ऑगस्ट लागला तसे रक्षाबंधनचे वारे वाहू लागले. रंगीं बेरंगी राख्यांनी बाजार सजला. बहिणीला साडी, कपडे द्यायचे म्हणून दुकानात रेलचेल सुरु झाली. त्यात रक्षाबंधनच्या दिवशी शनिवार, व दुसऱ्या दिवशी रविवार आल्याने दोन दिवस रक्षाबंधन साजरे करायला हातात. सुधा विचार करत होती. पण यावेळी तिला कोण जाणे काय झाले रक्षाबंधनला भावाला राखी बांधायला माहेरी जायची इच्छा तिला होत नव्हती. म्हणून तिने आईला फोन करून ती कधी माहेरी जाईल? किती दिवस तिथे राहणार? तिच्या सोबत माहेर वरून काय काय घेऊन जाणार? काहीच सांगितले नाही. शेवटी सुधाच्या फोनची वाट पाहून कंटाळलेल्या तिच्या आईने तिला फोन केला.
"हा आई बोल कशी आहेस?" सुधाने आईला विचारलं.
"मी अगदी मस्त आहे. तु सांग तुला काय झालं?" आईने तिला प्रतिप्रश्न केला.
"मला काय होणार? मी ठणठणीत आहे." सुधा उत्तरली.
"मग फोन का नाही केलास? तु आलीस कि माहित आहे ना तुला, माझे काहीच करने होत नाही." आई तिला बोलली.
"आई, माझं यावेळी रक्षाबंधनला येणं नाही होणार तिकडे. पुढे येईल सुट्टी मिळेल तसं." सुधा तिच्या आईला म्हणाली.
"अगं पण नऊ तारखेला शनिवारी सुट्टी आहे ना तुला." आई तिला म्हणाली.
"हो सुट्टी आहे. पण मी नाही येणार तिकडे रक्षाबंधनच्या दिवशी." सुधाने आईला ठामपणे सांगितले.
"का गं? काय झालं, आमचं काही चुकलं का?" आईनं काळजीच्या स्वरात विचारलं
"अगं नाही गं." सुधा हसून म्हणाली, "यावेळी म्हटलं यांच्यासोबत घरीच वेळ घालावं ररक्षाबंधनला. दरवर्षी हे एकटे इथे असतात आणि मी तिथे तुमच्या सोबत."
"असं का? मग त्यांना घेऊन ये ना इथे. सर्व सोबत मिळून रक्षाबंधन साजरे करू." आईचा हुकूम.
"मीही तोच विचार केलेला. पण नाही गं जमत त्यांचं येणं.'' सुधाने तिच्या आईला सांगितले.
''नक्की असेच का ?'' पलिकडून तिच्या वहिनीने गमतीत विचारले, ''बघा हो नाहीतर तुमचा भाऊ माझ्यावरच खापर फोड़ेल तुमच्या न येण्याचे. म्हणेल तूच काहीतरी बोलली असेल.''
''वहिनी मी बोलली दादा सोबत. तेव्हा काळजी नका करू हो. रक्षाबंधन झाल्यावर येणारा रविवार पाहून येतेच तुम्हाला सासरवास करायला.'' सुधानेही गंमतीतच त्यांना उत्तर दिले.
''हो हो, या नक्की. तेव्हापर्यंत मी येतेच माझ्या वहिनीला सासुरवास करून." वहिनी बोलली तशा दोघीही हसल्या.
"आईसोबत बोला.'' वहिनीने हसत फोन सुधाच्या आईकड़े दिला.
'काय ग जावई नाराज आहेत का आमच्यावर? की भांडलिस तू त्यांच्यासोबत? कि आणखी काही इशू आहे तुमच्यात?'' आईने प्रश्न विचारला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा