपर्यंत मी माझ्या पायावर उभी राहत नाही तो पर्यंत मी लग्न करनार नाही आणि आधीच सांगते माझ्या इच्छे प्रमाणे त्याच्यात गुण नसतील तर मी का करू लग्न?
नंदिता उत्तरली.
अग नंदू असा नसतं देवाचा प्रसाद असतो नवरा जसा भेटला त्यात भाग्य मानायच स्वतःच..बर मी काय म्हणते भेटून तर घेशील बाकी बघू नंतर काय म्हणतेस ?
आई नंदितला समझुत काढत विचारू लागली..
बर माझी माते भेटते पण आधीच सांगते मला पटल नाही तर मी नकार देईल.
नंदिता बोलली
हो हो जसा तू म्हणतेस ..बर ऐक दुपारी येणार ते भेटायला मग त्याधी काय तुझा काम असेल ते करून घे ..
आई एवढं बोलून निघून गेली.
हो ठीक आहे मी आवरते आणि निघते
एवढं बोलून नंदिता आवरायला लागली.
आवरून..नाश्ता करून नंदिता कामावर जायला निघाली...
नंदिता स्कूटीवर निघाली होती आणि त्यांच्या चौक संपला की तिला एक सिग्नल लागायचा आजही लागला नेहमीप्रमाणे...
पण आज तिला पण घाई होती म्हणून सिग्नल जसा सुटला तिने लवकर गाडी सुरू करण्यामध्ये बाजूला उभी असलेली चारचाकी ला जाणूनबुजून नाही तर नकळतपणे धक्का लागला..आता तिने माफी देखील मागितली पण त्यातला गृहस्थ तिला जरा जास्तच बोलायला लागला..
ह्या आजकालच्या बाया मुलींना गाडी नकोच द्यायला रे काही येत नाही नुसती भास मारायला जातात आणि तोंडावर पडतात...
बहुतेक तो त्याच्या मित्रासोबत होता पण त्याच्या मित्राने मास्क घातले होते आणि त्यात तो काही बोलत होता ते सुद्धा कळेना..
पण नंदिताने खूप वेळा माफी मागून सुद्धा तो ऐकेना शेवटी .. नंदिताचा पारा चढला...
आणि अतिशय क्रोधात बघून मुद्दाम ती यावेळी धक्का देऊन गेली आणि सोबतच त्याला चार शब्द देखील सुनावले...
नंदिता गेल्यावर मात्र त्या गृहस्थाची अजून कटकट चालू होती पण काही वेळानंतर तो सुद्धा शांत झाला...
इकडे नंदिता कामावर येऊन लवकरात लवकर काम उरकून घरी जाण्यास सज्ज झाली..
घरी आली तर बघते सर्व तीच लगबग चालू कदाचित येण्यास उशीर झाला होता कारण घराबाहेर खूप चपला होत्या...
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा